सुखकर्ता दु:खहर्ता संपूर्ण गणपती आरती I Sukhakarta Dukhaharta full Ganpati Aarti

सुखकर्ता दु:खहर्ता संपूर्ण गणपती आरती I Sukhakarta Dukhaharta full Ganpati Aarti

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात केल्या जाणार्‍या आरतीची सुरुवात ज्या आरतीपासून होते ती म्हणजे समर्थ रामदास स्वामी रचित आपल्या लाडक्या गणरायाची आरती ‘सुखकर्ता..दु:खहर्ता’ ! परंतु आपल्यातील फारच थोड्या लोकांना हे माहीत आहे की मूळ आरतीमध्ये एकूण सात कडवी आहेत आणि आपण नेहमी त्यातील पहिली दोन आणि शेवटचे एक अशी केवळ तीनच कडवी म्हणतो.

हेही वाचा: श्री सूर्यनमस्कार मंत्र I Shree Suryanamaskar Mantra in Marathi and English

नेहमी म्हटली जाणारी आरती

सुखकर्ता दु:खहर्ता गणपती आरती I Sukhakarta Dukhaharta Ganpati Aarti

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना॥ जय ० ॥ ७ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥

हेही वाचा: गणपती अथर्वशीर्ष l Ganpati Atharvashirsh in Marathi

मूळ रूपातील संपूर्ण गणपती आरती येथे दिली आहे. 

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥

माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥

छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना॥ जय ० ॥ ७ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥

हेही वाचा: विठ्ठलाची-विठोबाची-पांडुरंगाची आरती l Vithhal-Vithoba-Pandurang Aarati in Marathi

सुखकर्ता दु:खहर्ता संपूर्ण गणपती आरती I Sukhakarta Dukhaharta full Ganpati Aarti

आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका

Leave a comment