महाराष्ट्र गीते l Maharashtra Gite-Songs
नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले १९४७ साली परंतु खूप मोठ्या संघर्षातून आणि तब्बल १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून १ मे १९६० रोजी आपल्या महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. आपल्या भारतमातेचा अविभाज्य भाग असलेला आणि सर्वार्थाने देशाची साथ देणार्या आणि अनेक महान विभूतींची जन्मभूमी असलेल्या अशा महाराष्ट्राबद्दलची ही स्तुतीसुमने!
जय जय महाराष्ट्र माझा l Jay Jay Maharashtra Maza Lyrics
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा …॥१॥
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा …॥२॥
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा …॥३॥
– राजा बढे
महाराष्ट्र गीते l Maharashtra Gite-Songs
देशभक्तीपर गीते मराठी l Deshabhaktipar Gite in Marathi
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा l Mangal Desha, Pavitra Desha, Maharashtra Desha Lyrics
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी,
नाचते करी; जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी….. ॥२॥
– गोविंदाग्रज
महाराष्ट्र गीते l Maharashtra Gite-Songs
शाळा कशी निवडावी, मराठी की इंग्लिश माध्यम? How to select a school, Marathi or English Medium?
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी l Labhale Aamhas Bhagya Bolato Marathi Lyrics
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढा जगात माय मानतो मराठी ॥१॥
आमुच्या मनामानात दगं ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी ॥२॥
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी ॥३॥
आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गजरते मराठी ॥४॥
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी ॥५॥
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथलया चराचरात राहते मराठी ॥६॥
पाहणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक ‘खेळ’ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ॥७॥
-सुरेश भट
महाराष्ट्र गीते l Maharashtra Gite-Songs
बहु असोत सुंदर संपन्न की महान l Bahu asot sundar sampann ki mahan Lyrics
बहु असोत सुंदर संपन्न की महान ।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
गगनभेदी गिरिविण अणुनच जिथे उणे ।
आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे ।
अटके परी जेथील तुरूंगि जल पिणे ।
तेथ अड़े काय जलाशय – नंदांविणे ।।
पौरुषासि अटक गमे जेथ दुःसहा ।।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। १ ।।
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे ।
रत्नान् वा मौक्तिकांही मूल्य मुळि नरे ।
रामणीची कूस जिथे नृमणि – रवनि ठरे ।
शुद्ध तिचे शीलहि गृहा गृहा ।।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। २ ।।
नग्न खड्ग करि , उघडे बघुनि मावळे ।
चतुरंग चमूंचेहि शौर्य मावळे ।
दौड़त चहुकडूनि जवें स्वार जेथले ।
भासति शतगुणित जरी असति एकले ।
यन्नामा परिसुनि रिपु शामितबल अहा ।।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। ३ ।।
विक्रम वैराग्य एक जागि नांदती ।
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती ।
शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती ।
पसरे यत्किर्ति अशी विस्मयावहा ।।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। ४ ।।
गीत मराठ्यांचे हे श्रवणी मुखी असो ।
स्पूर्ति दीप्ति द्रुतिहि देत अंतरी वसो ।
वचनि लेखनिहि मराठी गिरी दिसो ।
सतत महाराष्ट्र – धर्म मर्म मनि वसो ।
देह पडो सत्कारणि ही असे स्पृहा ।।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। ५ ।।
-श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
महाराष्ट्रातील जिल्हे आणि मुख्य ठिकाणे l District and Capitals in Maharashtra in Marathi
महाराष्ट्र गीते l Maharashtra Gite-Songs