मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी २०२५ l Marathi Bhasha Gaurav din 27 February 2025 Quotes in Marathi
नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. आपली माय मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. या भाषेचा गौरव करण्यासाठी दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीतील थोर साहित्यिक, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवसच मराठी भाषा गौरव दिन म्हणून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व
आपल्या मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेची आठवण करून देणारा आणि तिच्या संवर्धनासाठी प्रेरणा देणारा हा दिवस आहे. नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या आपल्या मातृभाषेच्या जागराचा हा दिवस लाखो मराठीप्रेमींसाठी एक उत्सव असतो.
प्राचीन परंपरा लाभलेल्या आपल्या भाषेतील संत वाङमय, विपुल ग्रंथसंपदा, कविता, नाट्य आणि चित्रपटसृष्टी या सर्व क्षेत्रांतील मराठी भाषेच्या योगदानाचा गौरव करणारा हा दिवस. अनेक थोर साहित्यिकांची परंपरा लाभलेल्या मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे संक्रमित करणे, त्यांना त्याची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे अशा अनेक गोष्टी या दिवशी केल्या जातात.
मराठी भाषा गौरव दिनाचे उत्सव आणि उपक्रम
१. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम – मराठी भाषेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी निबंधस्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा आणि कविता वाचनाचे कार्यक्रम घेतले जातात.
२. मराठी साहित्याचे वाचन व चर्चासत्रे – मराठी कवी आणि लेखक यांच्या साहित्याचे वाचन व त्यावर चर्चा केली जाते.
३. सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकांचे आयोजन – मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध नाटकांचे सादरीकरण केले जाते.
४. सोशल मीडियावर प्रचार – सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे म्हणूनच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध हॅशटॅग ट्रेंड केले जातात.
५. ग्रंथदिंडी आणि पुस्तकप्रदर्शन – वाचनसंस्कृती वाढावी यासाठी हे विशेष उपक्रम राबवले जातात.
मराठी भाषा संवर्धनासाठी आपण काय करू शकतो?
मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही गोष्टी आपण करू शकतो:
दररोज किमान काही मिनिटे तरी मराठीत वाचन करणे आणि मराठीत लिहिणे.
लहान मुलांना मराठीतून संवाद साधण्यास प्रवृत्त करणे.
मराठी साहित्य, चित्रपट आणि नाटके यांना प्राधान्य देणे.
मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि तिचा विकास करण्यासाठी स्थानिक व राज्यस्तरीय उपक्रमांमध्ये भाग घेणे.
मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यातील फरक
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो तर १ मे हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० या दिवशी महाराष्ट्राला अर्थातच मराठी राज्याला स्वातंत्र्य मिळाले.
मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी शुभेच्छा संदेश l Marathi Bhasha Gaurav din 27 February Quotes in Marathi
संत ज्ञानेश्वरांचे हे अमृतबोल तुम्ही शुभेच्छा म्हणून पाठवू शकता.
माझा मराठीची बोलू कौतुके।परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
मी मराठी वहिनीच्या शीर्षक गीतातील हे बोल तुम्ही मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी वापरू शकता.
महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई
तुझ्या कुशीतून सकळांसाठी अंकुरते अंगाई
संघर्षाचे शौर्य दिले तू धैर्य दिले जगण्याचे
तुझ्याचठायी कृतार्थ व्हावे अवघे जीवन अमुचे
तुझाच जयजयकार असावा सदैव आमुच्या ओठी
दरीखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती.
मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठा
सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
गझल सम्राट सुरेश भट यांची ही कविता म्हणजे मराठी मनाचा अभिमानच जणू
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
ज्यांच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून आपण हा दिन साजरा करतो त्या कुसुमाग्रजांच्या या कवितेच्या ओळी तर आपल्या हृदयात हात घालतात.
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या माय देशातील शिळा
सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
जेष्ठ साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं हे गीत आपल्या संपन्न महाराष्ट्राचं गौरव गीत आहे
बहू असोत सुंदर संपन्न की महान
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा
सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
थोर नाटककार राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज यांच्या कवितेतील या ओळी महाराष्ट्राचं श्रेष्ठत्व अधोरेखित करतात.
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा
सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी २०२५ l Marathi Bhasha Gaurav din 27 February 2025 Quotes in Marathi