मार्केट कोसळतंय! पुढे काय? Share Market is falling What next in Marathi
नमस्कार मित्रांनो yugmarathi.com वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो गेली अनेक दिवस शेअर मार्केटमध्ये जी पडझड चालू आहे, फार मोठ्या प्रमाणावर सर्वच कंपन्यांची स्टॉक्स पडतायत आणि त्याचाच परिणाम म्हणून निफ्टी आणि सेन्सेक्स देखील खूप जोरदारपणे खाली येतायत. एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून आपण याच्याकडे कसं बघितलं पाहिजे आणि आपण नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भात आपण या लेखात माहिती घेणार आहोत.
एक सूचना: या लेखात व्यक्त केलेली मते ही शेअर मार्केटच्या अभ्यासाविषयी आहेत. आपला गुंतवणूकविषयक कोणताही निर्णय घेताना स्वतःचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
सध्याचं मार्केट I Current Market Conditions
मित्रांनो स्टॉक्सच्या किमती वर खाली होणे हा कुठल्याही शेअर मार्केटचा एक मूलभूत स्वभावच असतो. खरंतर जे शेअर मार्केट सतत वर जात असेल किंवा सतत खाली येत असेल तर ते चांगलं शेअर मार्केट असं म्हटलं जात नाही. जिथे वर जाणे आणि खाली येणे या दोन्ही गोष्टी होत असतात अशीच मार्केट चांगली म्हणून ओळखली जातात. आणि त्या दृष्टीने आपण बघितलं तर गेले चार ते पाच महिने मार्केटमध्ये सतत पडझड चालू आहे मात्र त्याआधीची दोन ते तीन वर्ष कोविड नंतर आपलं मार्केट सतत वरच्या दिशेने जात होतं. नवनवे उच्चांक गाठत होतं. कुठेतरी हे मार्केट बॅलन्स होणं (त्याला करेक्शन येणं) अपेक्षित होतं आणि तेच करेक्शन आता आपल्याला बघायला मिळतंय. अगदी ढोबळ आकडेवारी जर लक्षात घेतली तर गेल्या पाच ते सहा महिन्यात निफ्टी साधारणपणे १६ टक्क्यांनी खाली आलाय आणि त्याच प्रमाणात सर्वच स्टॉक्स थोडेफार इकडेतिकडे होईल पण तेवढेच खाली आलेत.
मार्केट कोसळण्याची कारणे I Reasons for fall of share market in Marathi
मार्केटच्या पडझडीची प्रमुख कारणे काय आहेत आणि ही पडझड होत असताना एक गुंतवणूकदार म्हणून त्यामध्ये आपली भूमिका काय असली पाहिजे, आपण काय केलं पाहिजे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखात करतोय. मित्रांनो आपलं भारतीय स्टॉक मार्केट आपल्या एका गतीने सुरुवातीपासूनच वाढत आहे. अधेमध्ये त्यामध्ये थोडीफार करेक्शन्स येतात पण मार्केट साधारणपणे वरच्या दिशेने जातच आहे. परंतु गेल्या पाच-सहा महिन्यात मार्केटमध्ये जी मोठ्या प्रमाणावर पडझड झाली त्यामध्ये कुठलेही एक कारण आहे असं आपण ठामपणे म्हणू शकणार नाही. पुढे जी काही कारणं दिली आहेत त्या सर्वच कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून मार्केट खाली जातेय.
युक्रेन रशिया युद्ध: प्रामुख्याने युक्रेन रशिया युद्धापासून मार्केट संवेदनशील बनलं होतं आणि त्या युद्धाच्या अनुषंगाने ज्या काही बातम्या येतात त्यावरती मार्केट प्रभावित होत असतं.
अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची धोरणे: अगदी नजीकच्या काळात अमेरिकीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशिया युद्धासंदर्भात केलेली भाष्य असतील किंवा वेगवेगळ्या करांची घोषणा असेल, इतर देशांवर लादल्या जाणाऱ्या आयात करांविषयी त्यांचे जे धोरण आहे त्याचा कुठेतरी फटका मार्केटला बसला.
विदेशी गुंतवणूकदार: विदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात गुंतवणूक केली होती त्यांनी ती गुंतवणूक मागे घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांच्या दृष्टीने काही इतर मार्केट सध्या त्यांना जास्त फायदेशीर दिसत आहेत आणि तिथे ते पैसे टाकत असल्यामुळे त्यांच्याकडून स्टॉक्स विकले जात आहेत.
भारतीय रुपयाच अवमूल्यन:आपला भारतीय रुपयाचं सतत थोड्याफार प्रमाणात अवमूल्यन होत आहे त्याची किंमत डॉलरच्या तुलनेत कमी होत आहे. कुठेतरी त्याचाही परिणाम मार्केटवरती होतोय.
मुळात मार्केट मधील स्टॉक्स घसरल्यामुळे जे आपल्यासारखे सामान्य गुंतवणूकदार आहेत त्यांच्यामध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आणि त्याचीच परिणीती म्हणून त्यांनी देखील स्टॉक्स विकायला सुरुवात केली की ज्यामुळे स्टॉकच्या किमती आणखी खाली आल्या. विशेषतः कोविड नंतर मोठ्या प्रमाणावर नवीन ट्रेडिंग अकाउंट्स आपल्या देशात उघडली गेली होती आणि त्यामध्ये भारतीय नवीन ट्रेडर्सनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. जेव्हापासून त्यांनी गुंतवणूक सुरू केलेय मार्केट केवळ आणि केवळ वरती जात होतं पहिल्यांदाच हे नव गुंतवणूकदार एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडझड पाहतायत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये घबराट निर्माण होऊन त्यांनी देखील लगेच स्टॉक विकायला सुरुवात केली, आपली गुंतवणूक काढायला सुरुवात केली आणि त्याचाही परिणाम म्हणून स्टॉक्स आणखी खाली जात आहेत.
हेही वाचा: शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती l Share Market Information in Marathi
मार्केट कोसळतंय! पुढे काय? Share Market is falling What next in Marathi
आता एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून आपण याच्याकडे कसं बघितलं पाहिजे आणि आपली काय भूमिका असली पाहिजे, आपण नेमकं काय केलं पाहिजे याविषयी थोडक्यात विचार करूया. मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये मधील पडझड ही काही नवीन गोष्ट नाही. याआधी देखील वेगवेगळ्या कारणामुळे काही थोड्या काळात मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण त्या प्रत्येक वेळी मार्केटने त्यानंतर जोरदार मुसंडी मारत पुन्हा एकदा वरच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. विशेषता नजीकच्या काळातील जर काही अशी करेक्शन्स किंवा पडझडी आपण बघितल्या असतील तर
डॉट कॉम बबल (Dot com Bubble): २००० साली डॉट कॉम बबल मुळे मार्केट पडले होते. यामध्ये काही आयटी कंपन्यांनी एक कृत्रिम अशी आपली प्रगती (growth) दाखवायला सुरुवात केली होती आणि जेव्हा हे लक्षात आलं की हे जेवढे दाखवतात तेवढी प्रगती प्रत्यक्षात नाही आहे तेव्हा त्याचा परिणाम म्हणून आयटी सेक्टरमध्ये भीती निर्माण झाली आणि स्टॉक्स धडाधड कोसळायला लागले होते.
जागतिक आर्थिक मंदी (Global economic recession): २००८ मध्ये अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या आणि आर्थिक मंदी आली. या मंदीच्या काळात देखील जगातली अनेक मार्केट्स पडली. त्याला आपलं मार्केट देखील अपवाद नव्हतं.
कोविड (Covid): २०२० मध्ये कोविड मुळे लॉकडाऊन झालं आणि त्यानंतर मार्केट जोरदारपणे कोसळलं होतं. आणि आपल्याला माहितीये की त्यानंतर आधीच्याही पेक्षा खूप जास्त उंचीवर मार्केट जाऊन पोहोचलं होतं.
मार्केटच इतिहास बघता एक गोष्ट लक्षात येते की, या ज्या पडझडी होतात ह्या ठराविक काळापुरत्याच असतात. दीर्घ पल्ल्याच्या मुदतीत जर का तुम्ही शेअर मार्केटचा आलेख (graph) बघितलात तर तो कायमच चढता असतो. तूम्ही जर का शॉर्ट टर्म ट्रेडिंग (short term trading) करत असाल म्हणजे आज पैसे टाकले आणि १०-१२ दिवसांनी मला स्टॉक विकायचा आहे किंवा दोन महिन्यांनी मला स्टॉक विकायचा आहे, अशा ट्रेडर्स नी सध्या सबुरीने घेऊन त्यांनी शांत राहणं जास्त योग्य राहील. कारण आता मार्केट कुठे जाईल, कुठे थांबेल हे अजूनही सांगता येत नाही. मात्र ज्या गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीसाठी (long term) आपले पैसे मार्केटमध्ये गुंतवलेत (म्हणजे पाच ते दहा वर्ष किंवा त्याहूनही मोठ्या मुदतीचा काळ लक्षात घ्या) अशा गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता संयम ठेवला पाहिजे कारण दीर्घ पल्ल्यासाठी निश्चितपणे मार्केट वरती जाणार आणि त्यांना एक चांगला परतावा नक्कीच मिळणार. ते ट्रेडर्स शॉर्ट सेलिंग (Short selling) करतात तर त्यांना पडत्या मार्केटमध्ये देखील संधी असतात. प्रत्येकाने आपापल्या अभ्यासनुसार आपापली जोखीम लक्षात घेऊन त्यावरती काम करायला हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जी कोणती ट्रेडिंग मेथोडोलॉजी वापरत आहात, जी कोणती सिस्टीम तुम्ही वापरत आहात, ती सिस्टीम अतिशय शिस्तीने आणि काटेकोरपणे त्याचे पालन करणं ही मुख्य गोष्ट विसरू नका. सर्वच शेअर मार्केट मधले तज्ञ कायमच सांगत असतात की फॉलो यूवर सिस्टीम आणि त्या सिस्टीमचा कस अशावेळी लागतो जेव्हा मार्केट पडत्या काळात असतं. तुमची ती सिस्टीम तुम्ही नक्की फॉलो करा. तसंच ज्यांना नव्याने गुंतवणूक करायचीआहे आणि अजूनही त्यांना मार्केट विषयी भीती वाटते आहे, अशांनी थोडा काळ शांत राहणं जास्त योग्य राहील. कारण अजूनही मार्केटची दिशा नक्की नाही. एकदा मार्केटने अप टर्न घेतला आणि ते वरच्या दिशेने जायला लागलं तर तुम्ही गुंतवणूक करायला हरकत नाही. मात्र ज्यांची आधीच गुंतवणूक केलेली आहे त्यांनी घाबरून जाऊन लगेचच पैसे काढून मोकळ होण्याची गरज नाही. दीर्घ पल्ल्यासाठी मार्केट निश्चितपणे चांगला परतावा देणार आणि कारण खाली जाऊन वर येणं हाच शेअर मार्केटचा नैसर्गिक स्वभाव आहे आणि त्यानुसारच शेअर मार्केटचं काम चालतं!
हेही वाचा: आर्थिक नियोजनाचा ५०-३०-२० नियम l 50-30-20 rule of financial planning in Marathi
मार्केट कोसळतंय! पुढे काय? Share Market is falling What next in Marathi