गणपती स्तोत्र मराठी l Ganpati Stotra in Marathi

गणपती स्तोत्र मराठी l Ganpati Stotra in Marathi

नमस्कार मित्रहो, आपणा सर्वांचं yugmarathi.com वर खूप मनापासून स्वागत. मित्रहो, गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचच आराध्य दैवत. मग त्याची भक्ति, उपासना आपण केलीच पाहिजे ना चला तर मग या  लेखात आपण गणपती स्तोत्र मराठी l Ganapati Stotra in Marathi बघूया.

हेही वाचा: गणपती अथर्वशीर्ष l Ganpati Atharvashirsh in Marathi

गणपती स्तोत्र मराठी l Ganpati Stotra in Marathi

साष्टांग नमन हे माझें गौरीपुत्रा विनायका

भक्तीने स्मरतां नित्य आयु: कामार्थ साधती ।। १ ।।

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |

तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र तें  ।। २ ।।

पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव तें ।

सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ।।३ ।।

नव श्री भालचंद्र दहावें श्रीविनयक ।

अकरावें गणपति बारावें श्रीगजानन  ।। ४ ।।

देवनावें अशी बारा तीन संध्या म्हणे नर ।

विघ्नभीति नसे त्याला प्रभो तू  सर्वसिद्धि दे ।।५ ।।

विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन

पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गि ।।६ ।।

जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ ।

एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ।।७ ।।

नारदांनी रचिलेले झालें संपुर्ण स्तोत्र हें ।

श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिलें ।। ८ ।।

 

हेही वाचा: सुखकर्ता दु:खहर्ता संपूर्ण गणपती आरती I Sukhakarta Dukhaharta full Ganpati Aarti

गणपती स्तोत्र मराठी l Ganpati Stotra in Marathi

आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका

Leave a comment