हिंदू धर्मातील ३३ कोटी देव l 33 Koti Gods in Hindu Dharma in Marathi

हिंदू धर्मातील ३३ कोटी देव l 33 Koti Gods in Hindu Dharma in Marathi

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो आपली भारतीय संस्कृती ही जगातील एक प्राचीन संस्कृती मानली जाते. आपला हिंदू धर्म म्हणजेच भारतीय संस्कृती ही हजारो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर असंख्य योगींच्या, ऋषींच्या, तपस्वींच्या योगदानातून, अविरत प्रयत्नातून गेली.. विकसित होत गेली… बहरत गेली! आपली भारतीय संस्कृती म्हणजेच हिंदू धर्म हा कायमच निसर्गाशी मेळ घालत त्याच्याशी एकरूप होत मोठा होत आलाय. संस्कृतीचं पालन, धर्माचं आचरण म्हणून आपण अनेक परंपरा, कुळाचार, रीतिरिवाज पाळत असतो. वर्षाच्या वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे सण, उत्सव, व्रत-वैकल्ये आपण साजरी करत असतो आणि यामध्ये अर्थातच प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या दैवताची उपासना करत असतो. ब्रम्हा-विष्णू-महेश, गणपती, दुर्गा माता, श्री गुरुदत्तात्रेय अशा अनेक दैवतांना आपण मानतो त्यांची मनोभावे पूजा करतो. स्तोत्र, आरत्या, भजने अशा अनेकविध मार्गाने आपण त्यांची भक्ती करतो. आपल्याकडे असं म्हटलं जातं की हिंदू धर्मामध्ये ३३ कोटी देव आहेत. पण खरंच ३३ कोटी देव आहेत का हो ? असतील तर त्यांची नावं काय आहेत? याविषयीच या लेखात जाणून घेणार आहोत.

 

ब्रम्हा-विष्णू-महेश (Bramha-Vishnu-Mahesh)
आपल्या हिंदू संस्कृतीचा आत्मा म्हणजेच ब्रह्मा म्हणजे ब्रम्हदेव, विष्णू आणि महेश म्हणजेच शिवशंकर. खरंतर जगातील कुठल्याही घटनेमध्ये तीन मूलभूत अवस्था असतात, उत्पत्ती, स्थिती आणि लय! पहिली अवस्था जेव्हा एखाद्या गोष्टीचा जन्म होतो, दुसरी अवस्था  ती गोष्ट कार्यरत असते आणि तिसरी अवस्था जेव्हा त्या गोष्टीचा विनाश होतो. आपल्या विश्वामध्येही अशाच अवस्था बघायला मिळतात. आणि आपल्या हिंदू धर्मातील ही तीन दैवते याच गोष्टींवरती अधिपत्य करतात. ब्रम्हदेव म्हणजेच ब्रम्हा ला उत्पत्ती चा जनक मानलं जातं की ज्याने सृष्टी निर्माण केली. प्रत्येक सृजन, प्रत्येक नवनिर्माण हे ब्रह्मदेवाच्या अधिपत्याखाली येतं. एकदा निर्मिलेली गोष्ट तिचं पालन, तिचं नियंत्रण या सर्वांवरती विष्णु देव राज्य करतात. म्हणूनच विष्णू देवांना सृष्टीचा पालनहार असे म्हटले जाते. आणि अर्थातच तिसरी अवस्था म्हणजेच त्या गोष्टीचा लय म्हणजेच त्या गोष्टीचा विध्वंस. ही गोष्ट श्री महेश म्हणजेच श्री शिव शंकराच्या अधिपत्याखाली येते. म्हणूनच अगदी वैज्ञानिक पद्धतीने आपल्याकडे निसर्गातील या तीन अवस्थांसाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन दैवतांना अत्युच्च स्थान देऊन आपण त्यांची पूजा करतो.

 

पंचदेवता (Panchadevata)
यासोबतच श्री दुर्गामाता म्हणजेच आदिशक्ती या विश्वाची शक्ती आणि आदिगणेश म्हणजेच गणपती हे या विश्वचं मूळ मानलं जातं. म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश, दुर्गामाता आणि गणपती यांना हिंदू धर्मात पंचदेवतांचा मान आहे.

 

हिंदू धर्मातील ३३ कोटी देव l 33 Koti Gods in Hindu Dharma in Marathi

 

 

३३ कोटी देवता (33 Koti Devata)
मित्रांनो आता आपण ३३ कोटी देवता कोणत्या ते बघूया. खरंतर ३३ कोटी देवता ही केवळ एक संकल्पना आहे. यातील ३३ कोटी ही संख्या नसून कोटी या शब्दाचा संस्कृत मधला अर्थ प्रकार असा होतो. म्हणजेच ३३ प्रकारचे देव अशी ही मूलभूत संकल्पना आहे. त्याचा केवळ विपर्यास होऊन आपण ३३ कोटी देव म्हणजे तो शब्द संख्या या अर्थाने घेतो. आपल्याकडे गोमातेच्या शरीरात हे ३३ कोटी म्हणजे ३३ प्रकारचे देव वास करतात असे म्हणतो आणि म्हणूनच गोमातेला आपण पवित्र मानतो. आपल्या अनेक धर्मग्रंथांमध्ये असा उल्लेख आढळतो की ३३ कोटी देवता (३३ प्रकारच्या देवता) या संपूर्ण सृष्टीचे व्यवस्थापन करतात. थोडक्यात एका शासनामध्ये जसं मंत्रिमंडळ असतं, पंतप्रधानांपासून ते इतर सर्व खात्यांचे मंत्री असतात आणि ते त्या त्या खात्याच्या कारभारावरती नियंत्रण ठेवतात. अगदी त्याच प्रकारे या ३३ कोटी म्हणजे ३३ देवता पूर्ण सृष्टीचं नियंत्रण करत असतात.
तर या तेहतीस कोटी देवतांमध्ये बारा आदित्य, अकरा रुद्र, आठ वसू (अष्टवसू), एक इंद्र आणि एक प्रजापती असे एकूण तेहतीस देव आहेत.

 

३३ कोटी देव = ३३ प्रकारचे देव = १२ आदित्य + ११ रुद्र + ८ वसू + १ इंद्र + १ प्रजापती

33 Koti Devata = 33 Types of Gods = 12 Aaditya + 11 Rudra + 8 Vasu + 1 Indra + 1 Prajapati

१२ आदित्य (12 Aaditya)
अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू

 

११ रुद्र (11 Rudra)
मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज

 

८ वसू (अष्टवसू) (8 Vasu)
आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास

 

१ इंद्र (1 Indra)

 

१ प्रजापती (1 Prajapati)

 

आठ चिरंजीव (Eight Chiranjiv)
आपल्याकडे आठ चिरंजीव अशी देखील संकल्पना आहे म्हणजेच ही ८ अशी दैवत आहेत की ज्यांना मरण नाही, ते चिरंजीव आहेत. सृष्टीच्या अंतापर्यंत ते सदैव आपल्या सोबत असणार. हे चिरंजीव खालील प्रमाणे
हनुमान
विभीषण
वेदव्यास
कृपाचार्य
अश्वत्थामा
परशुराम
राजा बलि
ऋषि मार्कंडेय

 

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या दैवतांना आपण पुजत असलो, त्यांची उपासना करत असलो तरीही या संपूर्ण सृष्टीचे मूळ तत्व म्हणजेच परमतत्व म्हणजेच परब्रम्ह हे एकच असून त्यातूनच या सृष्टीचे उत्पत्ती झाली असून तेच सर्वसृष्टीचं मूळ आहे अशी आपली धारण आहे. निसर्गातील विविध शक्तींना जसं वायू देव, अग्नीदेव, वरूण देव यांच्या माध्यमातून आपण निसर्ग शक्तिप्रती कायमच कृतज्ञ राहतो. हेच परमतत्व, परब्रम्ह प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टींमध्ये देखील वास करते आपल्या प्रत्येकाच्या मनामनात देव राहतो ही आपल्या साधू संतांनी आपल्या ऋषी मुनींनी मांडलेली संकल्पना हे या हिंदू धर्माचे एक अतिशय प्रगत वास्तववादी रूप म्हणूनच सगळ्या जगाला भावून जाते.

 

 

हिंदू धर्मातील ३३ कोटी देव l 33 Koti Gods in Hindu Dharma in Marathi
आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका

Leave a comment