पहिला विमान प्रवास! या आहेत महत्त्वाच्या गोष्टी! First time travel from flight important tips in Marathi
नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो सजीव आणि निर्जीव यांच्यातला एक मोठा फरक म्हणजे सजीव प्रवास करतात. इतर सारे प्राणी फक्त चालून, पोहून किंवा उडत प्रवास करत असले तरी माणसाने मात्र हा प्रवास सुलभ होण्यासाठी अनेक साधने निर्माण केली. आधी चालत, मग घोडा, उंट असे प्राणी वापरत नंतरा बैलगाडी, घोडागाडी ते अगदी बस, रेल्वे, जहाज आणि विमाने वापरुन हा प्रवास सुरूच आहे. आताच युग हे ग्लोबलायझेशन चं आहे आणि प्रवास हा त्याचा अविभाज्य भाग बनलाय. आपण अनेकदा अनेक कारणांसाठी प्रवास करतो पण त्यातला विमान प्रवास हा सामान्य लोकांसाठी तसा दुर्मिळच. प्रत्येकाने लहानपणी घरच्या अंगणातून आकाशात बघितलेल्या विमानापासून विमानप्रवासाचं एक स्वप्न बघितलेल असतं, पण हे स्वप्न सत्यात येऊन जेव्हा तुम्ही तुमच्या पहिली वहिल्या विमानप्रवासाची तयारी सुरू करता तेव्हा अनेक अडचणी येतात किंवा अनेक गोष्टी माहीत नसतात. याच गोष्टी तुम्हाला समजाव्यात आणि तुमचा प्रवास आनंददायी व्हावा यासाठी हा लेख नक्की वाचा. पहिला विमान प्रवास! या आहेत महत्त्वाच्या गोष्टी! First time travel from flight important tips in Marathi
विमान प्रवास करताना लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टी.
तिकीट बुकींग Ticket booking
विमानाने प्रवास करण्यासाठी तुम्हाला आधी तिकीट बुक करावं लागतं. आता सहजपणे ऑनलाइन तिकिट बुक करता येतं. यासाठी तुम्ही ट्रॅव्हल एजंटची मदत घेवू शकता. किंवा अनेक वेबसाईट्स तुम्हाला तिकीट बुक करायला मदत करतात. परंतु जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तिकीट बुक करत असाल तेव्हा तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घेणे केव्हाही चांगले. तुम्ही कुठून कुठे प्रवास करताय ती ठिकाणं आणि एअरलाईन्स नीट बघून घ्या. विंडो सीट हवी असल्यास तसा पर्यायही निवडता येतो. तिकीट बुक करताना शाकाहारी आणि मांसाहारी असे जेवणाचे पर्याय निवडता येतात. जेवणाचे बिल हे तुमच्या तिकिटात समाविष्ट असते.
दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत प्रवास करता येतो. तर त्यावरील मुलांसाठी तिकीट काढावे लागते.
विमानाच्या तिकिटाचे किंमत ही डायनामिक प्रायसिंग (dynamic pricing) ने ठरते. म्हणजे जेवढं लवकर तिकीट काढाल तेवढं ते स्वस्त मिळतं आणि मग हळूहळू त्याची किंमत वाढत जाते.
कागदपत्र Documents
विमान प्रवास करताना आपली कागदपत्रे आपल्यासोबत असणे महत्त्वाचे आहे. देशांतर्गत प्रवसात आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड, ड्रायविंग लायसन्स अशी ओळखपत्रे केव्हाही कामी येतात. आणि परदेशात जात असाल तर या कागदपत्रांसोबतच पासपोर्ट आणि व्हिसा सोबत घेतल्याची खात्री करा. विमानातळावर आपल्या सुरक्षा तपासणीवेळी ही कागदपत्रे आपल्यासोबत असणे बंधनकारक असते.
सामान Luggage
बर्याच जणांना विमानप्रवास म्हटला की सामान किती न्यायचं या विचाराने गोंधळून जायला होतं. खरं तर प्रत्येक एअरलाईन्स ही प्रवाश्यांना एका ठराविक वजनापर्यंत आणि ठराविक बॅगांमधून सामान सोबत नेण्याची परवानगी देते. प्रत्येक एअरलाईन्सचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवासात सामान सोबत नेण्याबाबत वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे ज्या एअरलाइन्समध्ये तुमचं तिकीट आहे त्या एअरलाईनचे सामानाबाबतचे नियम नीट समजून घ्या.
केबिन लगेज– प्रत्येक प्रवाशाला विमानात स्वतःसोबत साधारण ५ ते ७ किलो सामान नेता येते ज्यात तुम्ही तुमच्या किंमती वस्तू, पाणी, खाण्याचे पदार्थ अशा गोष्टी एका हँड बॅगेतून घेऊ शकता.
कार्गो लगेज– विमानाच्या डिकीतून साधारण १२ ते १५ किलो सामान नेता येते. मुख्य म्हणजे हे सामान प्रवसात तुमच्या सोबत नसते. त्यामुळं अत्यावश्यक गोष्टी जसं की औषधे यात ठेऊ नयेत.
सामानाचे वजन जास्त असेल तर अतिरिक्त सामानाचे पैसे एअरपोर्टवर भरून पूर्ण सामानासह प्रवास करता येतो.
घरून निघतानाच कार्गो लगेज आणि केबिन लगेज व्यवस्थित पॅक करा. म्हणजे आयत्यावेळी धावपळ होणार नाही.
तुमच्या सामानात काही अंमली पदार्थ, हत्यारे, अनधिकृत चलन अशा बेकायदेशीर गोष्टी नाहीत ना याची खात्री करा. विमानतळावरील तपासणीच्या वेळी या गोष्टी पहिल्या जातात.
विमानाची वेळ Flight time
विमान प्रवास हा रेल्वे किंवा बस प्रवासापेक्षा थोडासा वेगळा असतो. त्यामुळे विमानतळावरील सगळ्या गोष्टींची पूर्तता करायला किमान २ तास वेळ अपेक्षित असतो. त्यामुळे विमान सुटण्याआधी किमान 2 तास विमानतळावर पोहोचा. त्यानुसार वेळेचे नियोजन करा म्हणजे घाई होणार नाही आणि विमानही चुकणार नाही.
सुरक्षा तपासणी Security check
विमानतळावर प्रवेश करताना तुम्हाला तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाला तुमचे तिकिट आणि तुमचे ओळखपत्र दाखवावे लागेल. ते पाहूनच तुम्हांला आतमध्ये सोडण्यात येते. त्यासाठी ओरिजनल आयडी कार्ड जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड, ड्रायविंग लायसन्स सोबत ठेवा. तुम्हाला कोणी त्यांचे सामान सोबत घेण्याची विनंती केली तरी ते स्वीकारू नका. त्यात अंमली पदार्थ, हत्यारे किंवा तस्करीच्या गोष्टी असू शकतात आणि तुम्ही त्यात अडकले जाऊ शकता, म्हणून सावधानता बाळगा.
चेक इन Check in
सुरक्षा तपासणी झाल्यानंतर चेक-इन काऊंटरवर जाऊन बोर्डिंग पास घ्यावा लागतो. प्रत्येक प्रवाशासाठी एक बोर्डिंग पास दिला जातो. ज्यावर तुमच्या प्रवासाचे तपशील आणि सीट नंबर दिलेला असतो. तसेच तुमच्या विमानाची जागा (बोर्डिंग गेट नंबर) दिला जातो. यानंतर तुमच्या सामानाचे वजन करून मोठ्या बॅगा (कार्गो लगेज) त्यांच्या ताब्यात घेतल्या जातात. आणि पुढच्या तपासणीसाठी आपल्याला जावे लागते. यात तुमची पुन्हा एकदा कसून तपासणी केली जाते. सोबत असलेले सर्व सामान (केबिन लगेज) देखील तपासले जाते. त्यानंतर फ्लाइट पकडण्यासाठी बोर्डिंग गेट कडे जावे लागते.
हेही वाचा: भारतीय रेल्वे माहिती l Indian Railway Information in Marathi
बोर्डिंग गेट Boarding Gate
जसा रेल्वे साठी प्लॅटफॉर्म असतो तसा विमानासाठी बोर्डिंग गेट. तुमच्या तिकीटावर असलेल्या बोर्डिंग गेट चा नंबर आणि तिथल्या डिजिटल डिस्प्ले वरील तुमच्या फ्लाइट चा बोर्डिंग गेट नंबर तपासून त्यानुसार योग्य बोर्डिंग गेट कडे चला. आणि रांगेत आपल्या विमानात प्रवेश करा. तिथल्या सूचना काळजीपूर्वक ऐका.
विमान प्रवेश Flight entry
विमानात प्रवेश केल्यानंतर आपल्या सीट नंबर नुसार आपली सीट शोधा. आपल्यासोबत असलेलेल सामान (केबिन लगेज) आपल्या सीट च्या वरती असलेल्या जागेत व्यवस्थित ठेऊन द्या. मोबाइल फ्लाइट मोड वर ठेवा आणि सीट बेल्ट लाऊन विमान प्रवासासाठी सज्ज व्हा. एअर होस्टेस किंवा फ्लाइट अटेंडंट तुम्हाला या सगळ्यासाठी मदत करतील. त्यांच्या सूचनांचे व्यवस्थित पालन करा. एकदा विमानाने टेक ऑफ केले की अगदी थोड्या वेळासाठी तुम्हाला डोके जड वाटू शकते कारण आपण खूप वेगाने गुरुत्वाकर्षंणाच्या विरुद्ध जात असतो. परंतु विमान वरती स्थिर झाल्यावर हा त्रास निघून जातो. आता तुम्ही सीट बेल्ट सोडून विमानप्रवासाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. प्रत्येक एअरलाईन्स त्यांच्या पद्धतिनुसार जेवण किंवा अन्य खाण्याचे पदार्थ आपल्याला पुरवतात. त्यातले काही तिकिटातच समाविष्ट असतात तर काहींचे पैसे भरावे लागतात.
महत्त्वाचे:
तुम्हाला कोणताही वैद्यकीय त्रास असेल तर त्याची पूर्वकल्पना फ्लाइट अटेंडंटला द्यायला विसरू नका. आणि त्यासंदर्भातली औषधे आठवणीने आपल्या सोबत ठेवा.
विमानातून उतरताना After landing
प्रवास पूर्ण झाल्यानंतर विमान जेव्हा लॅंडींग करते तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला सीट बेल्ट लावावे लागतात आणि विमान धावपट्टीवर पुर्णपणे थांबल्यानंतर तुम्ही सिटवरून उठू शकता. विमानातून बाहेर पडल्यानंतर बस किंवा स्वयंचलित जिन्यावरून गेट पर्यंत येता येते. यानंतर बॅग काउंटरवर जाऊन कार्गो लगेज ताब्यात घेता येते. आपल्या बॅगा काळजीपूर्वक तपासून ताब्यात घ्या आणि विमानतळावरून बाहेर पडा.
मित्रांनो, पहिला विमान प्रवास! या आहेत महत्त्वाच्या गोष्टी! First time travel from flight important tips in Marathi या लेखातल्या वरील गोष्टी काळजीपूर्वक अंमलात आणल्यात तर नक्कीच एक सुखकर आणि अविस्मरणीय विमानप्रवास पूर्ण कराल.
पहिला विमान प्रवास! या आहेत महत्त्वाच्या गोष्टी! First time travel from flight important tips in Marathi