पोमोडोरो टेक्निक: वेळ व्यवस्थापनाची परिणामकारक पद्धत l POMODORO Technique Effective method of time management in Marathi

पोमोडोरो टेक्निक: वेळ व्यवस्थापनाची परिणामकारक पद्धत l POMODORO Technique-Effective method of time management in Marathi

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो आजकाल धावपळीच्या जीवनात वेळेचे महत्व माहित नाही असा एकही माणूस सापडणार नाही. अगदी लहान मुलांपासून ते उच्च पदांवरती काम करणारा नोकरदार वर्ग ते अगदी घरातील महिलावर्ग या सर्वांनाच वेळेचे व्यवस्थापन फार मोठे गरजेचे झाले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने आपली कामे परिणामकारक पद्धतीने होण्यासाठी आपल्या कामांच्या योजना आणि त्यानुसार वेळेचं नियोजन, वेळेची आखणी करत असतो. याच गोष्टींना मदत म्हणून अनेक पद्धती किंवा टेक्निक्स विकसित केली गेली आहेत आणि वापरली जाता आहेत. त्यातल्याच एका जपानी पद्धतीची मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे. या पद्धतीचे नाव आहे पोमोडोरो टेक्निक POMODORO Technique!

पोमोडोरो टेक्निकचा सिद्धांत l Principle of POMODORO Technique

मित्रांनो आपण जेव्हा कोणतेही काम एकाग्रपणे करत असतो तेव्हा मानवी मेंदू आपल्या पूर्ण क्षमतेने काम करत असतो परंतु त्यालाही काही मर्यादा असतात. एका ठराविक वेळेच्या पलीकडे आपण तेवढाच एकाग्रपणा किंवा ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन concentration म्हणतो ते करणं कठीण जातं. त्यामुळे एक ठराविक वेळ काम केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ब्रेक घेणं फार महत्त्वाचं असतं, आणि याच मूलभूत सिद्धांतावरती (प्रिन्सिपल Principle) वरती ही पद्धत काम करते.

POMODORO Technique Effective method of time management in Marathi

पोमोडोरो टेक्निकचा इतिहास l History of POMODORO Technique

१९८० च्या दरम्याने पोमोडोरो तंत्र फ्रान्सिस्को सिरिलो यांनी विकसित केलेली वेळ व्यवस्थापन पद्धत आहे.

हेही वाचा: पहिला विमान प्रवास! या आहेत महत्त्वाच्या गोष्टी! First time travel from flight, important tips in Marathi

काय आहे पोमोडोरो टेक्निक ? what is POMODORO Technique?

या पद्धती नुसार कोणतेही काम एकाग्रपणे (कॉन्सन्ट्रेशनने) करायचं असेल तर आपण 25 मिनिटांचा वेळ त्या कामासाठी वापरायचा त्यानंतर पाच मिनिटांचा ब्रेक घ्यायचा पुन्हा एकदा 25 मिनिटे काम करायचं, कामावरती एकाग्रपणे फोकस करायचं पुन्हा पाच मिनिटांचा ब्रेक आणि अशाच प्रकारे आपण वेगवेगळी कामे सहजपणे हाता वेगळी करायची. साधारणपणे असं मानलं जातं की अशा प्रकारचे आठ परिणामकारक वेळेचे टप्पे (स्लॉट) आपल्याला मिळाले तर दिवसभराच्या पूर्ण काम इतके काम आपल्याकडून होते. तीन पोमोडोरो चे टप्पे पूर्ण झाल्यानंतर आपण वीस ते तीस मिनिटांचा एक मोठा ब्रेक घेतला तर याचा परिणाम आणखी चांगला साधला जातो, परंतु वेळेचं बंधन यात खूप महत्त्वाचं आहे. आपण पाच मिनिटांचा जो मध्ये ब्रेक घेतो त्यामुळे मेंदू पुन्हा एकदा ताजा तवाना होऊन आपण पूर्णपणे त्या कामावर फोकस करतो त्यामुळे वेळ व्यवस्थापनाची ही पद्धत खूपच फायदेशीर आहे.

पोमोडोरो वेळ व्यवस्थापन पद्धतीचे  पाच टप्पे खालील प्रमाणे:

१. तुम्हाला जे काम पूर्ण करायचे आहे ते निवडा.

२. २५ मिनिटांचा टायमर सेट करा.

३. तुम्ही निवडलेल्या कामावर पूर्ण एकाग्रपणे काम करा.

४. जेव्हा अलार्म वाजेल तेव्हा पाच मिनिटांचा ब्रेक घ्या.

५. हीच पद्धत तीन वेळा पुन्हा करा. आता 90 मिनिटांच्या कामा नंतर तीस मिनिटांचा ब्रेक घ्या.

हेही वाचा: 1 GB, 1 MB किंवा 1 KB म्हणजे नक्की किती? मेमरी स्टोरेज मोजतात तरी कसं? What is 1 GB, 1 MB or 1 KB? How memory storage measured in Marathi

पोमोडोरो चा ९०-२० नियम l 90-20 rule of POMODORO Technique.

या नियमानुसार जेव्हा तुम्ही पोमोडोरो पद्धतीचे तीन टप्पे पार करता (एक टप्पा २५+०५=३० मिनिटे) म्हणजेच अर्ध्या तासाचे तीन टप्पे म्हणजेच ९० मिनिटे होतात तेव्हा कमीत कमी 20 मिनिटांचा ब्रेक घ्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा कामावर लक्ष एकाग्र करा. यालाच पोमोडोरो चा ९०-२० नियम असे म्हणतात.

पोमोडोरो चा एक टप्पा २५ मिनिटांचाच का?

फ्रान्सिस को सिरिलो यांनी जेव्हा ही पद्धती विकसित केली तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या वेळेच्या टप्प्यांवरती काम केले अगदी दोन मिनिटांपासून ते काही तासांपर्यंतच्या वेगवेगळ्या वेळेच्या मर्यादा त्यांनी तपासून पाहिल्या आणि त्यांच्या असे लक्षात आले की २५  मिनिटे ही ही वेळ मेंदूला कोणताही थकवा न येता एकाग्रपणे एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे म्हणूनच पोमोडोरो पद्धतीमध्ये २५ मिनिटांच्या वेळेचा टप्पा निश्चित केलेला आहे.

पोमोडोरो पद्धतीचा फायदा l Advantage of POMODORO Technique.

साधारणपणे असं मानलं जातं की ३० मिनिटांचे आठ परिणामकारक वेळेचे टप्पे (स्लॉट) आपल्याला मिळाले तर दिवसभराच्या पूर्ण कामा इतके काम आपल्याकडून होते. तसा विचार केला तर नोकरीच्या साधारण वेळा या आठ तासांच्या असतात त्यातला काही वेळ हा जेवणाची सुट्टी किंवा इतर छोटे ब्रेक्स यामध्ये जातो. मग या टेक्निक प्रमाणे आपण जर वागलो तर अर्ध्या तासाचे आठ स्लॉट म्हणजेच एकूण चार तासांचं काम होतं परंतु हे काम खूप जास्त एकाग्रपणे फोकस करून असल्यामुळे  हे चार तास खूप उच्च प्रतीची गुणवत्ता पूर्ण उत्पादकता म्हणजेच क्वालिटी प्रोडक्शन (Quality Production) आपल्याला देतात. आजकाल याच पद्धतीचा वापर करून अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये मॅनेजर किंवा सीईओ म्हणून काम करणारे अनेक जण आपली कामे खूप परिणामकारक पद्धतीने पूर्ण करतात. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी देखील पोमोडोरो POMODORO पद्धती त्यांचे काम म्हणजेच अभ्यास करण्यासाठी खूपच परिणामकारक आहे. या पद्धतीचा वापर करून जर का मुलांनी अभ्यास केला तर त्यांची स्मरणशक्ती खूप चांगल्या प्रकारे वाढते आणि एकाग्रपणे काम करण्याची त्यांना लहानपणापासूनच सवय लागते. अशा प्रकारे काम करण्यामुळे एक काम करण्याची शिस्त आपल्या अंगी येथे ज्याचा सर्वांनाच आपल्या आयुष्यात खूप जास्त फायदा होतो.

पोमोडोरो टेक्निक: वेळ व्यवस्थापनाची परिणामकारक पद्धत l POMODORO Technique-Effective method of time management in Marathi

हेही वाचा: मिलियन, बिलियन, ट्रिलियन म्हणजे नक्की किती? How much is Million, Billion, Trillion exactly in Marathi.

Leave a comment