शिवरायांची आरती l Shivarayanchi aarati l Aarati of Shivaji Maharaj in Marathi

शिवरायांची आरती l shivarayanchi aarati l Aarati of Shivaji Maharaj in Marathi by Swatantryavir Vinayak Damodar Savarkar.

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक प्रतिभावान कवींनी, लेखकांनी असंख्य शब्दसुमने रचली आहेत आणि ती गाजली आहेत.  अशाच एका देशभक्त-प्रतिभावंत कवीने अर्थातच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी रचलेली महाराजांची आरती जी गाताना आपल्या शरीरातील कण अन कण चैतन्यमय होतो.

हेही वाचा: गणपती अथर्वशीर्ष l Ganpati Atharvashirsh in Marathi

जयदेव जयदेव जय जय शिवराया
या या अनन्य शरणा आर्यां ताराया llधृll

आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो भूपाला
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला? ll१ll

श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता? ll२ll

त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या ll३ll

ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला

देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला ll४ll

छत्रपती शिवाजी महाराज की जय!

शिवरायांची आरती l shivarayanchi aarati l Aarati of Shivaji Maharaj in Marathi by Swatantryavir Vinayak Damodar Savarkar.

हेही वाचा: मराठी मंगलाष्टके l विवाह मंगलाष्टके l लग्न मंगलाष्टके l Marathi Vivah Mangalshtake

शिवाजी महाराज गारद l Shivaji Maharaj Garad in Marathi

आस्ते कदम
आस्ते कदम
आस्ते कदम…
महाराssssज..

गडपती, गजअश्वपती, भुपती, प्रजापती..
सुवर्णरत्नश्री पती..
अष्टवधान जागृत, अष्टप्रधान दैष्टीत
न्यायालंकार मंडीत, शस्रास्रशास्र पारंगत

राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर
क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर

महाराजाधिराज…
राजा शिव छत्रपती महाराजांचा
विजय असो

छत्रपती शिवाजी महाराज की जय!

शिवरायांची आरती l shivarayanchi aarati l Aarati of Shivaji Maharaj in Marathi by Swatantryavir Vinayak Damodar Savarkar.

हेही वाचा: मारुती स्तोत्र l Maruti Stotra in Marathi

Leave a comment