मारुती स्तोत्र l Maruti Stotra in Marathi

मारुती स्तोत्र l Maruti Stotra in Marathi

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रहो केव्हाही कोणतीही मोठी गोष्ट करायची असेल, काही जास्त शक्तीचं किंवा ताकदीचं काम करायचं असेल तेव्हा आपल्या तोंडातून आपसूक बाहेर येणारे शब्द असतात ‘जय बजरंगबली’ किंवा ‘जय हनुमान’!  अशा या आपल्या सर्वांच शक्तीचं स्फूर्तीस्थान, बलोपासनेचं दैवत असलेल्या मारूतीरायाचं, श्री मारुती स्तोत्र Maruti stotra in Marathi आज आपण वाचणार आहोत. सतराव्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी या स्तोत्राची रचना केली.

Maruti stotra in Marathi

हेही वाचा: गणपती अथर्वशीर्ष l Ganpati Atharvashirsh in Marathi

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||

महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ||२||

दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा |
पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ||४||

ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें |
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||

ब्रह्मांडे माईलें नेणों, आवळे दंतपंगती |
नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||

पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरीं |
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू |
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे |
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९||

आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती |
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||

अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे |
तयासी तुळणा कोठे, मेरू मंदार धाकुटे ||११||

ब्रह्मांडाभोवतें वेढें, वज्रपुच्छें करू शकें |
तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||

आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा |
वाढतां वाढतां वाढें, भेदिलें शून्यमंडळा ||१३||

धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही |
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही |
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||

हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळागुणें ||१६||

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू |
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||

॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।

तर श्री मारुती स्तोत्र l Maruti stotra in Marathi वाचून तुम्हीही श्री मारुतीची उपासना करणार ना.

हेही वाचा: श्रीराम जय राम जय जय राम l रामाची आरती l Shriram Aarati in Marathi

मारुती स्तोत्र l Maruti Stotra in Marathi

हेही वाचा: व्यायाम करताना हृदयाची गती किती असावी? Ideal rate of heart beat during exercise in Marathi

Leave a comment