मराठी महिने आणि भारतीय ऋतू l Marathi months and Indian seasons in Marathi

मराठी महिने आणि भारतीय ऋतू l Marathi months and Indian seasons in Marathi
नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो महिने म्हटलं की जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर असे इंग्रजी महिने लगेच समोर येतात परंतु मराठी महिने म्हटलं की आपली गाडी थोडी अडते. त्यासोबतच ऋतू म्हटलं की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे अगदी आपल्या तोंडपाठ परंतु आपले भारतीय ऋतू फारच थोड्या लोकांना माहीत असतात. याच मराठी महिन्यांची, आपल्या ऋतूंची आणि इंग्रजी महिन्यांशी त्यांचा असलेला संबंध याची आपण या लेखात माहिती घेणार आहोत.

हेही वाचा: प्राण्यांची मराठी नावे l Animals names English to Marathi

मराठी महिने आणि भारतीय ऋतू

पुढील कोष्टक पाहिल्यानंतर तुम्हाला मराठी महिने भारतीय ऋतू आणि ते कोणत्या इंग्रजी महिन्यांमध्ये येतात त्यांची साधारण माहिती मिळेल. मराठी वर्ष गुढीपाडव्याने म्हणजेच पहिला मराठी महिना चैत्र ने सुरू होते आणि शेवटचा मराठी महिना फाल्गुनने की ज्यामध्ये होळी पौर्णिमा असते संपते.

अ. क्र. मराठी महिना ऋतू मुख्य ऋतू इंग्रजी महीने
चैत्र वसंत उन्हाळा मार्च-एप्रिल
वैशाख एप्रिल-मे
ज्येष्ठ ग्रीष्म पावसाळा मे-जून
 आषाढ जून-जुलै
श्रावण वर्षा जुलै-ऑगस्ट
भाद्रपद ऑगस्ट-सप्टेंबर
आश्विन शरद हिवाळा सप्टेंबर-ऑक्टोबर
कार्तिक ऑक्टोबर-नोहेंबर
मार्गशीर्ष  हेमंत नोहेंबर-डिसेंबर
१० पौष डिसेंबर-जानेवारी
११  माघ शिशिर उन्हाळा जानेवारी-फेब्रुवारी
१२ फाल्गुन फेब्रुवारी-मार्च
मराठी महिने आणि दिवस किंवा तिथी (Marathi months and days or Tithi)

मराठी महिन्यांमधले दिवस हे तिथीनुसार ठरतात. आता तिथी म्हणजे नक्की काय? तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणावरून तिथी ठरवली जाते. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणार्‍या काळास आपण एक महिना किंवा चंद्रमास असे म्हणतो. ज्या दिवशी चंद्र पृथ्वीवरून अजिबात दिसत नाही त्या दिवसाला आपण अमावस्या (No moon) म्हणतो आणि त्या दिवशी महिना बदलतो. त्यानंतर पुढील पंधरा दिवस चंद्र कलेकलेने वाढत जाऊन पंधरा दिवसांनी तो पूर्ण दिसतो. या दिवसाला पौर्णिमा (Full moon) म्हणतात. या पंधरा दिवसांच्या काळाला शुद्ध पक्ष किंवा शुक्लपक्ष (shukla paksha) असे म्हणतात. यामध्ये पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा आणि शेवटचा दिवस म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमेनंतर चंद्र कलेकलेने कमी होत जातो आणि पंधरा दिवसांनी अमावस्येला तो पूर्ण दिसेनासा होतो या पंधरा दिवसांच्या काळाला कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष (krishna paksha) असे म्हणतात. आमावस्येला महिना संपतो.

हेही वाचा: मिलियन, बिलियन, ट्रिलियन म्हणजे नक्की किती? How much is Million, Billion, Trillion exactly in Marathi.

मराठी महिन्यातील तिथी (Tithi in Marathi months)

मराठी महिन्यातील तिथी पुढीलप्रमाणे

शुद्ध पक्ष किंवा शुक्लपक्ष (shukla paksha)        कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष (krishna paksha)
दिवस तिथी दिवस तिथी
 शुद्ध प्रतिपदा १६ वद्य प्रतिपदा
 शुद्ध द्वितीय १७ वद्य द्वितीय
 शुद्ध तृतीया १८ वद्य तृतीया
 शुद्ध चतुर्थी १९ वद्य चतुर्थी
 शुद्ध पंचमी २० वद्य पंचमी
 शुद्ध षष्ठी २१ वद्य षष्ठी
 शुद्ध सप्तमी २२ वद्य सप्तमी
 शुद्ध अष्टमी २३ वद्य अष्टमी
 शुद्ध नवमी २४ वद्य नवमी
१०  शुद्ध दशमी २५ वद्य दशमी
११  शुद्ध एकादशी २६ वद्य एकादशी
१२  शुद्ध द्वादशी २७ वद्य द्वादशी
१३  शुद्ध त्रयोदशी २८ वद्य त्रयोदशी
१४  शुद्ध चतुर्दशी २९ वद्य चतुर्दशी
१५ पौर्णिमा ३० अमावस्या
मराठी किंवा भारतीय महीने (Marathi or Indian months)
चैत्र महिना (Chaitra):

मराठी वर्षाची सुरुवात या महिन्याने होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच मराठी वर्षाचा पहिला दिवस अर्थातच गुढीपाडवा या सणाने या महिन्याची सुरुवात होते. इंग्रजी कॅलेंडरनुसार मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये हा मराठी महिना येतो.

वैशाख महिना (Vaishakh):

मराठी वर्षाचा दुसरा महिना. अक्षय तृतीया बैसाखी असे काही मुख्य सांगण्यामध्ये येतात. इंग्रजी कॅलेंडरनुसार एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान हा महिना येतो.

ज्येष्ठ महिना (Jyestha):

मराठी वर्षाचा तिसरा महिना. या महिन्यामध्ये ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा जवळच साजरे केले जाते हे महिलांचे व्रत साजरे केले जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार मे ते जून महिन्यांमध्ये हा मराठी महिना येतो.

आषाढ महिना (Aashadh):

मराठी वर्षाचा चौथा महिना. जोरदार पावसाचा पावसाचा महिना म्हणून हा महिना ओळखला जातो. आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशी हे मुख्य उत्सव या महिन्यांमध्ये येतात.  इंग्रजी कॅलेंडरनुसार जून ते जुलै महिन्याच्या दरम्याने हा महिना येतो.

श्रावण महिना: (Shravan):

मराठी वर्षाचा पाचवा महिना. ऊन पावसाचा खेळ दाखवणारा महिना म्हणजे श्रावण महिना. तसेच आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र महिना म्हणजेच श्रावण महिना. नागपंचमी, या महिन्याची पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, दहीहंडी  असे अनेक सण या महिन्यांमध्ये साजरे केले जातात. महाराष्ट्रात मंगळागौर हे व्रत प्रामुख्याने या महिन्यात केले जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार जुलै ते ऑगस्ट महिन्यांच्या दरम्याने हा महिना येतो.

भाद्रपद महिना (Bhadrapada):

मराठी वर्षाचा सहावा महिना. भाद्रपद म्हटलं की गणपती बाप्पा मोरया हे समीकरण आलंच. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा गणेशोत्सव हे या महिन्याचे प्रमुख वैशिष्ट्य. त्यासोबतच भाद्रपदाचा उत्तरार्ध म्हणजेच कृष्णपक्ष हा पितृपंधरवडा म्हणून याच महिन्यात पाळला जातो. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यांच्या दरम्याने येतो.

अश्विन महिना (Aashwin):
मराठी वर्षाचा हा सातवा महिना. आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच घटस्थापने पासून पुढे नऊ दिवस नवरात्र उत्सव या महिन्यात साजरा होते.  आणि दहाव्या दिवशी दसरा किंवा विजयादशमी हा एक मोठा सण याच महिन्यात आपण साजरा करतो. अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून आपण साजरी होते. हिंदू धर्मामधला सगळ्यात मोठा सण दिवाळी हा देखील याच महिन्याच्या शेवटी येतो. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन हे महत्त्वाचे मुहूर्त यादरम्याने येतात. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्याच्या दरम्यान येतो.
कार्तिक महिना (Kartik):
मराठी वर्षातला हा आठवा महिना. दिवाळीतील भाऊबीज आणि दिवाळी पाडवा हे दोन सण या महिन्याच्या सुरुवातीला येतात. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान येतो.
मार्गशीर्ष महिना (Margashirsha): 
मराठी वर्षातला हा नववा महिना. भारतीय कॅलेंडरमध्ये या महिन्याला अग्रहायण म्हणून ओळखले जाते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस देव दिवाळी किंवा मोठी दिवाळी म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महिलावर्ग गुरुवार चे व्रत आचरतो. मार्गशीर्ष पौर्णिमा ही दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांच्या दरम्यान येतो.
पौष महिना (Paush): 
मराठी वर्षातला दहावा महिना. पौष महिना त्यामानाने कमी सण-उत्सव असलेला महिना. मकर संक्रांती या महिन्यात साजरी होते. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना डिसेंबर ते जानेवारी या महिन्यांच्या दरम्यान येतो.
माघ महिना (Magh):
मराठी वर्षातला अकरावा महिना. हा महिना थंडीचा महिना म्हणून ओळखला जातो. भगवान शंकराचा मोठा उत्सव महाशिवरात्री या महिन्यात साजरी केली जाते. तसेच काही ठिकाणी माघी गणेशोत्सव देखील याच महिन्यात साजरा केला जातो. इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्याने हा महिना येतो.
फाल्गुन महिना (Falgun):
मराठी वर्षातला हा बारावा म्हणजे शेवटचा महिना. या महिन्यातली पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून साजरी होते. त्यासोबतच धुलीवंदन, रंगपंचमी हे सण या महिन्यात साजरे होतात. कोकणातील शिमगा हा मुख्य उत्सव देखील याच महिन्यात साजरा होतो. इंग्रजी कॅलेंडरनुसार फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात हा महिना येतो.
भारतीय ऋतू (Indian Seasons)
वसंत ऋतू (Vasant Rutu or spring)

मराठी महिने – चैत्र, वैशाख

निसर्गातील नवचैतन्य या ऋतूत बहरून येते. झाडांना नवी पालवी येते आणि जगण्याची नवी उमेद घेऊन सगळा निसर्ग बहरू लागतो. कोकिळीचे सुस्वर कुजन याच ऋतूची खासियत.

ग्रीष्म ऋतू (Grishma Rutu or Summer)

मराठी महिने- ज्येष्ठ, आषाढ

भारतातील काही भागात पाऊस तर काही ठिकाणी उष्मा हे या ऋतूचे वैशिष्ट्य.

वर्षा ऋतू (Varsha Rutu or Monsoon )

मराठी महिने- श्रावण, भाद्रपद

हा पावसाचा मुख्य ऋतू. आपल्या भारतावर्षात मान्सून चे आगमन होते आणि आणि सर्वत्र सुखद गारवा पसरतो. धरती हिरवा साज घेते.  आणि शेतकरी वर्ग शेतीच्या कामात गुंततो.

शरद ऋतू (Sharad Rutu or Autumn)

मराठी महिने-अश्विन, कार्तिक

शरदाचे चांदणं ही या ऋतूची ओळख. पावसानंतरचं नितळ आकाश आणि चांदणे अनुभवायचा हा ऋतू.

हेमंत ऋतू (Hemant Rutu or Winter)

मराठी महिने- मार्गशीर्ष, पौष

आल्हाददायक थंडी घेऊन येणारा हा ऋतू.

शिशिर ऋतू (Shishir Rutu or Winter)

मराठी महिने- माघ, फाल्गुन

काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी वातावरणातील उष्मा वाढवणारा हा ऋतू. झाडांची पानगळ हे या ऋतूचे वैशिष्ट्य.

हेही वाचा: मिलेनिअल म्हणजे काय? जनरेशन झेड म्हणजे काय? What is Millennial? What is Gen Z? in Marathi

Leave a comment