वारंवार सर्दीची पाच कारणं l Five reasons for getting frequent cold in Marathi

वारंवार सर्दीची पाच कारणं l Five reasons for getting frequent cold in Marathi

नमस्कार मित्रहो! सर्दी हा तसा काही गंभीर आजार नाही आणि मला सर्दी झालीच नाही असं म्हणणारा देखील कोणी सापडणार नाही पण तरीदेखील वारंवार होणारी सर्दी ही केव्हाही त्रासदायकच. म्हणूनच या लेखात आपण वारंवार सर्दी होण्याची पाच कारणं l Five reasons for getting frequent cold in Marathi पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला सर्दी होण्यापासून स्वतःला दूर ठेवता येईल.

Five reasons for getting frequent cold in Marathi

सतत नाक गळणं, वारंवार शिंका, घसादुखी, घशाची खवखव, नाक चोंदणे जोडीला डोकेदुखी आणि ताप ही आहेत सर्दीची लक्षणं. सर्दी मुख्यत्वे दोन प्रकारची असते-

सर्दीचे प्रकार
१. अ‍ॅलर्जीमुळे होणारी सर्दी:

प्रत्येकाच्या शरीराला कसली न कसली अ‍ॅलर्जी असते आणि ज्या घटकामुळे ही अ‍ॅलर्जी उद्भवते तो घटक जर शरीरात गेला तर आपल्याला सर्दी होते.

२. जंतुसंसर्गामुळे होणारी सर्दी:

बाहेर फिरताना अनेकदा आपल्या हातांचा स्पर्श अनेक ठिकाणी होत असतो जिथून जंतुसंसर्गाचा मोठा धोका असतो. हे जंतु मग आपल्या शरीरात प्रवेश करून सर्दीच कारण बनतात. काही जणांना होणारा सर्दीचा त्रास हा ५-६ दिवसांपूर्ता मर्यादित असतो तर काही जणांना होणारी सर्दी महिना महिना जात नाही. पण ही सर्दी नेमकी होते तरी कशी किंवा असते तरी काय?

आपलं नाक आणि तोंड यातून आपल्या शरीरात अनेक बाह्य घटक प्रवेश करतात. यात चांगले वाईट सगळेच घटक आले. त्यातले जे घटक वाईट किंवा शरीराला मारक असतात ते रोखण्यासाठी शरीराने केलेली व्यवस्था म्हणजे सर्दी. धूळ, विषाणू, हवेतील प्रदूषणकारी घटक यांचा आपल्या शरीराला त्रास होतो आणि ते जेव्हा आत येतात तेव्हा नाकातील एक नैसर्गिक यंत्रणा कार्यान्वित होते. नाकाच्या त्वचेतून श्लेष्म म्हणजेच म्युकस स्त्रवतो की जो या घटकांना रोखून धरतो आणि पुन्हा शरीराच्या बाहेर टाकतो. आणि याचदरम्याने सतत नाक गळणं, वारंवार शिंका, घसादुखी, घशाची खवखव, नाक चोंदणे ही सर्दीची लक्षणं कमी अधिक प्रमाणात सर्वांमध्ये आढळतात. हे सगळच आपल्यासाठी खूप त्रासदायक, कंटाळवाणी ठरतं.

चला तर मग सर्दीची ती पाच कारणं Five Reasons for getting frequent cold बघूया आणि रोजच्या आयुष्यात ही कारणं टाळण्याचा प्रयत्न करूया.

हेही वाचा: व्यायाम करताना हृदयाची गती किती असावी? Ideal rate of heart beat during exercise in Marathi

सर्दीची कारणं
१. अनियमित/ अपुरी झोप:

वारंवार सर्दी होण्याचं  हे प्रमुख कारण आहे. साधारणपणे माणसाला निरोगी आरोग्यासाठी  ७-८ तासांच्या शांत झोपेची आवश्यकता असते. परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवनात, जॉब च्या वेळा सांभाळत ही झोप मिळणं फार मुश्किल झालंय आणि ज्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती कमी होते आणि आपल्याला वारंवार सर्दीला तोंड द्यावं लागतं. म्हणूनच ७-८ तास शांत झोप मिळण्यासाठी प्रयत्नशील रहा.

२. ताणतणाव आणि धावपळ:

सध्याच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्याच्या नादात आपली सध्याची जीवनशैली प्रचंड धावपळीची झालेय. कामाच्या मोठ्या आणि अयोग्य वेळा, रोजचा तासंतास होणारा प्रवास, जेवणाचं बिघडलेलं वेळापत्रक, कामाच्या डेड लाईन्स, कौटुंबिक जबाबदार्‍या या सगळ्याचा प्रचंड ताण आपल्या शरीरावर येतो.  ज्याचा थेट परिणाम आपल्या रोग प्रतिकार शक्तीवरती होऊन आपण सहजपणे कुठल्याही आजाराला बळी पडतो. त्यामुळे शक्य तेवढं प्रयत्नपूर्वक आपण ही धावपळ कमी केली पाहिजे म्हणजे आपल्या शरीरावरचा ताण कमी होऊन त्याची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल.

३. अयोग्य आहार:

सततच हॉटेलिंग, बाहेरच खाणं, जंकफूड, मसालेदार आणि चमचमीत पदार्थ, मैदा आणि तेलाचा जास्त वापर असलेले पदार्थ यांचं सातत्याने सेवन या गोष्टी आपल्या प्रकृतीवर आणि पर्यायाने रोग प्रतिकार शक्तीवरती परिणाम करतात ज्याची परिणीती सततच्या सर्दीत होते. म्हणूनच ताजे, सकस अन्न, ऋतुमानानुसार फळे, हिरव्या भाज्या, सॅलड यांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करा.

४. हवामानातील बदल:

हल्ली उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हा ऋतूंचा क्रम जरी बदलला नसला तरी अधेमधे पडणारा पाऊस, तीव्र ऊन यांनी हवामानात बर्‍याचदा अचानक बदल होतात. ज्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या तब्येतीवर होतो. म्हणूनच पावसात सतत भिजणं, भर दुपारच्या उन्हातल काम टाळा. शक्य असेल तेव्हा आपलं शरीर सरंक्षक गोष्टी जसं की मास्क, हातमोजे, लांब हाताचे शर्ट, बूट वापरा जेणेकरून आपली तब्येत ठणठणीत राहील.

हेही वाचा: पेन किलर चे साईड इफेक्ट्स l Side effects of painkiller in Marathi

५. स्वछता :

आपल्या शरीराची विशेषकरून हातांची स्वछता खूप महत्वाची आहे. कळत नकळत आपल्या हातांचा स्पर्श अनेक ठिकाणी होत असतो जिथून जंतुसंसर्गाचा मोठा धोका असतो. हे जंतु मग आपल्या शरीरात प्रवेश करून सर्दीच कारण बनतात. परंतु आपण वेळोवेळी साबणाने हात स्वछ धुतल्यास हा धोका खूप कमी होतो.

ही वारंवार सर्दीची पाच कारणं Five Reasons for getting frequent cold आपण जर लक्षात घेतलीत आणि वेळीच योग्य काळजी घेतली तर आपण नेहमीच निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्याचा आस्वाद घेऊ शकता.

वारंवार सर्दीची पाच कारणं l Five reasons for getting frequent cold in Marathi

हेही वाचा: मुलगा की मुलगी काय आहे विज्ञान? Baby boy or girl What is science in Marathi

Leave a comment