रंगांची नावे मराठी आणि इंग्लिश l Colours names in Marathi and English

रंगांची नावे मराठी आणि इंग्लिश l Colours names in Marathi and English

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो एखादा जुना ब्लॅक अँड व्हाइट व्हिडिओ किंवा फोटो बघितला आणि मग आत्ताचा एखादा रंगीत व्हिडिओ बघितला की रंग आणि त्यांची किमया काय हे आपल्या लगेच लक्षात येते. एखादी गोष्ट तिच्या रंगावरून आपली आवडती किंवा नावडती होऊन जाते. रंग म्हणजे आनंद, रंग म्हणजे सुख! आपल्या रोजच्या जगण्यातल्या ज्या काही आनंददायी, मंगलमय गोष्टी आहेत त्यामध्ये रंग अग्रक्रमाने येतात. विविध रंगी फळे, फुले, प्राणी, पक्षी, फुलपाखरे असा सगळाच निसर्ग आणि पदार्थ, कपडे, खेळणी अशा अनेक गोष्टी रंगांमुळे आकर्षक वाटतात. सप्तरंगांनी मोहवणारे इंद्रधनुष्य, सोनेरी सूर्यकिरणे, लालभडक गुलमोहर, पिवळा धम्मक लाडू, पांढराशुभ्र बगळा किंवा अगदी काळाकुट्ट अंधार ही सारी याच रंगांची किमया! अशाच काही रंगांची इंग्लिश आणि मराठी मधील नावे आणि त्यांचे उच्चार या लेखात आपण बघणार आहोत.

हेही वाचा: फुलांची नावे मराठी आणि इंग्लिश l Flowers names in Marathi and English

रंगांची नावे मराठी आणि इंग्लिश l Colours names in Marathi and English

अ. क्र. इंग्लिश (English) मराठी उच्चार (Marathi Pronounciation) मराठी (Marathi) इंग्लिश उच्चार (English Pronounciation)
White व्हाईट पांढरा Pandhara
Black ब्लॅक काळा Kala
Red रेड लाल Lal
Green ग्रीन हिरवा Hirava
Yellow यल्लो पिवळा Pivala
Blue ब्लू निळा Nila
Violet वोईलेट जांभळा Jambhala
Purple पर्पल जांभळा Jambhala
Pink पिंक गुलाबी Gulabi
१० Orange ऑरेंज केशरी Keshari
११ Saffron सॅफ्रॉन भगवा Bhagava
१२ Golden गोल्डन सोनेरी Soneri
१३ Silver सिल्वर चंदेरी Chanderi
१४ Brown ब्राऊन तपकिरी Tapkiri
१५ Grey ग्रे राखाडी Rakhadi
१६ Navy Blue नेव्ही ब्लू नेव्ही ब्लू Navy Blue
१७ Ivory आयव्हरी हस्तिदंती Hastidanti
१८ Sky blue स्काय ब्लू आकाशी निळा Aakashi Nila
१९ Magenta मॅग्ंनेंटा किरमिजी Kirmiji
२० Bronze ब्रॉन्झ कांस्य Kansya
२१ Cyan सायन निळसर Nilasar
२२ Lime green लाईम ग्रीन पोपटी Popati
२३ Lavender लॅव्हेंडर लॅव्हेंडर Lavender
२४ Maroon मरून लाल तपकिरी Lal Tapakiri
२५ seafoam green सिफोम ग्रीन चिंतामणी Chintamani

 

हेही वाचा: मराठी महिने आणि भारतीय ऋतू l Marathi months and Indian seasons in Marathi

रंगांची नावे मराठी आणि इंग्लिश l Colours names in Marathi and English

Leave a comment