नमस्कार!! yugmarathi.com वर आपणा सर्व मराठीप्रेमींच खूप मनापासून स्वागत आहे. ‘वाचाल तर वाचाल’ असं म्हणतात. शिक्षणाच्या कितीही पदव्या मिळवल्या तरी माणसाची जडण घडण होण्यात त्याची वाचनाची आवड खूप मोठी भूमिका बजावते. कथा, कविता, ललित, कादंबऱ्या, माहितीपर लेख अशा नानाविध मार्गांनी वाचन आपल्या जाणिवा समृद्ध करत असतं आणि एक सुसंस्कारी, संवेदनशील माणूस म्हणून आपण घडत जातो.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सगळ्याच क्षेत्रात संगणक-मोबाईल-इंटरनेट या त्रयींनी क्रांती केलेय. त्यात साहित्य तरी कसे मागे राहील. पूर्वी वाचनालयात जाऊन पुस्तकात रमणारी पिढी ते आता कुठेही बसून फावल्या वेळात आपल्या स्मार्ट फोनवर काही न काही वाचणारी पिढी हे स्थित्यंतर आपण अनुभवतोय. मात्र अजूनही आपल्या माय मराठीतील साहित्य संपदा म्हणावी तशी इंटरनेट वर उपलब्ध नाही. नवीन पिढीला आपल्या मराठी साहित्य संपदेकडे वळवायचे असेल तर त्यांना त्यांच्या माध्यमात विपुल साहित्य उपलब्ध करून देणं महत्वाचं. आणि हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन आम्ही या वेबसाईट च्या माध्यमातून आपल्या मराठी भाषेतून विविध क्षेत्रातील माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.
तुम्हाला आमच्या युगमराठी वरचे लेख, माहिती आवडत असेल तर सर्वांना सांगा! त्यांना शेअर करा. आणि काही उणिवा असतील, मार्गदर्शनपर सूचना असतील तर नक्की आम्हाला कळवा. चला तर मग युगमराठी च्या साथीने आपल्या ज्ञानाकक्षा वाढवूया, जाणिवा समृद्ध करूया!!
For any Suggestions or Enquirers please contact us on- yugmarathi21@gmail.com