ओटीपी, क्यू आर कोड, पॅन अशा काही महत्त्वाच्या शब्दांचे फूल फॉर्म l Full forms of some important terms like OTP, QR code, PAN in Marathi
नमस्कार मित्रांनो yugmarathi.com वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत.
मित्रांनो सध्याचं आपलं आयुष्य विज्ञान- तंत्रज्ञानाने पार बदलून टाकलं आहे. आणि त्यामुळे अनेक नवनव्या गोष्टी आपण रोजच्या आयुष्यात स्वीकारत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे याच विज्ञान- तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक नवनवीन संज्ञा (टर्म्स)आपण अगदी रोजच्या रोज वापरत असतो, जसे की ओटीपी, पॅन, क्यू आर कोड. अर्थातच हे सारे इंग्लिश शब्द आहेत पण आपल्या जगण्याचाच ते आता भाग बनून गेलेत. अशाच काही महत्त्वाच्या शब्दांची आपण या लेखात माहिती घेणार आहोत.
हेही वाचा: मिलेनिअल म्हणजे काय? जनरेशन झेड म्हणजे काय? What is Millennial? What is Gen Z? in Marathi
काही महत्त्वाच्या शब्दांचे फूल फॉर्म l Full forms of some important terms in Marathi
शॉर्ट फॉर्म (इंग्लिश) | शॉर्ट फॉर्म (मराठी) | फूल फॉर्म (इंग्लिश) | फूल फॉर्म (मराठी) |
PAN | पॅन | Permanent Account Number | परमनंट अकाऊंट नंबर |
KYC | के वाय सी | Know Your Customer | नो युवर कस्टमर |
OTP | ओटीपी | One Time Password | वन टाईम पासवर्ड |
PIN | पिन | Personal Identification Number | पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर |
QR code | क्यू आर कोड | Quick Response code | क्विक रिस्पॉन्स कोड |
SMS | एस एम एस | Short Message Service | शॉर्ट मॅसेज सर्व्हिस |
MMS | एम एम एस | Multimedia Messaging Service | मल्टीमिडिया मॅसेजिंग सर्व्हिस |
WWW | डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु | World Wide Web | वर्ल्ड वाईड वेब |
URL | यू आर एल | Uniform Resource Locator | युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर |
GPS | जी पी एस | Global Positioning System | ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम |
WiFi | वायफाय | Wireless Fidelity | वायरलेस फिडेलिटी |
GIF | जी आयएफ | Graphics Interchange Format | ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट |
JPEG | जे पी ई जी | Joint Photographic Experts Group | जॉइंट फोटोग्राफिक एक्स्पर्ट गृप |
PNG | पी एन जी | Portable Network Graphics | पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स |
पी डी एफ | Portable Document Format | पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट |
ओटीपी म्हणजे काय? What is OTP in Marathi
OTP (ओटीपी): One Time Password (वन टाईम पासवर्ड)
वापरकर्ता म्हणजेच युजर (user) ची खात्री करण्यासाठी आणि विविध ऑनलाइन अकाऊंट ला सुरक्षित लॉग इन करण्यासाठी ओटीपी वापरला जातो. हा ओटीपी म्हणजेच एक कोड नंबर आपल्या मोबाईल वरती येतो आणि तो केवळ एकदाच पासवर्ड म्हणून वापरला जातो. त्यामुळे संपूर्ण सुरक्षितपणे ऑनलाइन व्यवहार पूर्ण करण्यास मदत होते.
पिन म्हणजे काय? What is PIN in Marathi
PIN पिन: Personal Identification Number पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर
एटीएम किंवा क्रेडिट कार्ड चा वापर करताना पासवर्ड म्हणून जो छोटा नंबर आपण वापरतो त्याला पिन असे म्हणतात.
क्यू आर कोड म्हणजे काय? What is QR code in Marathi
QR code क्यू आर कोड Quick Response code क्विक रिस्पॉन्स कोड
एखाद्या गोष्टीची लिंक या कोडद्वारे देता येते की जी वापरकर्त्याला केवळ स्कॅन करून वापरता येते.
एस एम एस म्हणजे काय? What is SMS in Marathi
SMS एस एम एस : Short Message Service शॉर्ट मॅसेज सर्व्हिस
मोबाईलवरून छोटा संदेश देण्यासाठी याचा वापर होतो.
एम एम एस म्हणजे काय? What is MMS in Marathi
MMS एम एम एस : Multimedia Messaging Service मल्टीमिडिया मॅसेजिंग सर्व्हिस
फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्यासाठी याचा वापर होतो.
वायफाय म्हणजे काय? What is WiFi in Marathi
WiFi वायफाय: Wireless Fidelity वायरलेस फिडेलिटी
हल्ली सर्वत्र उपलब्ध असलेले वायरलेस इंटरनेट वायफाय द्वारेच आपल्याला मिळते.
जीआयएफ म्हणजे काय? What is GIF in Marathi
GIF जीआयएफ : Graphics Interchange Format ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट
छोट्या ग्राफिकल इमेजेस ना जीआयएफ असे म्हणतात.
जी पी एस म्हणजे काय? What is GPS in Marathi
GPS जी पी एस: Global Positioning System ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम
आपल्या मोबाइल मध्ये असलेली गुगल मॅप सारखी पत्ता शोधण्यास किंवा रस्ते दाखविण्यास मदत करणारी यंत्रणा जी पी एस च्या आधारे चालते. अवकाशीय उपग्रहांच्या मदतीने ही यंत्रणा काम करते.
के वाय सी म्हणजे काय? What is KYC in Marathi
KYC के वाय सी : Know Your Customer नो युवर कस्टमर
आपल्या कस्टमर ची म्हणजेच ग्राहकाची योग्य माहिती घेऊन खातरजमा करण्यासाठी केवायसी चा वापर होतो.
पी डी एफ म्हणजे काय? What is PDF in Marathi
PDF पी डी एफ: Portable Document Format पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट
एखादं डॉक्युमेंट फायनल झाल्यानंतर त्याचं फॉरमॅटिंग कायम रहावे म्हणून ते पी डी एफ फॉरमॅट मध्ये सेव्ह केले जाते. पी डी एफ फॉरमॅट मध्ये सेव्ह केल्यानंतर त्या डॉक्युमेंट मध्ये कोणतेही बादल होत नाहीत.
पी एन जी म्हणजे काय? What is PNG in Marathi
PNG पी एन जी : Portable Network Graphics पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स
फोटो फाइल सेव्ह करण्याचा हा एक प्रकार आहे.
जे पी ई जी म्हणजे काय? What is JPEG in Marathi
JPEG जे पी ई जी : Joint Photographic Experts Group जॉइंट फोटोग्राफिक एक्स्पर्ट गृप
फोटो फाइल सेव्ह करण्याचा हा एक प्रकार आहे.
यू आर एल म्हणजे काय? What is URL in Marathi
URL यू आर एल : Uniform Resource Locator युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर
प्रत्येक वेबसाइट चा अचूक पत्ता म्हणजे यू आर एल. आपण एखादी वेबसाइट सर्च केल्यानंतर सर्च बार मध्ये जी संपूर्ण लिंक दिसते ती म्हणजेच यू आर एल.
डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु म्हणजे काय? What is WWW in Marathi
WWW डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु: World Wide Web वर्ल्ड वाईड वेब
प्रत्येक वेबसाइटची सुरुवात डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु ने होते.
पॅन म्हणजे काय? What is PAN in Marathi
PAN पॅन: Permanent Account Number परमनंट अकाऊंट नंबर
सर्व आर्थिक गोष्टी या कार्डशी जोडलेल्या असतात.
ओटीपी, क्यू आर कोड, पॅन अशा काही महत्त्वाच्या शब्दांचे फूल फॉर्म l Full forms of some important terms like OTP, QR code, PAN in Marathi