पसायदान एक विश्वप्रार्थना l Pasayadan a universal prayer in Marathi
नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. आपल्या महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे, म्हणूनच ही भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच संत परंपरेचे शिरोमणी म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली. ‘ज्ञानेश्वरी’ लिहून त्यांनी आपल्या भगवद्गीतेचे ज्ञान मराठी जनांसाठी खुले केले आणि पसायदान लिहून अखिल विश्वातील प्राणिमात्रांच्या कल्याणसाठी प्रार्थना केली. हीच प्रार्थना येथे देत आहोत.
हेही वाचा: विठ्ठलाची-विठोबाची-पांडुरंगाची आरती l Vithhal-Vithoba-Pandurang Aarati in Marathi
पसायदान एक विश्वप्रार्थना l Pasayadan a universal prayer in Marathi
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ ८ ॥
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥
हेही वाचा: गणपती अथर्वशीर्ष l Ganpati Atharvashirsh in Marathi
पसायदान एक विश्वप्रार्थना l Pasayadan a universal prayer in Marathi