विठ्ठलाची-विठोबाची-पांडुरंगाची आरती l Vithhal-Vithoba-Pandurang Aarati in Marathi
नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. आपल्या महाराष्ट्रचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या आरत्या आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत.
युगें अठ्ठावीस विटेवरी उभा l Yuge atthavis vitevari ubha in Marathi
युगें अठ्ठावीस विटेवरी उभा |
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा |
पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मा आले गा |
चरणी वाहे भीमा उद्धरी जागा ||१||
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा ||धृ||
तुळसीमाळा गळां कर ठेवुनी कटी |
कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी |
देव सुरवर नित्य येती भेटी |
गरुड हनुमंत पुढें उभे राहती ||
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा||२ ||
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा |
सुवर्णाची कमळे वनमाळा गळां |
राई रखुमाबाई राणीया सकळा |
ओवाळिती राजा विठोबा सावळा |
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा||३||
ओवाळूं आरत्या कुर्वंड्या येती |
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती |
दिंड्या पताका वैष्णव नाचती |
पंढरीचा महिमा वर्णावा किती ||
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा||४||
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती
दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती
केशवासी नामदेव भावें ओवाळिती
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा||५||
हेही वाचा: श्रीराम जय राम जय जय राम l रामाची आरती l Shriram Aarati in Marathi
येई हो विठ्ठले माझे माऊली ये l Yei ho vithhale maze mauli ye in Marathi
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥
आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ १ ॥
पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ २ ॥
विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ ३ ॥
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ ४ ॥
विठ्ठलाची-विठोबाची-पांडुरंगाची आरती l Vithhal-Vithoba-Pandurang Aarati in Marathi
हेही वाचा: गणपती अथर्वशीर्ष l Ganpati Atharvashirsh in Marathi