वॉरेन बफे यांचे प्रेरणा देणारे विचार l Inspirational thoughts of Warren Buffett in Marathi

वॉरेन बफे यांचे प्रेरणा देणारे विचार l Inspirational thoughts of Warren Buffett in Marathi

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो पूर्ण जगभरात शेअर मार्केट संबंधातील गुंतवणुकीचे गुरु म्हणून ओळख असलेले वॉरेन बफे आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. शेअर मार्केटमध्ये काही करू पाहणाऱ्या किंवा आर्थिक दृष्ट्या संपन्न होण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधणाऱ्या सर्वांनाच वॉरेन बफे यांचे विचार मार्गदर्शन करतात. जगातल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती व्याख्याने देताना किंवा मुलाखती देताना वॉरेन बफे यांनी वेळोवेळी अनेक गुंतवणूक विषयक, संपत्तीच्या निर्मिती विषयक आणि एकूणच मानवी जीवनाविषयक अनेक मार्गदर्शनपर सल्ले दिलेले आहेत जे आपण आत्मसात केले आणि त्याची आपल्या आयुष्यात अंमलबजावणी केली तर आपण देखील निश्चितच एक यशस्वी गुंतवणूकदार होऊ शकता.

जगप्रसिद्ध शेअर गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचे मार्गदर्शनपर, प्रेरणा देणारे विचार l Inspirational thoughts of Warren Buffett in Marathi

  • पहिला नियम कधीही हार मानू नका, दुसरा नियम म्हणजे पहिला नियम कधीही विसरू नये.

अपयशाला न घाबरता सातत्याने प्रयत्न करत राहण्याबद्दल वॉरेन बफे आपल्याला सांगतात. काहीही झालं तरी आयुष्यात हार न मानता सतत परिश्रम करा, चुका सुधारून पुढे जा यानेच आपण यशस्वी होऊ शकतो.

  • स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक ही सर्वात महत्वाची गुंतवणुक असते.

नेहमीच स्वतःला अपडेट करत राहा. सतत काहीतरी नवीन शिकत रहा. आपल्या शिकण्यासाठी आपल्याला घडवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी करायला कधीही मागू मागे पडू नका जसे की एखादा नवीन कोर्स असेल, एखाद्या नवीन पुस्तकाचं वाचन असेल, एखादा नवीन अनुभव घेणं असेल या गोष्टी करणं म्हणजे स्वतःला सतत डेव्हलप करणं आणि हीच गुंतवणूक सर्वात महत्त्वाची गुंतवणूक असते.

  • आपल्याला न कळणार्‍य व्यवसायात कधीही गुंतवणूक करू नका.
  • धोका तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपल्याला माहित नसते आपण काय करतोय.

ज्या गोष्टीविषयी आपल्याला कोणतीही माहिती नाही अशा गोष्टींमध्ये कधीच उतरू नका. याचाच दुसरा अर्थ असा की जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय किंवा एखादी गुंतवणूक करणार असाल तेव्हा त्याचा सांगोपंग अभ्यास करा, परिपूर्ण ज्ञान मिळवा आणि मगच त्या व्यवसायात उतरा.

  • जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला गरज असलेल्या गोष्टी विकण्याची वेळ येते.

मित्रांनो आपले मासिक आर्थिक नियोजन व्यवस्थित करा. म्हणजेच प्राथमिक गरजा भागवून आपल्याकडे असलेल्या जास्तीच्या पैशांमधून आवश्यक असलेल्या चैनीच्या गोष्टी विकत घ्या. तुम्हाला गरज नसेल आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर उगाचच ब्रँड किंवा मोठेपणाच्या हव्यासापोटी अशा गोष्टी विकत घेऊ नका, अशाने आपले आर्थिक नियोजन बिघडते. कर्ज घेण्याची वेळ येते. आणि त्यात आपण अडकत जातो. आणि शेवटी आपल्याला आपल्याकडच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येते.

आर्थिक नियोजनाचा ५०-३०-२० नियम l 50-30-20 rule of financial planning in Marathi

  • प्रामाणिकपणा ही खूप महागडी वस्तू आहे त्याची हलक्या लोकांकडून अपेक्षा करू नका.

तुम्ही जे काही काम करताय नोकरी असेल, उद्योग धंदा असेल, व्यापार असेल त्यामध्ये स्वतःशी आणि समोरच्या माणसाशी प्रामाणिक राहा. प्रत्येक गोष्ट सचोटीने आणि प्रामाणिकपणे करा त्याचा चांगला परतावा नक्कीच तुम्हाला आयुष्यात मिळतो.

हेही वाचा: पॉन्झी स्कीम म्हणजे नक्की काय? आपला बचाव कसा करायचा? What is Ponzi scheme? How to protect yourself? in Marathi

  • आज कोणीतरी झाडाच्या थंड सावली मध्ये बसलेला आहे, कारण ते झाड खूप वर्षांपूर्वी कोणी तरी लावलेलं होत.

मित्रांनो हा एक प्रकारे आपल्या भग्वद्गीतेतील संदेश आहे. फळाची अपेक्षा न करता आपण आपली कर्मे करत राहावीत. कोणीतरी भूतकाळात घेतलेल्या कष्टाचा फायदा आपल्याला आता होत असतो. त्याच्या उपकरांची जाणीव ठेवा आणि त्याचप्रमाणे आपण केलेला कष्टांचा फायदा देखील कोणाला तरी भविष्यात होणार आहे हे लक्षात घेऊन कर्म करत रहा.

  • पैशाची बचत करण्यासाठी वयाची गरज नसते. कधीही सुरुवात करा.

आयुष्यात संपत्ती निर्माण करायची असेल तर बचत आणि गुंतवणूक फार महत्त्वाची आहे आणि हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हापासून बचत आणि गुंतवणूक करायला सुरुवात करा. यासाठी वयाचा विचार करण्याची गरज नाही. ज्या क्षणी तुम्हाला समजेल तेच तुमच्यासाठी सर्वात योग्य वय आहे असा विचार करा आणि योग्य माहिती आणि मार्गदर्शनाखाली गुंतवणुकीला सुरुवात करा.

  • नेहमी दीर्घकालीन गुंतवणूक करा कारण ती सर्वाधिक फायदा देते.

वॉरेन बफे नेहमीच सल्ला देतात की दीर्घकालीन गुंतवणूक करा म्हणजे ते ट्रेडिंग पेक्षा इन्वेस्टिंग वरती जास्त भर द्यायला सांगतात. आणि जेव्हा तुम्ही चांगले स्टॉक्स दीर्घ मुदतीसाठी विकत घेता तेव्हा अर्थातच त्यांचा खूप मोठा परतावा तुम्हाला मिळतो आणि तुम्ही संपत्ती निर्माण करण्यात यशस्वी ठरता. तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन यासाठी नक्की घ्या आणि गुंतवणूक सुरू करा.

हेही वाचा: शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती l Share Market Information in Marathi

वॉरेन बफे यांचे प्रेरणा देणारे विचार l Inspirational thoughts of Warren Buffett in Marathi

Leave a comment