शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय मग या गोष्टी लक्षात ठेवा l Things to remember while investing in share market in Marathi
सध्या शेअर मार्केट मधील गुंतवणुकीविषयी खूप जास्त चर्चा केली जाते. विशेषतः कोविड आणि लॉकडाउन नंतर तर शेअर मार्केट मधील गुंतवणुक खूप जास्त वाढली आहे असे आकडेवारी सांगते. शेअर मार्केट गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करणारे ऑनलाइन- ऑफलाइन, स्वस्त- महागडे असे अनेक क्लासेस उपलब्ध आहेत. परंतु तरीही अनेकांचा गोंधळ उडालेला असतो आणि त्यातून ते स्वतःचेच नुकसान करून घेत असतात. मित्रांनो आपण कितीही वेगवेगळ्या स्ट्रॅटजी शिकलो, पॅटर्न शिकलो तरीही शेअर मार्केट गुंतवणुकीतील शिस्त आणि त्यासंबंधीचे काही मूलभूत (बेसिक) नियम कधीच बदलत नाहीत. मग हेच नियम वाचा, लक्षात ठेवा आणि त्याची अंमलबजावणी सुरू करा.
हेही वाचा: आर्थिक नियोजनाचा ५०-३०-२० नियम l 50-30-20 rule of financial planning in Marathi
- गुंतवणूक करण्यापूर्वी पैशाचे चांगले नियोजन करा. तुमच्याकडे असलेल्या अधिकच्या पैश्यातूनच ट्रेडिंग सुरु करा. कर्ज काढून किंवा पैसे उसने घेऊन ट्रेडिंग करणे सर्वथा चुकीचे आहे.
- शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा योग्य अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. शेअर मार्केटशी संबंधित अनेक ब्लॉग तसेच व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. हल्ली यु ट्यूब वरती यासंबंधात बरीच माहिती उपलब्ध आहे. त्यातील चांगली आणि योग्य माहिती मिळवून त्यातून खूप काही शिकता येते. पण त्यासोबतच चुकीच्या माहितीपासून सावधानता तितकीच महत्त्वाची आहे.
- गुंतवणूक करण्यासाठी स्वतः संशोधन करणे फार महत्त्वाचे आहे. टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मिडीआ, मित्र, ब्रोकर्स यांच्या बातम्या आणि टीप्स यावर अवलंबून न राहता तुम्ही स्वतः शिका आणि आपला स्टॉक स्वतःच निवडा.
- सुरुवातीला कमी पैसे गुंतवा. एकदा तुम्हाला मार्केटची पुरेपूर ओळख झाली की हळूहळू गुंतवणूक वाढवत न्या.
- एकाच कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक न करता वेगवेगळ्या क्षेत्रातील (उदा. बँका, वाहने, मेडिकल क्षेत्र इ.) वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर मध्ये आणि पैसे गुंतवा म्हणजे रिस्क मर्यादित राहण्यास मदत होते. पण म्हणून एकाचवेळी खूप जास्त कंपन्यांच्या शेअर मध्ये पैसे गुंतवणे देखिल योग्य नाही कारण त्यामुळे त्या सर्व स्टॉक्स चा अभ्यास करून त्यावर लक्ष ठेवणे कठीण जाते. (साधारणपणे एकावेळी ०८ ते १५ वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे योग्य मानले जाते.)
- आपली जोखीम (रिस्क) घेण्याची क्षमता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जोखीम किंवा रिस्क म्हणजे जर आपण पैसे गुंतवलेल्या शेअर ची किंमत कमी झाली तर तो विकताना होणारा तोटा. हा तोटा मर्यादित असणे महत्त्वाचे.
- काही कारणाने अचानक मार्केट पडले तर घाबरू नका आणि घाईगडबडीने शेअर्स विकू नका.
- शेअर मार्केट मध्ये तोच यशस्वी होतो जो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो. नफा झाला म्हणून हुरळून ना जाता आपल्या सिस्टीम ने काम करत राहणे आणि तोटा झाला तर घाबरून न जाता किंवा शेअर मार्केट मधली आपली सगळी गुंतवणूक काढून न घेता आपल्या चुका सुधारणे आणि पुन्हा काम करणे हाच यशस्वी गुंतवणूकदाराचा मंत्र आहे. म्हणूनच सुरुवातीला जास्त परताव्याची अपेक्षा न करता शांत आणि संयमित मनाने ट्रेडिंग करणे केव्हाही उत्तमच.
मित्रांनो वरील मार्गदर्शक नियम आत्मसात करा आणि शेअर मार्केटमधील योग्य गुंतवणुकीने आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करा.
हेही वाचा: शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती l Share Market Information in Marathi
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय मग या गोष्टी लक्षात ठेवा l Things to remember while investing in share market in Marathi