श्रीराम जय राम जय जय राम l श्रीरामाची आरती l Shriram Aarati in Marathi
श्रीराम जय राम जय जय राम
त्रिभुवनमंडितमाळ गळां।
आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा॥
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्याम।। धृ० ।।
ठकाराचे ठाण वारीं धनुष्यबाण।
मारुती सन्मुख उभा कर जोडून॥
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्याम ।। १ ।।
भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती।
स्वर्गाहून देव पुष्पवृष्टि करिती॥
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्याम।। २ ।।
रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी।
आरती ओवाळूं चौदां भुवनांच्या कोटी॥
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्याम ।। ३ ।।
विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें।
आरती ओंवाळूं पाहूं सीतापतीतें॥
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्याम।। ४ ।।
श्रीराम जय राम जय जय राम l श्रीरामाची आरती l Shriram Aarati in Marathi
गणपती अथर्वशीर्ष l Ganpati Atharvashirsh in Marathi
उत्कट साधुनी शिळा l Utkat sadhuni shila setu bandhoni
जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ० ।।
स्वस्वरूपोन्मुखबुद्धि वैदेही नेली ।
देहात्मकाभिमाने दशग्रीवे हरिली ।
शब्दरूप मारुतीने सच्छुद्धि आणिली ।
तव चरणांबुजी येऊन वार्ता श्रृत केली ।
जय देव जय देव निजबोधा रामा ।। १ ।।
उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह अहंभाव रावण निवटोनी ।। २ ।।
प्रथम सीताशोधा हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ।
मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला ।
आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। ३ ।।
निजबळे निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।
आनंदे ओसंडे वैराग्य भरता ।
आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ४ ।।
अनाहतध्वनि गर्जती अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरीं होत आहे आनंद थोर ।। ५ ।।
सहजसिंहासनी राजा रघुवीर ।
सोऽहंभावे तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदास स्वामी आठव ना विसर ।। ६ ।।
श्रीराम जय राम जय जय राम l रामाची आरती l Shriram Aarati in Marathi