नमस्कार मंडळी! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो सध्याच्या मोबाईलच्या जगात आपल्याला मनोरंजनाचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. यात मोबाइचा खूप मोठा वाटा आहे. त्यातही आपल्याला मनोरंजन म्हणून व्हिडिओ पाहायला आवडतात. किंवा शिकण्याचे साधन म्हणून देखील आपल्या मेंदूला व्हिडिओ च्या माध्यमातून पटकन लक्षात येते. म्हणूनच आपण व्हिडिओ पाहणे पसंत करतो. मोबाईलवर यासाठी जी काही प्रमुख अॅप आहेत त्यात यु ट्यूब चा क्रमांक फार वरचा आहे. एका आकडेवारीनुसार जगात सर्वात जास्त व्हिडिओ पाहणार्यांची संख्या यु ट्यूब वर सर्वाधिक आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जसं की कुठली रेसिपी करायची आहे, काही डेकोरशन करायचे आहे, काही नवीन शिकायचे आहे, कोणती वस्तु विकत घ्यायची आहे, कसला रिव्हयू बघायचा आहे या सगळ्याची पहिली पायरी असते यु ट्यूब! दिवसातला बराचसा वेळ आपण यु ट्यूब वरती घालवतो. याच यु ट्यूब बद्दल YouTube information in Marathi या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
Table of Contents
Toggleयु ट्यूब म्हणजे काय l What is YouTube in Marathi
यु ट्यूब ची स्थापना आणि इतिहास l YouTube history in Marathi
हेही वाचा: भारतीय रेल्वे माहिती l Indian Railway Information in Marathi
यु ट्यूब नक्की कसे काम करते? How YouTube works in Marathi?
आर्थिक गणित
यु ट्यूब चे फायदे तोटे
मित्रांनो, जशा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तशाच प्रत्येक टेक्नॉलॉजी ला देखील दोन बाजू आहेत. चांगली आणि वाईट किंवा फायद्याची आणि तोट्याची! मुळात ती गोष्ट चांगले उद्देश ठेऊनच सुरू होते पण कालांतराने त्याचे वाईट परिणामही दिसायला लागतात.
यु ट्यूब चे फायदे
- यु ट्यूब हे जागतिक व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) आहे. जगातला कोणीही माणूस जगाच्या कुठल्याही कानाकोपर्यातून यु ट्यूब वरती व्हिडिओ पाहू शकतो केवळ इंटरनेट डाटा च्या बदल्यात.
- कुठल्याही विषयाची माहिती एका क्लिकवर आपल्याला उपलब्ध होते.
- सृजनशील लोकांना, कलावंतांना कुठल्याही पाठबळाशिवाय, भांडवलाशिवाय आपले व्हिडिओ लोकांसमोर आणता येतात.
- उत्तम व्हिडिओ करणार्यांना चांगलं आर्थिक उत्पन्न मिळतं.
यु ट्यूब चे तोटे
- यु ट्यूब मुळे लोकांचा मोबाइल वापरण्याचा वेळ (स्क्रीन टाईम) प्रचंड वाढलाय. ज्याची परिणीती निद्रानाश, मानसिक विकार, डोळ्यांचे त्रास, नातेसंबंधांत दुरावा यात व्हायला लागलेय, जे समाजव्यवस्थेसाठी अत्यंत घातक आहे.
- लहान मुलांमधील मोबाइलच्या अतीवापराला यु ट्यूब मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे.
- यु ट्यूब वरती जसे चांगले व्हिडिओ असतात तसेच अनेक वाईट व्हिडिओ जसं की गुन्हेगारी, अश्लिलता इ. देखिल असतात ज्यांचा अत्यंत विपरीत परिणाम मानवी मनांवर होत असतो.
- यु ट्यूब हा जागतिक प्लॅटफॉर्म असल्याने त्यावरील कंटेण्ट वरती बंधनं नाहीत जे समाजासाठी चांगले नाही.
हेही वाचा: पहिला विमान प्रवास! या आहेत महत्त्वाच्या गोष्टी! First time travel from flight, important tips in Marathi
यु ट्यूब वरती प्रश्नोत्तरे l FAQ on YouTube
१. युट्युब चा शोध कधी लागला?
युट्युब चा शोध फेब्रुवारी २००५ मध्ये लागला.
२. यूट्यूब चे संस्थापक कोण आहेत?
स्टीव्ह चेन (Steve Chen), जावेद करीम (Jawed Karim) आणि चाड हर्ले (Chad Hurley) या तिघांनी मिळून यु ट्यूब ची स्थापना केली.
३. पहिला यु ट्यूबर कोण? Who is a first YouTuber?
जावेद करीम (Jawed Karim) हा पहिला यु ट्यूबर म्हणून ओळखला जातो. जो यु ट्यूब चा संस्थापक सदस्य होता आणि एप्रिल २००५ मध्ये त्याने पहिला व्हिडिओ यु ट्यूब वर अपलोड केला.
४. पहिला भारतीय यु ट्यूबर कोण? Who is the first Indian YouTuber?
Asoka007 हा पहिला भारतीय यु ट्यूबर म्हणून ओळखला जातो. त्याने ऑक्टोबर २००५ मध्येच पहिला व्हिडिओ यु ट्यूब वर अपलोड केला.
५. यु ट्यूब सबस्क्रायबर म्हणजे काय? what is YouTube subscriber?
जेव्हा यु ट्यूब वरील एखादा वापरकर्ता एखाद्या चॅनल वरची माहिती आपल्याला मिळावी म्हणून ‘sbubscribe’ बटण दाबून निवड करतो, तेव्हा त्याला सबस्क्रायबर म्हणतात. वेगवेगळ्या चॅनलची लोकप्रियता त्यांच्या सबस्क्रायबर च्या संख्येवरून ठरते.
६. एक मिलियन सबस्क्रायबर्स म्हणजे काय ? What is one million subscribers ?
जेव्हा एखाद्या चॅनल वरील सबस्क्रायबर्स ची संख्या एक दशलक्ष म्हणजेच दहा लक्ष किंवा दहा लाख एवढी होते त्यालाच एक मिलियन सबस्क्रायबर्स असे म्हणतात. प्रत्येक यु ट्यूबर साठी हे खूप मोठं यश मानलं जातं.