देशभक्तीपर गीते मराठी l Deshabhaktipar Gite in Marathi
नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. “देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो” हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विधान देश म्हणजे काय हे सांगून जाते. असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाने मिळालेले आणि अनेक सैनिकांच्या बलिदानाने राखलेले हे स्वातंत्र्य अनमोल आहे. म्हणूनच देशाच्या स्वातंत्र्याचा जागर करणे हे प्रत्येक देशबांधवाचे कर्तव्य ठरते. राष्ट्रभक्तीपर गीते यामध्ये खूप मोठी भूमिका बजावतात. अशाच काही थोर राष्ट्रभक्तांच्या लेखणीतून उतरलेली काही देशभक्तीपर गीते!
देशभक्तीपर गीते मराठी l Deshabhaktipar Gite in Marathi
राष्ट्रगीत l Rashtragit in Marathi
जन गण मन अधिनायक जय हे,
भारत भाग्यविधाता।
पंजाब, सिंध, गुजरात, मराठा,
द्राविड उत्कल बंग,
विध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उत्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे,
तव शुभ आशिष मागे,
गाहे तव जय गाथा,
जन गण मंगलदायक जय हे,
भारत भाग्यविधाता।
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे।
– रवींद्रनाथ टागोर
देशभक्तीपर गीते मराठी l Deshabhaktipar Gite in Marathi
वंन्दे मातरम् l Vande Mataram in Marathi
वंन्दे मातरम् !
सुजला सुफलां । मलयज शीतलाम्
सस्य श्यामलां । मातरम् । वंन्दे मातरम्।
शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम्
फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिणीम्
सुहासिनीम् । सुमधुर भाषिणीम् ।
सुखदां वरदां मातरम् । वंन्दे मातरम ।
– बंकिमचंद्र चटोपाध्याय
देशभक्तीपर गीते मराठी l Deshabhaktipar Gite in Marathi
हे राष्ट्र देवतांचे l He Rashtra Devatanche in Marathi
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ll
कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमांची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे ll२ll
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे ll३ll
येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन् तथागताचे ll४ll
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे ll५ll
येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे ll६ll
– ग.दि.माडगूळकर
देशभक्तीपर गीते मराठी l Deshabhaktipar Gite in Marathi
जिंकू किंवा मरू l Jinku Kinva Maru in Marathi
माणुसकीच्या शत्रुसंगे
युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू
लढतिल सैनिक, लढू नागरिक
लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू
देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू
शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू
हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
अंती विजयि ठरू, जिंकू किंवा मरू
– ग.दि.माडगूळकर
देशभक्तीपर गीते मराठी l Deshabhaktipar Gite in Marathi
बलसागर भारत होवो l Balasagar Bharat Hovo in English
बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो॥
हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥
वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन
हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥
हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥
करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊं
विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥
या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥
ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल
जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥
साने गुरुजी
देशभक्तीपर गीते मराठी l Deshabhaktipar Gite in Marathi
उठा राष्ट्रवीर हो l Utha Rashtravir Ho in English
उठा राष्ट्रवीर हो
सज्ज व्हा, उठा चला,
सशस्त्र व्हा, उठा चला
युध्द आज पेटले जवान चालले पुढे
मिळूनि सर्व शत्रुला क्षणांत चारु या खडे
एकसंघ होउनि लढू चला लढू चला
उठा उठा, चला चला
लाख संकटे जरी उभी समोर ठाकली
मान ताठ आमुची कुणापुढे न वाकली
थोर वंश आपुला महान मार्ग आपुला
उठा उठा, चला चला
वायुपुत्र होउनी धरु मुठीत भास्करा
होउनी अगस्तिही पिऊनि टाकु सागरा
मन्युबाळ होउनी रणात जिंकू मृत्युला
उठा उठा, चला चला
चंद्रगुप्त वीर तो फिरुनि आज आठवू
शूरता शिवाजिची नसानसात साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला
यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयास देउ आहुती
देवभूमि ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला
– रवींद्र भट
देशभक्तीपर गीते मराठी l Deshabhaktipar Gite in Marathi
जयोस्तुते श्री महन्मंगले l Jayostute Shri Mahanmangale in Marathi
जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले ! शिवास्पदे ! शुभदे !
स्वतंत्रते ! भगवती ! त्वांमहम यशोयुताम वंदे !
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू ! नीति संपदांची
स्वतंत्रते ! भगवती ! श्रीमती राज्ञी तूं त्यांची
परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी
स्वतंत्रते ! भगवती ! चांदणी चमचम लखलखशी ।।१।।
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते ! भगवती ! तूंचि ती विलसतसे लाली
तूं सूर्याचे तेच उदधीचे गांभीर्यही तूंचि
स्वतंत्रते ! भगवती ! अन्यथा ग्रहण नाश्ता ते ची ।।२।।
मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते ! भगवती ! योगिजन परब्रह्म वदती
जें जें उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर तें तें
स्वतंत्रते ! भगवती ! सर्व तव सहचारी होते ।।३।।
हे अधमरक्तरंजिते ! सुजनपूजिते !
श्री स्वतंत्रते ! श्री स्वतंत्रते !! श्री स्वतंत्रते !!!
तुजसाठी मरण ते जनन, मरण ते जनन !
तुजविण जनन ते मरण, ते जनन ते मरण !
तुज सकल चराचर शरण ! चराचर शरण !
श्री स्वतंत्रते ! श्री स्वतंत्रते !! श्री स्वतंत्रते !!!
स्वतंत्रते ! भगवती ! त्वामहंम यशोयुतांम वंदे ।।४।।
-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
देशभक्तीपर गीते मराठी l Deshabhaktipar Gite in Marathi