एमआरआय आणि सीटी स्कॅन म्हणजे काय? What is MRI and CT scan in Marathi.

एमआरआय आणि सीटी स्कॅन म्हणजे काय? What is MRI and CT scan in Marathi l Difference between MRI and CT-Scan Machine

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो सध्याच्या धावपळीच्या युगात तर्‍हेतर्‍हेचे आजार आणि रोग ही एक मोठी समस्या होऊन बसलेय. आता आजार म्हटले की उपचार आलेच आणि यात मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने अनेक नवीन उपचारपद्धती आणि निदान करण्याच्या पद्धती किंवा चाचण्या शोधून काढल्यात.  हल्ली बर्‍याचदा काही गंभीर समस्या असल्यास एमआरआय किंवा सीटी स्कॅनसारख्या चाचण्या करण्याबद्दल आपल्याला संगितले जाते. पण ज्यांना त्यांची योग्य माहिती नसते ते घाबरून जातात. एमआरआय किंवा सीटी स्कॅन या दोन वैद्यकीय चाचण्या नेमक्या काय आहेत? त्या कशासाठी आवश्यक आहेत? त्यांचे फायदे तोटे काय आहेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत.

एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीन दिसायला आणि कामाच्या बाबतीत जवळ जवळ सारख्या असतात. पण त्यांची काम करण्याची पद्धत (working principle) वेगवेगळी आहे. एमआरआय चुंबकीय आणि रेडिओ लहरींचा वापर करून आपल्या शरीरातील फोटो घेतो तर सीटी स्कॅनमध्ये एक्स रेचा वापर शरीरातील अवयवांच्या प्रतिमा तयार करण्यासाठी केला जातो. एमआरआय विशेषकरून मेंदू, मज्जारज्जू, त्यासंबंधीचे स्नायू, हृदय आणि रक्त वाहिन्या यांसारख्या मऊ उतींसाठी (soft tissues) चांगले परिणाम देते तर सीटी स्कॅन मुख्यत्वेकरून हाडांचे फ्रॅक्चर, ट्यूमर,अंतर्गत रक्तस्त्राव इत्यादी गोष्टी तपासण्यासाठी वापरले जाते.

हेही वाचा: मुलगा होणार की मुलगी काय आहे विज्ञान? Baby boy or girl What is science in Marathi

सीटी स्कॅन म्हणजे काय? What is CT scan in Marathi

सीटी स्कॅन म्हणजे (CT Scan- Computed Tomography ) संगणित टोमोग्राफी स्कॅन. यामध्ये एका सरकत्या टेबलवरती पेशंटला झोपवले जाते आणि ते टेबल सीटी स्कॅनर मधून पुढे जाते. इथे क्ष किरणे (X-Ray) वापरुन वेगवेगळ्या बाजूने शरीराचे अनेक द्विमितीय (2D) फोटो घेतले जातात. नंतर हे सर्व फोटो संगणकाच्या सहाय्याने एकत्र करून त्रिमितीय (3D) फोटो किंवा इमेज तयार केली जाते. हा एक प्रकारचा त्रिमितीय (3D) एक्स रे (X-Ray) आहे.

साध्या एक्स रे पेक्षा अधिक तपशीलवार आणि स्पष्ट फोटो मिळत असल्यामुळे साध्या एक्स रे ने न समजणार्‍या गोष्टी कळण्यासाठी सीटी स्कॅन वापरला जातो. यामुळे  शरीरात असलेले किंवा विकसित होणार्‍या रोगांचे निदान करण्यास मदत होते. हाडं तपासण्यासाठी सीटी स्कॅनचा सर्वाधिक वापर होतो.  सीटी स्कॅन करण्यासाठी कमी वेळ लागत असल्याने अनेकदा आपत्कालीन परिस्थितीमध्ये सीटी स्कॅन वापरले जाते.

what-is-mri-and-ct-scan-in-marathi
सिटी स्कॅन CT scan मशीन

हेही वाचा: वारंवार सर्दीची पाच कारणं l Five reasons for getting frequent cold in Marathi

एमआरआय म्हणजे काय? What is MRI in Marathi

एमआरआय म्हणजे मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (Magnetic resonance imaging- MRI).  यामध्ये पेशंटला एका लांब बोगद्यात म्हणजेच एमआरआय स्कॅनर मध्ये झोपवले जाते. आणि त्यानंतर चुंबकीय आणि रेडिओ लहरींचा (Magnetic and Radio Waves) वापर करून, संगणकाच्या सहाय्याने त्याच्या शरीरातील फोटो काढले जातात. मग त्या प्रतिमांवरून शरीरात असलेला किंवा विकसित होणारा रोग ओळखायला मदत होते. मुख्यत्वेकरून मेंदूशी संबंधित आजार शोधण्यासाठी एमआरआयचा वापर होतो. मऊ उतींसाठी- सॉफ्ट टिश्यू(soft tissues)  इमेजिंगसाठी एमआरआय अधिक प्रभावी आहे. मेंदू, मज्जारज्जू, त्यासंबंधीचे स्नायू, हृदय आणि रक्त वाहिन्या आणि इतर अवयवांच्या तपशीलवार तपासणीसाठी त्याचा जास्त वापर होतो.

what-is-mri-and-ct-scan-in-marathi
                             MRI एमआरआय मशीन
एमआरआय आणि सीटी स्कॅन किती हानिकारक?  MRI and CT scan which is hazardous in Marathi

सीटी स्कॅन मध्ये रेडिएशन होत असल्यामुळे सीटी स्कॅन पुन्हा पुन्हा करणे शरीरसाठी घातक आहे. जो धोका  एमआरआय मध्ये नाही.

सीटी स्कॅन चे फायदे advantages of CT scan
  • सीटी स्कॅन CT-Scan मोठ्या प्रमाणात केला जातो. याचं मुख्य कारण म्हणजे MRI एमआरआय पेक्षा कमी किंमतित तो केला जातो.
  • कमी वेळेत होते त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वापर.
सीटी स्कॅन चे तोटे disadvantages of CT scan
  • रेडिएशन होत असल्यामुळे शरीराला फार नाही पण थोडा धोका असतोच.
  • गरोदर मातांना धोकादायक ठरू शकतो.
एमआरआय चे फायदे advantages of MRI
  • अधिक सुस्पष्ट प्रतिमा मिळतात.
  • रेडिएशन नाही.
  • मऊ उतींसाठी- सॉफ्ट टिश्यू(soft tissues)  इमेजिंगसाठी एमआरआय अधिक प्रभावी आहे जसे की ट्यूमर.
एमआरआय चे तोटे disadvantages of MRI
  • एमआरआय स्कॅनमुळे मोठा आवाज निर्माण होतो जो काही लोकांना भीतीदायक वाटू शकतो.
  • एमआरआय मशीनमधील चुंबकीय शक्तीमुळे धातूच्या संपर्कात आल्यास ते धोकादायक ठरतं. त्यामुळे एमआरआय स्कॅन करण्यापूर्वी धातूच्या वस्तू, दागिने आणि कपडे काढून टाकणे आवश्यक आहे.
  • शरीरातील प्रत्यार्पित धातू जसे की दाताची कॅप एमआरआय स्कॅन मध्ये अडथळा ठरतात.

तर मित्रांनो, या लेखात आपण एमआरआय आणि सीटी स्कॅन म्हणजे काय? What is MRI and CT scan in Marathi l Difference between MRI and CT-Scan Machine बद्दल माहिती घेतली.

Disclaimer: ही माहिती केवळ तुमच्या ज्ञानात भर घालण्याच्या हेतूने दिली आहे. कुठल्याही वैद्यकीय सल्ल्यासाठी अधिकृत डॉक्टर्सना नक्की भेटा. 

हेही वाचा: पेन किलर चे साईड इफेक्ट्स l Side effects of painkiller in Marathi

Leave a comment