उल्का किंवा उल्कापात म्हणजे काय? l What is Meteor or Meteor shower in Marathi

उल्का किंवा उल्कापात म्हणजे काय? l What is Meteor or Meteor shower in Marathi
नमस्कार मित्रांनो yugmarathi.com वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो कधीतरी रात्री निरभ्र आकाशाकडे पहात आपण निवांत गप्पा मारत असतो आणि त्याच वेळेस अचानक कुठून तरी आकाशातून एखादी चमकदार छोटीशी वस्तू खाली येताना दिसते आणि पटकन आपल्या तोंडून उद्गार निघतात की तारा पडला! आपल्याकडे या पडणाऱ्या किंवा तुटणाऱ्या तार्‍याकडे बघून काहीजण स्वतःच्या इच्छाही बोलून दाखवतात. असं म्हणतात की तुटणाऱ्या ताऱ्याकडे बघताना केल्या जाणाऱ्या इच्छा पूर्ण होतात. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय. परंतु तेवढ्यातच आपल्याला कोणीतरी जाणकार लगेच सांगून जातो की, हा तुटणारा तारा नसून ही केवळ एक उल्का आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो की मग हा प्रकार नक्की काय असतो? खरच धारा तुटतो की ती उल्का असते की आणखी काही? आणि जर उल्का असेलच तर उल्का म्हणजे नेमकं काय किंवा उल्का वर्षाव म्हणजे काय याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत.
उल्का म्हणजे काय? What is Meteor in Marathi

उल्का म्हणजे अवकाशातील दगड! अवकाशात भ्रमण करणाऱ्या खगोलीय गोळ्यांना आपण उल्का असे म्हणतो. जेव्हा हे दगड पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खेचले जाऊन जेव्हा वातावरणात शिरतात तेव्हा त्यांच्या प्रचंड वेगामुळे त्यांचे वातावरणाशी घर्षण होते आणि त्यामुळे त्यांचे तापमान वाढून ते प्रकाशाचे उत्सर्जन करू लागतात आणि म्हणूनच आपल्याला ते ताऱ्यांसारखे प्रकाशित किंवा चमकणारे दिसतात. जेव्हा हा चमकणारा दगड म्हणजेच उल्का खाली येते आणि पृथ्वीवरती पडते यालाच आपण उल्कापात असे म्हणतो. परंतु उघड्या डोळ्यांनी आकाशात बघताना अवकाशातून एखादा ताराच तुटून खाली पडलाय असा भास होतो. म्हणूनच बोलीभाषेत आपण याला तारा पडणे किंवा तारा निखळणे किंवा तारा तुटणे असे म्हणतो.

उल्कावर्षाव म्हणजे काय? What is Meteor shower in Marathi

जेव्हा अनेक उल्का किंवा अवकाशातीलअनेक दगड पृथ्वीच्या दिशेने खेचले जाऊन एकाच वेळी पृथ्वीवरती पडतात तेव्हा त्याला पण उल्का वर्षाव असे म्हणतो. शास्त्रज्ञांच्या मते सरासरी रोज एक तरी उल्का जमिनीवरती पडते. प्रत्यक्षात अनेक उल्का अवकाशातून पृथ्वीच्या दिशेने झेप घेतात परंतु त्या आकाराने बऱ्याच लहान असतात आणि वातावरणातील घर्षणामुळे त्यांचे तापमान वाढते आणि त्यामुळे बऱ्याच उल्का वितळून किंवा बाष्पीभवनाने वातावरणातच नष्ट होऊन जातात.

उल्कांचा आकार Size of Meteor in Marathi

उल्का या काही किलोमीटर लांबी रुंदी पासून ते अगदी हातावर राहणाऱ्या छोट्या दगडापर्यंत अशा विविध आकारात आढळतात. उल्कापातातील दगड हे मात्र शास्त्रज्ञांच्या आकर्षणाची गोष्ट आहे. कारण या दगडांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ वेगवेगळ्या प्रमाणात असतात. काही दगड पूर्णपणे एखाद्या धातूचे तर काही मिश्र धातूंचे तर काही शास्त्रज्ञांना देखील कोड्यात टाकणाऱ्या एखाद्या वेगळ्याच पदार्थाचे बनलेले असतात. आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालेल्या सरोवराचे एक उदाहरण आहे. जेव्हा प्रचंड मोठ्या उल्का पृथ्वीवर येऊन आढळतात तेव्हा अशा सरोवरांची निर्मिती होते.

उल्कांची निर्मिती Formation of Meteors in Marathi

या उल्का अवकाशात येतात तरी कुठून? सूर्यमालेची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा सूर्य आणि इतर ग्रह तयार होत असताना अनेक अवशेष उरले आणि ते अवकाशातच भिरभिरत राहिले. त्यात काही छोटे-मोठे दगड, धूळ आहे. त्यासोबतच धूमकेतू जेव्हा अवकाशातून फिरतात तेव्हा त्यांच्या शेपटाच्या भागातून त्यांनी सोबत आणलेला कचरा किंवा विविध प्रकारचे दगड आणि धूळ ते मागे सोडत जातात. जेव्हा आपली पृथ्वी या कचऱ्यामधून किंवा या दगडांच्या पट्ट्यातून जाते तेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे सर्व दगड पृथ्वीकडे खेचले जातात आणि त्यामुळेच उल्कापात घडून येतो. खूप जास्त दगड एकाच वेळी घेतल्यानंतर उल्का वर्षाव होतो.

उल्कापात आणि विनाश Meteorites and Destruction in Marathi

जेव्हा प्रचंड मोठ्या उल्का पृथ्वीच्या दिशेने येतात तेव्हा वातावरणाशी होणाऱ्या घर्षणामुळे त्यांचे तापमान प्रचंड वाढते त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होते ही उष्णता आणि त्यासोबतच पृथ्वीवर होणाऱ्या धडकेमुळे निर्माण होणारी कंपने प्रचंड विनाश घडवून आणतात. ज्यामुळेही गोष्ट जरी दुर्मिळ असली तरी ती काही लाख वर्षांनी पुन्हा पुन्हा होत असते.

असं मानलं जातं की डायनासोरचे पृथ्वीवरचे उच्चाटन हे अशाच एका उल्कापातामुळे घडून आलेले आहे. अशा उल्कांच्या वर्षावामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेत टिकणं फार कमी प्राण्यांना शक्य झालं आणि बाकीचे प्राणी नामशेष होऊन गेले. प्रचंड उष्णतेत काही काळ गेल्यानंतर जी प्रचंड धूळ मिश्रित हवा पूर्ण वातावरणात पसरली त्यामुळे पृथ्वीवर सूर्यकिरणांना येण्यास अडथळा निर्माण होऊन पृथ्वीचे तापमान घसरले आणि पृथ्वीवरती हिमयुगाची सुरुवात झाली. आणि या कमी तापमानामुळे देखील अनेक सजीवांचा विनाश झाला. या टोकाच्या उष्णतेत आणि थंडीत ज्या सजिवांनी टिकाव धरला त्यांच्यापासून उत्क्रांत होत होत आजची जीवसृष्टी अस्तीत्वात आली ज्याचा माणूस हा देखील एक भाग आहे. (म्हणजे आपल्या जन्मासाठी काय काय घडलंय ते बघा!)  

उल्का किंवा उल्कापात म्हणजे काय? l What is Meteor or Meteor shower in Marathi

Leave a comment