पेन किलर चे साईड इफेक्ट्स l Side effects of painkiller in Marathi

पेन किलर चे साईड इफेक्ट्स l Side effects of painkiller in Marathi
सतत पेन किलर घेण्याचे तोटे l Disadvantages of frequent consumption of painkiller
नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो सध्याच्या धावपळीच्या जगात आपली जीवनशैली फारच बदलली आहे. त्यामुळे अपुरी झोप, अपुरा आहार, सततची धावपळ, ताणतणाव या गोष्टी रोजच्या जगण्याचा भाग झाल्यात. आणि यामुळे बऱ्याच जणांना रोजच शरीराच्या काही ना काही तक्रारींना तोंड द्यावे लागते. डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी, ताप, खोकला यासारखे सामान्य तर काही वेळा अगदी हृदय किंवा मेंदू सारख्या नाजूक अवयवांशी संबंधित गंभीर आजार देखील यामुळे उद्भवतात. बऱ्याचदा कोणतंही साधं लक्षण दिसलं तर आपण डॉक्टरांकडे न जाता आणि फारसा विचार न करता आपल्या घरात उपलब्धअसलेले कोणतेतरी पेन किलर घेतो. पण सतत अशाप्रकारे पेन किलर चे सेवन करणे खरंच योग्य आहे का किंवा त्याचे शरीरावरती काही वाईट परिणाम होतात का याचीच माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
पेन किलर चे साईड इफेक्ट्स l Side effects of painkiller in Marathi
पेन किलर चे कार्य l working principle of painkiller
मित्रांनो थोडीशी अंगदुखी, घसा दुखी किंवा डोकेदुखी या गोष्टींसाठी बऱ्याच जणांना नियमितपणे पेन किलर घेण्याची सवय असते. परंतु एक नाही तर अनेक देशातल्या वेगवेगळ्या संशोधकांच्या संशोधनाअंती हे सिद्ध झालंय की अशा पेन किलर घेण्याने क्षणिक आराम मिळतो परंतु अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर घडून येतात.
आपल्याला एखाद्या गोष्टीमुळे वेदना का होतात? शरीराच्या त्या ठिकाणावरून येणारे सिग्नल्स मेंदूपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला वेदना होतात हेच सिग्नल्स मध्ये थांबवण्याचे काम पेन किलर मधील रसायने करतात. पेन किलर आपण घेतल्यानंतर त्यातील घटक आपल्या रक्तात मिसळतात आणि ते मेंदूतील काही हार्मोन्स नियंत्रित करून मेंदूपर्यंत सिग्नल पोहोचवणारी यंत्रणा थंड करतात. त्यामुळे आपल्याला वेदना जाणवत नाहीत, परंतु प्रत्यक्षात तेथील वेदना किंवा त्रास गायब झालेला नसतो तर तो तसाच असतो फक्त पेन किलरच्या अडथळ्यामुळे या वेदना मेंदूला जाणवत नाहीत.
पेन किलर चे साईड इफेक्ट्स l Side effects of painkiller in Marathi
पेन किलर चे दुष्परिणाम l Disadvantages of painkiller
मित्रांनो खूप जास्त वेदना होत असताना किंवा त्रास होत असताना पेन किलर घेऊन त्या वेदना थांबवणे आणि त्यानंतर लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील औषधोपचार करणे हे केव्हाही श्रेयस्कर परंतु साध्या साध्या कारणासाठी नेहमी नेहमी पेन किलर घेऊन त्याची सवय लावणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. अनेक संशोधनाअंती सिद्ध झालेले दुष्परिणाम पुढीलप्रमाणे-
  1. या औषधांच्या सततच्या सेवनाने हृदयासंबंधी गंभीर विकार उद्भवू शकतात अगदी हृदयविकाराचा झटका ही येऊ शकतो.
  2. या गोळ्यांमधील विशिष्ट रसायने आपल्या शरीरातील किडनी किंवा मूत्रपिंडावरती ताण आणतात त्यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा किंवा त्यासंबंधीचे आजार उद्भवण्याचा धोका कायमच असतो.
  3. या गोळ्यांचे सेवन यकृतासाठी देखील धोकादायक आहे. पेन किलर चे सततचे सेवन यकृत निकामी करण्यात हातभार लावू शकते.
  4. पेन किलर चे कार्य मेंदूशी संबंधित असल्यामुळे पेन किलर चे सततचे सेवन मेंदूसाठी मोठा धोका निर्माण करू शकते. पेन किलर मधील रसायने मेंदूमधील हार्मोन्स नियंत्रित करतात ज्यामुळे नैसर्गिक हार्मोन्स नियंत्रणात बाधा येते आणि याची सवय मेंदूवर अत्यंत घातक परिणाम करते ज्यामुळे मेंदूशी संबंधित अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात.
  5. उलट्या, जुलाब किंवा बद्धकोष्ठता अशा तक्रारी देखील पेन किलर मुळे निर्माण होतात.
  6. काही जणांसाठी पेन किलर या एखादी एलर्जी निर्माण करण्याचे कारण ठरतात आणि मग त्यावर उपचार करण्यासाठी आणखी औषध घ्यायला लागतात याचा आपल्या शरीराला आणखी त्रास होतो.
  7. या सर्व शारीरिक परिणामांसोबतच एक मोठा मानसिक परिणाम पेन किलर घडवून आणतात तो म्हणजे अनेक लोकांमध्ये सततच्या पेन किलर सेवनाने नैराश्य येते जे पुन्हा विविध बारीक-सारीक शरीराच्या तक्रारी सुरू करते त्यामुळे पुन्हा पेन किलर घेतल्या जातात आणि हे न संपणारे दुष्टचक्र चालू होते. पेन किलर चे साईड इफेक्ट्स l Side effects of painkiller in Marathi
पेन किलर च्या दुष्परिणामांपासून बचावाचे उपाय l Measures to save from side effects of painkiller
  1. मित्रांनो एकदा शांतपणे बसून आपल्या रोजच्या जीवनशैलीचा आढावा घ्या शक्य असेल तेवढी धावपळ टाळण्याचा प्रयत्न करा.
  2. आपल्या रोजच्या ऍक्टिव्हिटी चे योग्य नियोजन करून व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप यासाठी पुरेसा वेळ काढा ज्यामुळे डोकेदुखी, घसादुखी, अंग दुखी अशा छोट्या छोट्या तक्रारी उद्भवणारच नाही आणि तुम्हाला पेन किलर घेण्याची आवश्यकताच पडणार नाही.
  3. मित्रांनो सर्वात महत्त्वाचं, जेव्हा तुम्हाला असह्य वेदना होत असतील किंवा डॉक्टरांकडे पोहोचण्यास वेळ लागणार असेल अशावेळी फक्त पेन किलरचा वापर करा.
  4. साध्या साध्या गोष्टींसाठी किंवा दुखण्यासाठी पेन किलर घेणे टाळा त्याऐवजी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या घरगुती औषधांचा किंवा आयुर्वेदिक औषधांचा वापर करा जसे की हळद, लवंग, ओवा, तुळस. अशा औषधांनी देखिल या साध्या आजारांवरती आराम पडतो.
  5. लहान मुले किंवा वृद्ध माणसे यांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केव्हाही पेन किलर घ्यायला देऊ नका.
  6. पेन किलर वापरण्याची सवय ताबडतोब बंद करा. पेन किलर हा आपल्या रोजच्या जीवनशैलीचा भाग होऊ देऊ नका. स्वतःच्या मताने कुठलीही पेन किलर घेऊ नका त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
पेन किलर चे साईड इफेक्ट्स l Side effects of painkiller in Marathi
सतत पेन किलर घेण्याचे तोटे l Disadvantages of frequent consumption of painkiller

Leave a comment