व्यायाम करताना हृदयाची गती किती असावी? Ideal rate of heart beat during exercise in Marathi

व्यायाम करताना हृदयाची गती किती असावी? Ideal rate of heart beat during exercise in Marathi

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. सध्याचा काळ कितीही धावपळीचा असला आणि आपला दिवस कितीही व्यस्त असला तरीही हल्ली अनेक लोकांमध्ये फिटनेस किंवा आपल्या आरोग्याविषयी चांगली जागृती आलेली आहे. आणि त्यामुळे अनेक लोक नियमितपणे कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम जसे की चालणे, धावणे, सूर्यनमस्कार किंवा योगा अशा प्राथमिक गोष्टी करत असतात. आता यामध्ये बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न असतो की आपण व्यायाम करताना हृदयावर किती ताण द्यावा किंवा आपल्या हृदयाचे ठोके किती वाढले म्हणजे व्यायाम थांबवावा? याच संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

हेही वाचा: पेन किलर चे साईड इफेक्ट्स l Side effects of painkiller in Marathi

हृदयाचे ठोके म्हणजे काय?

आपलं हृदय कायम शरीरातील अशुद्ध रक्त आपल्याकडे ओढते (पंप करते) आणि आलेलं अशुद्ध रक्त शुद्ध करून पुन्हा शरीराच्या विविध भागांत पाठवते. म्हणजेच ते सतत रक्त पंप करत असतं, ही पंप करण्याची प्रक्रिया म्हणजेच हृदयाचाचे धडकणे किंवा हृदयाचा ठोका असे म्हणतात. आणि एका मिनिटाला हृदय किती वेळा धडकते यालाच आपण हृदयाची गती असे म्हणतो.

निरोगी माणसाच्या हृदयाचे ठोके (२००-६० प्रति मिनिट)

सामान्यतः मुलं जेव्हा जन्मतात तेव्हा त्यांच्या हृदयाची गती सर्वाधिक म्हणजे साधारणपणे २०० च्या आसपास असते तर मुलं जशी मोठी होतात तशी हृदयाची गती कमी कमी होत जाते आणि साधारणपणे वृद्धापकाळात ही गती ६० च्या आसपास असते. साधारणपणे ६० ते ८० एवढे हृदयाचे ठोके निरोगी माणसाच्या आयुष्यासाठी योग्य मानले जातात.

व्यायाम करताना हृदयाचे ठोके

आपण जेव्हा व्यायाम करतो किंवा कुठलेही शारीरिक कष्ट करतो जसे की चालणे, धावणे किंवा एखादे वजन उचलणे, वजन घेऊन  चालणे अशावेळी अर्थातच आपल्या शरीराला जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च करावी लागते आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर शुद्ध रक्ताचा पुरवठा लागतो. म्हणजेच हृदयाला अशुद्ध रद्द शुद्ध करण्याची गती वाढवावी लागते याचाच अर्थ हृदयाला आपले पंपिंग म्हणजे ठोके वाढवावे लागतात. म्हणूनच अशा कामांच्या वेळी आपल्या हृदयाचे ठोके वाढतात. परंतु एका मर्यादे बाहेर हृदयाचे ठोके वाढणे हे हृदयासाठी अतिशय घातक समजलं जातं. मग ही मर्यादा नेमकी किती आहे ते आपण पाहूया.

हेही वाचा: वारंवार सर्दीची पाच कारणं l Five reasons for getting frequent cold in Marathi

काय आहे हृदयाच्या गतीचा नियम

मानवी हृदयाच्या ठोक्यांची सर्वोच्च गती ही पुढील सूत्राने काढता येते:

हृदयची सर्वोच्च गती = २२० – तुमचे वय

व्यायाम करतानाचा हृदयाच्या गतीविषयक नियम असे सांगतो की तुमच्या या गतीच्या साधारणपणे ६० ते ८० टक्के एवढी गती म्हणजेच तुमची व्यायाम करतानाची हृदयाची आदर्श गती.

उदाहरणार्थ तुमचं वय ४० असेल तर,

हृदयाची सर्वोच्च गती = २२० –  ४० = १८०

व्यायाम करतानाचा हृदयाची गती = सर्वोच्च गतीच्या ६० ते ८० टक्के एवढी गती म्हणजेच १०८ ते १४४ ठोके

ही आहे तुमची व्यायाम करतानाची हृदयाची आदर्श गती.

महत्त्वाच्या गोष्टी
  • मित्रांनो कोणताही व्यायाम करताना अचानकपणे आपल्या हृदयाची गती वाढवणे योग्य नाही म्हणून कायमच आरोग्य विषयक तज्ञ आपल्याला सांगतात की आपण आपल्या हृदयाची गती हळूहळू वाढवली पाहिजे आणि साधारणपणे ६० ते ८० टक्के एवढ्या आपल्या सर्वोच्च गतीच्या मर्यादेत राहून व्यायाम केला पाहिजे.
  • व्यायाम करताना जर का तुम्हाला खूप जास्त घाम येत असेल, धाप लागत असेल किंवा तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असेल तर मात्र तुम्ही लगेचच आपला व्यायाम थांबवला पाहिजे आणि डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

व्यायाम करताना हृदयाची गती किती असावी? Ideal rate of heart beat during exercise in Marathi

हेही वाचा: मुलगा होणार की मुलगी काय आहे विज्ञान? Baby boy or girl What is science in Marathi

Leave a comment