मुलगा होणार की मुलगी काय आहे विज्ञान? Baby boy or girl What is science in Marathi

मुलगा होणार की मुलगी काय आहे विज्ञान? Baby boy or girl What is science in Marathi

नमस्कार मित्रांनो, yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. मित्रांनो, निसर्गाने सर्व सृष्टीला दिलेले देणगी म्हणजे पुनःर्निर्मितीची प्रक्रिया, ज्यामुळे अनादी काळापासून पृथ्वीवरती सजीव सृष्टीचे अस्तित्व टिकून आहे. मनुष्य देखील याला अपवाद नाही. ही पुनःर्निर्मितीची प्रक्रिया मुळात वात्सल्य, प्रेम आपल्यासोबत घेऊनच येते आणि  त्यामुळेच मुल होणं हे प्रत्येक आई-वडिलांसाठी त्यांच्या आयुष्यातली फार मोठी गोष्ट असते. त्यात मूल होणार याचा आनंद असतोच पण त्यासोबतच आईचा गरोदरपणा आणि मग बाळंतपणाची काळजी देखील असते. आणि यापेक्षा सगळ्यात जास्त कसली उत्सुकता असेल तर ती असते की होणारं बाळ मुलगा असेल की मुलगी? गर्भधारणेचे नऊ महिने ही उत्सुकता टिकून राहते आणि बाळ जन्मल्यानंतर मुलगा किंवा मुलगी म्हणून त्याचे जोरदार स्वागत होते. आजही काही कुटुंबांमध्ये मुलगा हा वंशाचा दिवा किंवा खरा वारस मानला जातो आणि मुलगी म्हणजे परक्याचं धन मानतात. काही कुटुंबे बेटी म्हणजे धनाची पेटी असं म्हणून मुलीचे देखील जोरदार स्वागत करतात पण काही ठिकाणी आजही मुलगी म्हणजे आपल्यावरचा एक बोजा मानला जातो आणि जन्मापासूनच तिची उपेक्षा सुरू होते.  आणि बर्‍याचदा जन्मदात्या आईलाच याचा दोष दिला जातो. आत्ताच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गर्भधारणेमध्येच गर्भाचे लिंग ओळखता येते मात्र स्त्रीभ्रूणहत्ये (female foeticide) सारख्या मोठ्या समस्येमुळे कायद्याने त्यावर बंदी आहे. खरंच मुलगा किंवा मुलगी हे कोणी एक माता किंवा पिता ठरवतो का, की यामध्ये काही वेगळेच विज्ञान असते? चला तर मग आजच्या लेखात मुलगा की मुलगी काय आहे विज्ञान? Baby boy or girl What is science in Marathi हे जाणून घेऊया.

हेही वाचा: पेन किलर चे साईड इफेक्ट्स l Side effects of painkiller in Marathi

भ्रूणाची वाढ

पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये शारीरिक संबंध आल्यानंतर स्त्रीबीज (egg) आणि शुक्राणू (sperm) यांच्या एकत्रीकरणाने भ्रूण (Embryo) तयार होते आणि त्यानंतर नऊ महिन्यांच्या काळात ते टप्प्याटप्पाने विकसित होत पूर्ण बाळांमध्ये रूपांतरित होते. भ्रूणाची सुरुवातीची वाढ मुलगा आणि मुलगी या दोहोंसाठी सारखीच असते.  वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जेव्हा सर्व अवयव विकसित व्हायला सुरुवात होते आणि त्यांच्या जंनंनेंद्रियांचा विकास सुरू होतो तेव्हा मुलगा किंवा मुलगी असा फरक पडला सुरुवात होते.

गुणसुत्रांचे कार्य

मानवी शरीरातील गुणसुत्रे यात फार मोठी भूमिका बजावतात. मानवी शरीरातील प्रत्येक पेशीत एकूण ४६ गुणसुत्रे (२३ जोड्या) असतात. जेव्हा स्त्रीबीज आणि पुरुषाचा शुक्राणू एकत्र येतो तेव्हा स्त्रियांमधील एक्स एक्स (XX) आणि पुरुषांमधील एक्स वाय (XY) या गुणसूत्रांच्या (chromosome) जोड्या होणारं बाळ हे मुलगा की मुलगी हे ठरवतात. यातील एक्स (X) हा स्त्री तर वाय (Y) हा पुरुषांचे जनुक (gene) आपल्यासोबत घेऊन येतो आणि वाय (Y) हे जनुक यात निर्णायक ठरते. जर स्त्री मधील एक्स आणि पुरुषांमधील एक्स एकत्र आले (X + X = XX) तर मुलगी आणि स्त्री मधील एक्स आणि पुरुषांमधील वाय एकत्र आला (X + Y = XY) तर मुलगा अशी विभागणी होते आणि त्यानुसार भ्रूणाची पुढील वाढ सुरू होते. पुढील तक्त्यात ही विभागणी दिली आहे.

हेही वाचा: एमआरआय आणि सीटी स्कॅन म्हणजे काय? What is MRI and CT scan in Marathi.

मुलगा-मुलगी गुणसुत्रांची जुळणी

baby-boy-or-girl-what-is-science-in-marathi

या जोड्यांच्या जुळणी मध्ये आपला कोणताही सहभाग नसतो किंवा यामध्ये हस्तक्षेप करणे अजूनही मानवाला शक्य नाही. कदाचित लोकसंख्येतील स्त्री आणि पुरुषांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी निसर्गच हे निर्णय घेत असावा. यावरून एक गोष्ट आपल्या नक्की लक्षात येते की मुलगा की मुलगी जन्म घेणार हे ठरवण्यामध्ये स्त्रीचा म्हणजेच जन्मदात्या आईचा थेट कोणताही सहभाग नसतो, म्हणूनच आपण यासाठी स्त्रीला म्हणजेच मातेला दोष देणे थांबवले पाहिजे. मूल मग तो मुलगा असो की मुलगी, निसर्गाने आपल्याला दिलेली एक सुंदर भेट आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि त्याचे उत्तम संगोपन करून एका प्रेमळ नात्याला अनुभवले पाहिजे.

मुलगा होणार की मुलगी काय आहे विज्ञान? Baby boy or girl What is science in Marathi

हेही वाचा: वारंवार सर्दीची पाच कारणं l Five reasons for getting frequent cold in Marathi

Leave a comment