महाराष्ट्रातील जिल्हे आणि मुख्य ठिकाणे l District and Capitals in Maharashtra in Marathi

महाराष्ट्रातील जिल्हे आणि मुख्य ठिकाणे l District and Capitals in Maharashtra in Marathi

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो १५ ऑगस्ट १९४७ साली आपला भारत देश स्वतंत्र झाला. सुरूवातीला राज्यकारभारच्या सोयीसाठी भाषा, भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन देशाची प्रांतवार रचना करण्यात आली. त्यालाच आपण राज्य असे म्हणतो. आणि याच राज्यांचे लोकांच्या सोयीच्या दृष्टीने आणखी विभाग करण्यात आले ज्याला जिल्हा असे म्हणतात. जसं राज्याचा कारभार हाकण्यासाठी त्या राज्यातील एक मुख्य शहर राजधानी म्हणून घोषित करण्यात आले तसंच जिल्ह्याचा कारभार बघण्यासाठी त्या जिल्ह्यातील एक शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण (District capital) करण्यात आले. आपल्या महाराष्ट्रात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यांचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ l Sanyukt Maharashtra Chalval in Marathi

भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुरूवातीला जी राज्ये करण्यात आली त्यात आत्ताचा महाराष्ट्र आणि गुजरात मिळून मुंबई राज्य स्थापन करण्यात आले. मुळात महाराष्ट्रातील जनतेला मराठी भाषिक लोकांचे मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र अपेक्षित असताना केंद्र सरकारने हे जे मुंबई राज्य स्थापन केले त्याला सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातून प्रचंड विरोध सुरू झाला. परंतु भाषिक आधारावर राज्य रचना करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये नाराजी पसरली.  परंतु असे असताना देखिल काही राज्यांना भाषिक प्रांतरचनेचा आधार देत स्वतंत्र राज्य करण्यास परवानगी मिळाली आणि महाराष्ट्रातील जनतेचा क्षोभ वाढला. त्यानंतर पुढचे पाऊल टाकत केंद्र सरकारने गुजरात, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला मुंबईपासून वेगळं करून स्वतंत्र मुंबई अशी तीन राज्यांची स्थापना करण्याची योजना आणली. परंतु याला देखील महाराष्ट्रातील सर्व जनतेने एकजुटीने तीव्र विरोध केला आणि जोरदार निदर्शने केली. अशाच काही निदर्शनांवरती पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात आणि गोळीबारात अनेक मराठी आंदोलकांना वीरगती प्राप्त झाली. परंतु कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील जनता तीन स्वतंत्र राज्य मान्य करण्याच्या परिस्थितीत नव्हती. केशवराव जेधे, सेनापती बापट, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस एम जोशी, ना ग गोरे, कॉम्रेड डांगे अशा मान्यवरांनी महाराष्ट्राच्या स्वतंत्र मागणीसाठी झालेल्या आंदोलनात जनतेचे नेतृत्व केले. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीला चांगलाच जोर चढला. पोलिसांनी निदर्शकांवर केलेल्या हल्ल्यात १०५  आंदोलक हुतात्मा झाले. जसजसा जनआंदोलनाचा रेटा जोरदार वाढला, तशी त्याची गंभीरता अखेरीस केंद्र सरकारच्या लक्षात आली आणि ०१ मे १९६० रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन करण्याला मान्यता दिली गेली. गुजराती भाषिकांचे गुजरात हे वेगळे राज्य निर्माण केले गेले. परंतु यातही बेळगाव, कारवार, निपाणी असा काही भाग महाराष्ट्रात सामील करण्यात आला नव्हता की ज्याचा सीमावाद आजही धगधगतो आहे.

 

हेही वाचा: अभिजात मराठी म्हणजे नक्की काय? What is classical-Abhijaat Marathi?

 

महाराष्ट्रचे ऐतिहासिक विभाग l Historical Divisions of Maharashtra in Marathi

ज्वलंत इतिहास असलेल्या महाराष्ट्रचे पूर्वापार चालत आलेले जे विभाग आहेत त्याला आपण ऐतिहासिक विभाग असे म्हणतो. महाराष्ट्रातील भौगोलिक विविधता लक्षात घेऊन ऐतिहासिक रित्या महाराष्ट्राचे पाच मुख्य विभाग पडतात ते पुढीलप्रमाणे.

कोकण (Konkan)

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्ग

पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra)

सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे

मराठवाडा (Marathawada)

छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचा औरंगाबाद), धाराशिव (पूर्वीचा उस्मानाबाद), जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली

खानदेश (Khandesh)

नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहिल्यादेवी नगर (पूर्वीचा अहमदनगर)

विदर्भ (Vidarbh)

अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली

District and Capitals in Maharashtra in Marathi

महाराष्ट्रचे प्रशासकीय विभाग l Administrative Divisions of Maharashtra in Marathi

प्रशासकीय सोयीसाठी महाराष्ट्रचे एकूण सहा विभाग केलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे

कोकण (Konkan)

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्ग

पुणे (Pune)

सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे

छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचा औरंगाबाद), धाराशिव (पूर्वीचा उस्मानाबाद), जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली

 नाशिक (Nashik)

नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहिल्यादेवी नगर (पूर्वीचा अहमदनगर)

अमरावती (Amravati)

अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम

नागपूर (Nagpur)

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली

हेही वाचा: मराठी महिने आणि भारतीय ऋतू l Marathi months and Indian seasons in Marathi

महाराष्ट्रातील जिल्हे आणि मुख्य ठिकाणे l District and Capitals in Maharashtra in Marathi
अ. क्र. ऐतिहासिक विभाग प्रशासकीय विभाग जिल्हा मुख्य ठिकाण निर्मिती वर्ष क्षेत्रफळ लोकसंख्या (लाखात)
कोकण कोकण मुंबई मुंबई १ मे १९६० १५७ ३०
 मुंबई उपनगर वांद्रे १ ऑक्टोबर १९९० ४४६ ९३
ठाणे ठाणे १ मे १९६० ४२१४ ११०
पालघर पालघर १ ऑगस्ट २०१४ ५३४४ ३०
रायगड अलिबाग १ मे १९६० ७१५२ २६
रत्‍नागिरी रत्‍नागिरी १ मे १९६० ८२०८ १६
 सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी (ओरस बुद्रुक) १ मे १९८१ ५२०७ ०९
पश्चिम महाराष्ट्र  पुणे  सांगली  सांगली १ मे १९६० ८५७८ २८
सातार सातार १ मे १९६० १०४८० ३०
१०  कोल्हापूर  कोल्हापूर १ मे १९६० ७६८५ ३८
११ सोलापूर सोलापूर १ मे १९६० १४८९५ ४३
१२ पुणे पुणे १ मे १९६० १५६४३ ९४
१३ मराठवाडा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचा औरंगाबाद) छत्रपती संभाजीनगर १ मे १९६० १०१०० ३७
१४ धाराशिव (पूर्वीचा उस्मानाबाद) धाराशिव १ मे १९६० ७५६९ १६
१५ जालना जालना १ मे १९८१ ७६८७ १९
१६  नांदेड  नांदेड १ मे १९६० १०५२८ ३३
१७ परभणी परभणी १ मे १९६० ६२५१ १८
१८ बीड बीड १ मे १९६० १०६९३ २५
१९ लातूर लातूर १६ ऑगस्ट १९८२ ७१५७ २४
२० हिंगोली हिंगोली १ मे १९९९ ४५२६ ११
२१ खानदेश नाशिक  नाशिक नाशिक १ मे १९६० १५५८२ ६१
२२  नंदुरबार  नंदुरबार १ मे १९६० ५९५५ १६
२३  धुळे  धुळे १ मे १९६० ७१९५ २०
२४ जळगाव जळगाव १ मे १९६० ११७६५ ४२
२५ अहिल्यादेवी नगर (पूर्वीचा अहमदनगर) अहिल्यादेवी नगर १ मे १९६० १७०४८ ४५
२६ विदर्भ अमरावती अमरावती अमरावती १ मे १९६० १२२३५ २८
२७ अकोला अकोला १ मे १९६० ५४२८ १८
२८ बुलढाणा बुलढाणा १ मे १९६० ९६६१ २४
२९ यवतमाळ यवतमाळ १ मे १९६० १३५८२ २७
३० वाशिम वाशिम १ जुलै १९९८ ५१५० ११
३१ नागपूर नागपूर नागपूर १ मे १९६० ९८९२ ४६
३२ वर्धा वर्धा १ मे १९६० ६३१० १३
३३ भंडारा भंडारा १ मे १९६० ३७१७ १२
३४ गोंदिया गोंदिया १ मे १९९९ ५२३४ १३
३५ चंद्रपूर चंद्रपूर १ मे १९६० ११४४३ २२
३६ गडचिरोली गडचिरोली २६ ऑगस्ट १९८२ १४११२ १०

 

महाराष्ट्रातील जिल्हे आणि मुख्य ठिकाणे l District and Capitals in Maharashtra in Marathi

हेही वाचा: उल्का किंवा उल्कापात म्हणजे काय? l What is Meteor or Meteor shower in Marathi

Leave a comment