महिने आणि वार मराठी आणि इंग्लिशमध्ये l Months and Days in Marathi and English
नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो आपल्या रोजच्या जीवनाचे अविभाज्य अंग म्हणजे काळ आणि त्याचे मोजमाप करण्यासाठी आपण वर्ष, महीने, आठवडे, दिवस ते अगदी मिनिट, सेकंद ही एकके वापरतो. त्यातल्याच इंग्रजी कॅलेंडरमधील महिन्यांची आणि वारांच्या नावांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
एक वर्ष म्हणजे काय? (What is one year in Marathi)
पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका प्रदक्षिणेला आपण एक वर्ष असे म्हणतो. हे एक वर्ष ३६५ दिवसांचे असते. याचे बारा समान भाग केलेले आहेत. त्या प्रत्येक भागाला आपण महिना असे म्हणतो. म्हणून इंग्रजी कॅलेंडर नुसार एका वर्षात बारा महीने येतात. साधारणपणे प्रत्येक महिन्यात ३० किंवा ३१ दिवस असतात. फक्त फेब्रुवारी महिन्याचे दिवस २८ किंवा २९ एवढे असतात.
हेही वाचा: प्राण्यांची मराठी नावे l Animals names English to Marathi
लिप वर्ष (What is leap year in Marathi)
पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारायला ३६५ दिवसांपेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो. आणि हा वेळ साठत जाऊन दर चार वर्षांनी एक दिवस वाढतो. म्हणून तो दिवस सामावून घेण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी येणारे प्रत्येक वर्ष हे ३६६ दिवसांचे असते ज्याला आपण लिप वर्ष असे म्हणतो. हा वाढीव दिवस फेब्रुवारी महिन्यात येतो. म्हणून नेहमी २८ दिवसांचा असणारा फेब्रुवारी महिना दर चार वर्षानी म्हणजे लिप वर्षात २९ दिवसांचा असतो.
लिप वर्ष कसे ओळखतात?
इंग्रजी कॅलेंडर नुसार जे साल किंवा वर्ष असते त्याला ४ ने पूर्ण भाग गेला तर ते लिप वर्ष म्हणून ओळखतात. उदा. इ.स. २०२४ ला ४ ने पूर्ण भाग जातो म्हणून इ.स. २०२४ हे लिप वर्ष आहे. तर इ.स. २०२३ ला ४ ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून ते लिप वर्ष नाही.
इंग्रजी वर्षाचे बारा महीने (Twelve months of English calendar )
इंग्रजी कॅलेंडरनुसार बारा महिने पुढीलप्रमाणे.
अ. क्र. | इंग्रजी महीने | मराठी उच्चार | दिवस/ no. of days |
१ | January | जानेवारी | ३१ |
२ | February | फेब्रुवारी | २८/२९ |
३ | March | मार्च | ३१ |
४ | April | एप्रिल | ३० |
५ | May | मे | ३१ |
६ | June | जून | ३० |
७ | July | जुलै | ३१ |
८ | August | ऑगस्ट | ३१ |
९ | September | सप्टेंबर | ३० |
१० | October | ऑक्टोबर | ३१ |
११ | November | नोहेंबर | ३० |
१२ | December | डिसेंबर | ३१ |
आठवड्याचे वार (Days in a Week)
आठवड्याचे सात वार मराठी आणि इंग्लिश मध्ये पुढीलप्रमाणे.
अ. क्र. | इंग्लिश (English) | मराठी उच्चार (Marathi Pronunciation) | मराठी (Marathi) | इंग्लिश उच्चार (English Pronunciation) |
१ | Monday | मंडे | सोमवार | Somvar |
२ | Tuesday | ट्यूसडे | मंगळवार | Mangalvar |
३ | Wednesday | वेन्सडे | बुधवार | Budhvar |
४ | Thursday | थर्सडे | गुरुवार | Guruvar |
५ | Friday | फ्रायडे | शुक्रवार | Shukrvar |
६ | Saturday | सॅटर्डे | शनिवार | Shanivar |
७ | Sunday | संडे | रविवार | Ravivar |
खरं तर वारांची नावे आणि खगोल याचा खूप जवळचा संबंध आहे. ही नावे आकाशातील ग्रह-तार्यांवरुनच पडलेली आहेत. जसे की रविवार मधला रवी म्हणजे सूर्य, सोमवार मधला सोम म्हणजे चंद्र, मंगळवार मधला मंगळ, बुधवार मधला बुध, गुरुवार मधला गुरु, शुक्रवार मधला शुक्र, शनीवार मधला शनी या खगोलांवरुनच ही नावे पडलेली आहेत.
हेही वाचा: मराठी महिने आणि भारतीय ऋतू l Marathi months and Indian seasons in Marathi
महिने आणि वार मराठी आणि इंग्लिशमध्ये l Months and Days in Marathi and English