मिलेनिअल म्हणजे काय? जनरेशन झेड म्हणजे काय? What is Millennial? What is Gen Z? in Marathi

मिलेनिअल म्हणजे काय? जनरेशन झेड म्हणजे काय? What is Millennial? What is Gen Z? in Marathi

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. जगातील प्रत्येक संस्कृती काळानुसार बदलत जाते. बरे वाईट बदल अनुभवत त्या संस्कृतीचा विकास सुरू राहतो.  त्या त्या काळातील सामाजिक, आर्थिक, वैचारिक गोष्टींचे संस्कार माणसांवरती होत असतात. त्यांना तोंड द्यावी लागलेली संकटे, त्यांना मिळालेल्या संधी, त्या काळात आलेल्या मोठमोठ्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती, जागतिक घडामोडी यातून त्यांची एक विचारसरणी बनत जाते त्याचा प्रभाव त्याच्या एकंदरीत वागणुकीवर होत असतो. त्यामुळे काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर जन्मलेल्या लोकांच्या म्हणजेच वेगवेगळ्या पिढीतील किंवा जनरेशनच्या विचारसरणीत फरक असतो यालाच आपण जनरेशन गॅप (Generation Gap) असे म्हणतो. पाश्चात्य संशोधकांनी अशाच वेगवेगळ्या काळात जन्मलेल्या लोकांचा अभ्यास करून एक विशिष्ट विचारसरणी आणि जीवन जगण्याची ठराविक पद्धत असलेल्या लोकांसाठी ठराविक नावे सुचविली. प्रत्येक पिढीची स्वतःची काही वैशिष्टे असतात त्यावर आधारित त्यांच्या पिढीसाठी विशिष्ट नावे द्यायला सुरुवात केली आणि यातूनच वेगवेगळ्या पिढ्यांसाठी बेबी बूमर जनरेशन, एक्स मिलेनिअल्स, जनरेशन झेड अशी नामकरणे सुरू झाली याचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

हेही वाचा: पाऊस कसा मोजतात? मिमी पाऊस म्हणजे किती? How rain measures? mm rain meaning in Marathi

साधारणपणे समान विचारसरणी असलेल्या, एका विशिष्ट पद्धतीने वागणार्‍या आणि ठराविक काळात जन्मलेल्या लोकांसाठी त्यांच्या पिढीनुसार पाश्चात्त्य संशोधकांनी सुचवलेली  नावे:

what-is-millennial-what-is-gen-z-in-marathi

लॉस्ट जनरेशन (Lost Generation)

१८८३ ते १९०० या काळात जन्मलेल्या पिढीला लॉस्ट जनरेशन म्हटले जाते.

या काळात जन्मलेल्या लोकांना पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, त्याचे दुष्परिणाम आणि या मधल्या काळातला जागतिक संकटांना आणि त्याच्या परिणामांना तोंड द्यावे लागले.  या पिढीतील बहुतांशी लोक आज हयात नाहीत.

ग्रेटेस्ट जनरेशन (Greatest Generation )

१९०१ ते १९२७ या काळात जन्मलेल्या लोकांच्या पिढीला ग्रेटेस्ट जनरेशन म्हटले जाते.

यांच्या काळात देखील काहींनी एक तर काहींनी दोन्ही महायुद्धे पाहिली. महत्त्वाचे अनेक वैज्ञानिक शोध या काळात लागले. अनेक वैज्ञानिक संशोधक आणि जागतिक दर्जाचे विचारवंत मार्गदर्शक या काळात तयार झाले म्हणून या पिढीला ग्रेटेस्ट जनरेशन असे म्हणतात.

सायलेंट जनरेशन (Silent Generation)

१९२८ ते १९४५ या काळात जन्मलेल्या लोकांच्या पिढीला सायलेंट जनरेशन असे म्हटले जाते.

दोन्ही महायुद्धानंतर झालेल्या अनेक दुष्परिणामांसोबतच जगाची ढासळलेली आर्थिक स्थिती आणि त्यामुळे पुढे आलेली आर्थिक मंदी याचा सामना या पिढीने केला. आपल्या उदरनिर्वाहा साठी खूप संघर्ष आणि कष्ट या पिढीने केले. म्हणून या पिढीला सायलेंट जनरेशन असं नाव मिळालं. कठोर परिश्रम, शिस्त आणि साधी राहणी ही या पिढीची खासियत. वाचन, रेडियो ही करमणुकीची साधने होती.

बेबी बूमर्स जनरेशन (Baby Boomers Generation)

१९४६ ते १९६४ या काळात जन्मलेल्या लोकांच्या पिढीला बेबी बूमर्स असे म्हटले जाते.

दुसरा महायुद्धाच्या परिणामांमधून जग थोडसं सावरल्यानंतर या पिढीचा काळ येतो.  हा काळ थोडा सुस्थितीच काळ होता. औद्योगिक क्रांतीची चांगली फळे या लोकांना मिळाली. या स्थिर काळामुळे या पिढीत मोठ्या प्रमाणावर मुलांना जन्म दिला गेला आणि त्यामुळे जन्मदर वाढला म्हणून या पिढीला बेबी बूमर्स असं म्हटलं जातं. आधुनिक तंत्रज्ञान जसं की संगणक या पिढीला तेवढं सहज साध्य नव्हतं तरीही काही जणांनी त्याच्याशी जुळवून घेतलं. उत्तम संस्कार आणि मूल्य, कष्ट आणि साधेपणा जपणारी ही पिढी. रेडिओ सोबतच टीव्ही चा वापर या पिढीने सुरू केला.

हेही वाचा: मिलियन, बिलियन, ट्रिलियन म्हणजे नक्की किती? How much is Million, Billion, Trillion exactly in Marathi.

जनरेशन एक्स (Generation X)

१९६५ ते १९८० च्या दरम्यान जन्मलेल्या या पिढीला जनरेशन एक्स असं म्हणतात.

उत्तम जागतिक स्थैर्य आणि आधुनिकीकरणाचे चांगले परिणाम अनुभवलेली ही पिढी. आधुनिक टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानाचे उत्तम फायदे या पिढीला मिळाले. संगणक, फोन, मोबाईल, गाड्या यांचा वापर या पिढीने मोठ्या प्रमाणावर सुरू केला. चित्रपट, संगीत, मोठ्या प्रमाणावर प्रवास ही या पिढीची वैशिष्ठे.

 

मिलेनिअल्स Millennials 

१९८१ ते १९९६ या दरम्यान जन्मलेल्या या पिढीला मिलेनिअर्स किंवा जनरेशन वाय किंवा (Generation Y)म्हणूनही ओळखले जाते.

मोठ्या प्रमाणावरचे तंत्रज्ञानातील बदल आणि प्रत्येक गोष्टीचे जागतिकीकरण (ग्लोबलायझेशन Globalization) पाहिलेले ही पिढी. म्हणजे रेडिओ पासून संगणका पर्यंत किंवा टेलिफोन पासून स्मार्टफोन पर्यंत अनेक गोष्टींचा वापर या काळातले लोक करतायत.  इंटरनेट युगाचा खऱ्या अर्थाने वापर करणारी ही पिढी. ज्यांच्या खिशात मोबाईल आहेत, ज्यांच्यापैकी बर्‍याच जणांकडे बाईक किंवा कार आहे ती ही पिढी. नवीन तंत्रज्ञान सहज आत्मसात करणारी परंतु काहीशी बंडखोर किंवा प्रस्थापित गोष्टींना आव्हान देणारी ही पिढी.

Gen Z (Generation Z) जनरेशन झेड किंवा पोस्ट मिलेनियल्स

१९९७ ते २०१२ च्या दरम्याने जन्मलेली ही पिढी. 

सध्याची नवतरुणांची ही पिढी. थोडोशी लाडावलेली आणि आपल्याला हवं ते मिळवणारी ही पिढी. या पिढीने लहानपणीच हातात स्मार्टफोन घेतला आणि इंटरनेटचा वापर सुरू केला. आधीच्या पिढ्यांमधली स्थित्यंतरे, त्यांचे कष्ट यांची फारशी माहीती नसणारी  आणि थेट ग्लोबलायझेशनच्या जमान्यात जन्मलेली ही पिढी. सोशल मीडिया चा खूप वापर, थोडा चंगळवाद आणि त्यामुळे येणारं नैराश्य यात अडकलेली पिढी.

अल्फा जनरेशन (Alpha Generation)

२०१३ ते आत्तापर्यंत जन्मलेल्या मुलांची पिढी.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स च्या जमान्यात जन्मलेली पिढी. यांची स्वभाववैशिष्टे आपल्याला अजून कळायची आहेत.

मिलेनिअल म्हणजे काय? जनरेशन झेड म्हणजे काय? What is Millennial? What is Gen Z? in Marathi

हेही वाचा: यु ट्यूब म्हणजे काय? यु ट्यूब विषयी संपूर्ण माहिती l YouTube information in Marathi

Leave a comment