1 GB, 1 MB किंवा 1 KB म्हणजे नक्की किती? मेमरी स्टोरेज मोजतात तरी कसं? What is 1 GB, 1 MB or 1 KB? How memory storage measured in Marathi

1 GB, 1 MB किंवा 1 KB म्हणजे नक्की किती? मेमरी स्टोरेज मोजतात तरी कसं? What is 1 GB, MB or KB? How memory storage measured in Marathi

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो सध्याच्या जगात कॉम्प्युटर, मोबाईल, पेन ड्राईव्ह, इंटरनेट, डाटा पॅक या सर्वच गोष्टी आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. या सर्वांबाबत चर्चा करतानाच आपण 2 MB चा फोटो, 10 MB चं गाणं, 2 GB चं मेमरी कार्ड, 8 GB चा पेन ड्राईव्ह,  1.5 GB पर डे डेटा पॅक, 1 TB ची हार्ड डिस्क असे एक ना अनेक उल्लेख करत असतो. यातील MB (एमबी), GB  (जीबी) किंवा TB (टिबी) हे नक्की आहे तरी काय? या लेखात आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
1 GB, 1 MB किंवा 1 KB म्हणजे नक्की किती? मेमरी स्टोरेज मोजतात तरी कसं? What is 1 GB, MB or KB? How memory storage measured in Marathi
डेटा (Data) म्हणजे काय? What is data in Marathi
संगणक, मोबाईल, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह,  हार्ड डिस्क, गुगल ड्राईव्ह या सर्वच गोष्टी डेटा स्टोअर करतात. आता हा डेटा म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर डेटा म्हणजे माहिती. आपण मोबाईल वरती एखादा फोटो क्लिक केला तर तो फोटो मोबाईल मध्ये साठवला जातो किंवा मोबाईलच्या मेमरी मध्ये स्टोअर केला जातो म्हणजेच त्या फोटोशी संबंधित माहिती मोबाईल मध्ये साठवली जाते ज्याला आपण डेटा असे म्हणतो. व्हाट्सअप वरती आपण एखाद्याशी चॅट केलं तर तेही याच प्रकारे व्हाट्सअप च्या सर्वर वरती स्टोअर केलं जातं किंवा जेव्हा आपण गुगल ड्राईव्ह वर काहीतरी अपलोड करतो तेव्हा ते गुगलच्या कुठल्यातरी सर्वर मध्ये डेटा च्या रुपात साठवलं किंवा स्टोअर केलं जातं.  आणि MB (एमबी), GB  (जीबी) किंवा TB (टिबी) ही याच डेटा मोजण्याची परिमाण अर्थात एकक किंवा युनिट्स आहेत. जेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून माहितीची देवाण-घेवाण होते म्हणजेच जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ डाऊनलोड करता तेव्हा तेवढी माहिती त्या वेबसाईटच्या सर्वर वरून आपल्या मोबाईल वरती किंवा कॉम्प्युटर वरती डाऊनलोड करून साठवली जाते म्हणजेच तेवढा डेटा त्या सर्वर वरून आपल्या मोबाईल वरती कॉपी केला जातो.
डेटा किंवा माहिती साठवण्याची पद्धत (बायनरी पद्धत)l Binary System of data storage in Marathi
संगणक, मोबाईल, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह,  हार्ड डिस्क, गुगल ड्राईव्ह या सर्व यंत्रणांमध्ये वन किंवा झिरो च्या रूपात (in a form of 1 or 0) ही माहिती साठवली जाते आणि त्याची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स वापरली जातात. यालाच डेटा किंवा माहिती साठवण्याची बायनरी पद्धत म्हणतात. यातील वन किंवा झिरो (1 or 0) या एका डिजिटला बीट (Bit)असं म्हटलं जातं, तर अशा आठ बिट च्या कॉम्बिनेशन ला बाईट (Byte) असं म्हटलं जातं. उदा. 10101010 किंवा 11001011.  कॉम्प्युटर किंवा मोबाईल किंवा सॉफ्ट फॉर्ममध्ये साठवली जाणारी प्रत्येक माहिती याच प्रकारे किंवा फॉरमॅटमध्ये साठवली जाते.
MB (एमबी), GB  (जीबी) किंवा TB (टिबी) म्हणजे किती? What is 1 GB, MB or KB?
जेव्हा जास्त माहिती असते म्हणजेच जास्त डेटा असतो तेव्हा बाईटची संख्या देखील वाढते आणि याच मोठ्या संख्या दर्शविण्यासाठी वेगवेगळे युनिट्स वापरले जातात.
जसे की लांबी मोजताना
एक मीटर (1m),
एक हजार मीटर बरोबर एक किलोमीटर (1000m = 1 Km),
एक हजार किलोमीटर बरोबर एक मेगा मीटर (1000Km = 1 Mm )
किंवा वजन मोजताना
एक ग्रॅम (1gm),
एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलोग्रॅम (1000 gm = 1Kg),
एक हजार किलोग्रॅम म्हणजे एक मेगा ग्राम किंवा एक टन (1000Kg = 1Mg = 1Tonne) इत्यादी.
आणि डेटा मोजताना वापरली जाणारी युनिट्स
1 Bit बीट
8 Bit बीट 1 Byte (B) बाइट
1024 Byte (B) बाइट 1 Kilobyte (KB) किलोबाइट
1024 Kilobyte (KB) किलोबाइट 1 Megabyte (MB) मेगाबाइट
1024 Megabyte (MB) मेगाबाइट 1 GigaByte (GB) गिगाबाइट
1024 Gigabyte (GB) गिगाबाइट 1 Terabyte (TB) टेराबाइट

 

यावरून  एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की इतर सर्व युनिट्समध्ये हजारच्या पटीत मोठी युनिट्स वापरतात मात्र डेटा संबंधी युनिट्स मध्ये 1024 च्या पटीत मोठी युनिट्स वापरली जातात. 1 GB, 1 MB किंवा 1 KB म्हणजे नक्की किती? मेमरी स्टोरेज मोजतात तरी कसं? What is 1 GB, MB or KB? How memory storage measured in Marathi

Leave a comment