मिलियन, बिलियन, ट्रिलियन म्हणजे नक्की किती? How much is Million, Billion, Trillion exactly in Marathi.

मिलियन, बिलियन, ट्रिलियन म्हणजे नक्की किती? How much is Million, Billion, Trillion exactly in Marathi.

१ मिलियन म्हणजे नक्की किती? How much is 1 Million in Marathi.

१ बिलियन म्हणजे नक्की किती? How much is 1 Billion in Marathi.

१ ट्रिलियन म्हणजे नक्की किती? How much is 1 Trillion in Marathi.

हेही वाचा: 1 GB, 1 MB किंवा 1 KB म्हणजे नक्की किती? मेमरी स्टोरेज मोजतात तरी कसं? What is 1 GB, 1 MB or 1 KB? How memory storage measured in Marathi

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. अमुक एका युट्यूब चॅनलचे एक मिलियन सबस्क्रायबर पूर्ण ! तमुक उद्योगपतींची संपत्ती तब्बल चार बिलियन डॉलर्स! अब देशाची अर्थव्यवस्था दोन ट्रिलियन डॉलर्सच्या पार! या कंपनीची  700 हजार कोटींची वार्षिक उलाढाल किंवा या बँकेत 200 लाख कोटींचा घोटाळा अशा एक न अनेक बातम्या सध्या आपल्याला पाहायला मिळतात. यातले मोठमोठाले आकडे बघूनच आपण चक्रावतो. एक मिलियन, एक बिलियन, एक ट्रिलियन किंवा एक हजार कोटी, एक लाख कोटी हे शब्द कानावर पडत असताना देखील बऱ्याच जणांना त्यांची नेमकी किंमत माहिती नसते. याच मोठमोठ्या संख्यांची नेमकी माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. मिलियन, बिलियन, ट्रिलियन म्हणजे नक्की किती? How much is Million, Billion, Trillion exactly in Marathi.

 मोठ्या संख्या

मित्रांनो आपल्या भारतीय गणितात कोणतीही गोष्ट मोजताना म्हणजे पैसे असतील किंवा इतर काही गोष्टी असतील तर मराठीत साधारणपणे शेकडा, हजार, लाख, कोटी, अब्ज या प्रकारे आपल्याकडे गणना होते परंतु हल्ली जेव्हा आपण इंग्रजी मधून हे सर्व आकडे ऐकतो त्यावेळेस बऱ्याचदा मिलियन, बिलियन किंवा ट्रिलियन अशा शब्दांचा वापर होतो. म्हणजे एखाद्या युट्युब व्हिडिओला मिळालेले लाईक किंवा त्या चॅनल चे फॉलोवर्सची संख्या मिलियन मध्ये दाखवलेली असते उदाहरणार्थ वन मिलियन, टू मिलियन किंवा सरकारच्या एखाद्या मोठ्या प्रकल्पावरचा (गव्हर्नमेंट प्रोजेक्ट) खर्च किंवा एखाद्या कंपनीची वार्षिक उलाढाल बिलियन डॉलर्स मध्ये दिलेला असते आणि एखाद्या देशाची अर्थव्यवस्था मोजताना ट्रिलियन हा शब्द वापरला जातो. मिलियन, बिलियन, ट्रिलियन म्हणजे नक्की किती? How much is Million, Billion, Trillion exactly in Marathi.

हेही वाचा: इंग्लिश १ ते १०० अंकांचे मराठी प्रतिशब्द l English 1 to 100 numbers in Marathi

भारतीय दशमान पद्धत

गणितामध्ये एखाद्या गोष्टीचे मोजमाप करण्यासाठी जगत प्राचीन काळापासून वेगवेगळ्या पद्धती होत्या पण त्यातल्या सर्वात उपयुक्त पद्धतीचा शोध आपल्या भारतीय पूर्वजांनी लावला आणि ती पद्धत म्हणजे दशमान पद्धत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शून्याचा शोध आर्यभट्ट यांनी लावला आणि गणितातील मोठी देणगी त्यांनी जगाला दिली परंतु त्यासोबतच किंवा तेवढीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे दशमान पद्धत आपण जगाला दिली. कारण या पद्धतीनुसार एखाद्या संख्येवर फक्त शून्य ठेवत गेलो किंवा त्या संख्येचे स्थान बदलले तर त्या संख्येची किंमत बदलत जाते. म्हणूनच अतिशय कमी आकड्यांमध्ये खूप मोठ्या संख्या लिहिता येतात.

 

भारतीय आणि जागतिक संख्यांचा संबंध

खालील सारणीमध्ये भारतीय आणि जागतिक संख्यांचा संबंध दर्शविला आहे.

संख्या

शुन्यांची संख्या मराठी   इंग्लिशमध्ये English
1 0 एक   वन

One

10

1 (एक शून्य) दहा   टेन Ten
100 2 (दोन शून्य) शंभर   हंड्रेड

Hundred

1000

3 (तीन शून्य) हजार   थाऊजंड Thousand
10000 4 (चार शून्य) दहा हजार   टेन थाऊजंड

Ten Thousand

100000

5 (पाच शून्य) एक लाख   वन लॅक One Lac
1000000 6 (सहा शून्य) दहा लाख एक दशलक्ष वन मिलियन

One Million

10000000

7 (सात शून्य) एक कोटी दहा दशलक्ष टेन मिलियन Ten Million
100000000 8 (आठ शून्य) दहा कोटी शंभर दशलक्ष हंड्रेड मिलियन

Hundred Million

1000000000

9 (नऊ शून्य) एक अब्ज शंभर कोटी वन बिलियन One Billion
10000000000 10 (दहा शून्य) दहा अब्ज एक हजार कोटी टेन बिलियन

Ten Billion

100000000000

11 (अकरा शून्य) एक खर्व दहा हजार कोटी हंड्रेड बिलियन Hundred Billion
1000000000000 12 (बारा शून्य) दहा खर्व एक लाख कोटी वन ट्रिलियन

One Trillion

10000000000000

13 (तेरा शून्य) एक निखर्व दहा लाख कोटी टेन ट्रिलियन Ten Trillion
100000000000000 14 (चौदा शून्य) दहा निखर्व एक कोटी कोटी हंड्रेड ट्रिलियन

Hundred Trillion

1000000000000000

15 (पंधरा शून्य) एक पद्म   वन क्वाड्रिलियन One Quadrillion
10000000000000000 16 (सोळा शून्य) दहा पद्म   टेन क्वाड्रिलियन

Ten Quadrillion

100000000000000000

17 (सतरा शून्य) एक शंखू   हंड्रेड क्वाड्रिलियन Hundred Quadrillion
1000000000000000000 18 (अठरा शून्य) दहा शंखू   वन  क्वांटिलियन

One Quintillion

10000000000000000000

19 (एकोणीस शून्य) एक अंत्य   टेन क्वांटिलियन

Ten Quintillion

 

हेही वाचा: मूलद्रव्ये आणि आधुनिक आवर्त सारणी l Elements and Modern Periodic Table in Marathi

मिलियन, बिलियन, ट्रिलियन म्हणजे नक्की किती? How much is Million, Billion, Trillion exactly in Marathi.

१ मिलियन म्हणजे नक्की किती? How much is 1 Million in Marathi.

१ बिलियन म्हणजे नक्की किती? How much is 1 Billion in Marathi.

१ ट्रिलियन म्हणजे नक्की किती? How much is 1 Trillion in Marathi.

मित्रांनो वरील सारणी वापरुन तुम्हाला कोणत्याही मोठ्या संख्येचा अर्थ लावता येईल. यासंदर्भात तुमच्याकडे काही अधिक माहिती असेल तर नक्की कमेंट करून कळवा.

Leave a comment