आर्थिक गुंतवणुकीचा ७२ चा नियम l Rule of 72 of financial investment in Marathi

आर्थिक गुंतवणुकीचा ७२ चा नियम l Rule of 72 of financial investment in Marathi

नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो सध्याच्या आयुष्यात आपण सगळेच पैशाचे मोल जाणतो. पैसे मिळवण्यासाठी, ते वाढविण्यासाठी गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग शोधत असतो. एखाद्या योजनेत पैसे गुंतवताना त्यातुन किती परतावा किंवा रिटर्न (return) मिळणार आहेत याची माहिती घेऊनच, त्याचा व्यवास्थित अभ्यास करून आपण आपले पैसे गुंतवतो. यात जेव्हा आपण आर्थिक परताव्याचा विचार करतो तेव्हा पटकन आपल्या मनात येणारा विचार असतो तो म्हणजे किती वर्षांत आपले पैसे दुप्पट किंवा डबल होतील? किंवा दोन वर्षात पैसे डबल अशी जाहिरात करणारी एखादी योजना व्यावहारिक आहे का? याच पैसे डबल करणार्‍या योजनांचे गणित ऊलगडून दाखविणारा एक सोप्पा नियम आपण या लेखात पाहणार आहोत. आर्थिक गुंतवणुकीचा ७२ चा नियम l Rule of 72 of financial investment in Marathi

कोणत्याही गोष्टीसाठी पैसे उभे करायचे असतील तर वेळीच योग्य आर्थिक नियोजन करून, पैशाची बचत आणि योग्य गुंतवणूक गरजेची असते. यासाठी फिक्स डिपॉझिट (Fix deposit FD), रिकरिंग डिपॉझिट (Recurring deposit RD), म्युच्युअल फंड (Mutual Fund) किंवा शेअर मार्केट(Share Market) असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या ज्ञानानुसार किंवा तज्ञ लोकांच्या सल्ल्याने आपण यातले वेगवेगळे प्रकार गुंतवणुकीसाठी वापरू शकतो. परंतु प्राथमिक पातळीवर आपल्याला कोणत्याही योजनेचा फायदा जाणून घ्यायचा असेल किंवा किती वर्षात आपली गुंतवणूक दुप्पट होणार हे माहीत करायचं असेल तर  आर्थिक गुंतवणुकीचा ७२ चा नियम l Rule of 72 of financial investment in Marathi आपल्याला मदत करतो.

हेही वाचा: आर्थिक नियोजनाचा ५०-३०-२० नियम l 50-30-20 rule of financial planning in Marathi

गुंतवणुकीचा ७२ चा नियम काय आहे?

प्रत्येक आर्थिक गुंतवणुकीची योजना परताव्याचा  वार्षिक व्याजदर देत असते. मात्र त्यातून किती वर्षांत पैसे दुप्पट होणार हे पटकन कळत नाही.  त्यासाठी किचकट आकडेमोड करावी लागते आणि हे प्रत्येकाला जमतेच असे नाही. आणि याच प्रश्नाचे उत्तर शोधायला गुंतवणुकीचा ७२ चा नियम आपल्याला मदत करतो l Rule of 72 of financial investment in Marathi

७२ या संख्येला वार्षिक व्याजदराने भागले की जी संख्या मिळते ती म्हणजे गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी लागणारी वर्षे!

गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी लागणारी वर्षे = ७२ ÷ गुंतवणुकीचा वार्षिक व्याजदर
काही महत्त्वाचे मुद्दे
  • गुंतवणुकीचा व्याजदर हा वार्षिक आहे.
  • येथे चक्रीवाढ व्याज लक्षात घेतले आहे.
  • येणारे उत्तर हे अचूक नसून जवळपास आहे परंतु सुरुवातीची कल्पना येण्यासाठी ते पुरेसे आहे. 

हेही वाचा: वॉरेन बफे यांचे प्रेरणा देणारे विचार l Inspirational thoughts of Warren Buffett in Marathi

उदाहरण १

समजा एका फिक्स डिपॉझिट चा परताव्याचा वार्षिक व्याजदर आहे ६% म्हणजे ७२ च्या नियमानुसार

गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी लागणारी वर्षे = ७२ ÷ गुंतवणुकीचा वार्षिक व्याजदर= ७२ ÷ ६ = १२ वर्षे

तर १२ वर्षांत तुमचे पैसे दुप्पट होतील.

उदाहरण २

समजा एका म्युच्युअल फंड चा परताव्याचा वार्षिक व्याजदर आहे १८% म्हणजे ७२ च्या नियमानुसार

गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी लागणारी वर्षे = ७२ ÷ गुंतवणुकीचा वार्षिक व्याजदर= ७२ ÷ १८ = ४ वर्षे

तर केवळ ४ वर्षांत तुमचे पैसे दुप्पट होतील.

उदाहरण ३

याच नियमानुसार समजा एखादी योजना फक्त २ वर्षांत तुम्हाला पैसे दुप्पट करून देत असेल तर त्यासाठी लागणारा व्याजदर असेल,

गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी लागणारी वर्षे= २ वर्षे  = ७२ ÷ गुंतवणुकीचा वार्षिक व्याजदर

म्हणजे ३६% एवढा मोठा परताव्याचा वार्षिक व्याजदर गरजेचा असेल जो व्यावहारिक नाही म्हणजेच ती योजना फसवी असू शकते. म्हणून पूर्ण माहिती घेतल्याशिवाय अशा योजनांमध्ये पैसे टाकू नका.

आर्थिक गुंतवणुकीचा ७२ चा नियम l Rule of 72 of financial investment in Marathi

हेही वाचा: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय मग या गोष्टी लक्षात ठेवा l Things to remember while investing in share market in Marathi

Leave a comment