मूलद्रव्ये आणि आधुनिक आवर्त सारणी l Elements and Modern Periodic Table in Marathi
नमस्कार मित्रांनो yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. मित्रांनो विज्ञान म्हटलं की आपल्यासमोर खूप गोष्टी येतात. शाळेतल्या छोट्या छोट्या प्रयोगांपासून ते जीवन सुखकर करणारे अनेक शोध आठवतात. मुळात विज्ञान म्हणजे निसर्ग नियम. ज्या निसर्ग नियमांचा आपण शोध घेतला, पद्धतशीरपणे आपण ते मांडले त्यालाच आपण विज्ञानातली तत्व किंवा सिद्धांत म्हणतो. अगदी आपण नेहमी घेतो तो श्वास ते आकाशातून उडणारे विमान किंवा चंद्रावर जाणारे यान या सगळ्या गोष्टी याच विज्ञानाच्या मूलभूत नियमांवर आधारलेल्या आहेत. याच विज्ञानाच्या सिद्धांताचा वापर करून आपण प्रगती साधली आहे. मित्रांनो विज्ञानाचे ढोबळपणे तीन भाग करण्यात आलेले आहेत रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र. रसायनशास्त्रामध्ये हे जग ज्या मूळ पदार्थांनी बनवलेले आहे त्या पदार्थांचा अर्थातच मूलद्रव्यांचा अभ्यास केला जातो. याच मूलद्रव्यांविषयी आपण या लेखात जाणून घेणार आहोत. मूलद्रव्ये आणि आधुनिक आवर्त सारणी l Elements and Modern Periodic Table in Marathi
हेही वाचा: एमआरआय आणि सीटी स्कॅन म्हणजे काय? What is MRI and CT scan in Marathi.
आवर्त सारणिचा इतिहास l History of Periodic Table
अगदी सर्वसामान्य माणसाला माहीत असलेली मूलद्रव्ये जसं की लोह, कॅल्शियम, आयर्न, ऑक्सिजन ते अगदी युरेनियम, रेडियम, थोरियम अशा किरणोत्सारी मूलद्रव्यांचा अभ्यास रसायन शास्त्रात केला जातो. मित्रांनो सुरुवातीला जशी ही मूलद्रव्य सापडली किंवा त्यांचा अभ्यास केला गेला तेव्हा त्यांची निश्चित अशी कोणतीही मांडणी नव्हती परंतु हळूहळू अशा काही विशिष्ट मांडणीची गरज निर्माण झाली. त्याचाच पहिला प्रयत्न म्हणून डोबेरायनरची त्रिके, न्यूलँड ची अष्टके अशा काही जुन्या पद्धती सुरुवातीला वापरण्यात आल्या. परंतु या पद्धती या मूलद्रव्यांच्या मांडणीला संपूर्णपणे न्याय देण्यात अपयशी ठरल्या. नंतरच्या काळात रशियन रसायनशास्त्रज्ञ मेंडेलिव्ह याने या मूलद्रव्यांची एका विशिष्ट नियमाला अनुसरून त्यांची रचना केली आणि एक सारणी तयार केली त्यालाच मूलद्रव्यांची आधुनिक आवर्त सारणी म्हणजेच मॉडर्न पिरियॉडिक टेबल (Modern Periodic Table) असे म्हणतात. मूलद्रव्याचे वस्तुमान व इतर रासायनिक गुणधर्म या सर्वांचा विचार करून ही मांडणी केली गेली.
हेही वाचा: पाऊस कसा मोजतात? How rain measures in Marathi
आवर्त सारणीची रचना l Structure of Modern Periodic Table
या आवर्त सारणी मध्ये म्हणजेच टेबलमध्ये ज्या आडव्या रांगा आहेत त्यांना आवर्त म्हणजेच पिरियड (Period) तर उभ्या स्तंभाना गण म्हणजे ग्रुप (Group) असे म्हणतात. मूलद्रव्यांचे मूलभूत गुणधर्म लक्षात घेऊन या विशिष्ट रांगा उभ्या आणि आडव्या क्रमाने मांडण्यात आलेल्या आहेत. मूलद्रव्याचे अणुवस्तुमान (Atomic weight) या मूलभूत गुणधर्मावर आधारित अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी या आवर्तसारणीत केलेली आहे.
हेही वाचा: इंग्लिश १ ते १०० अंकांचे मराठी प्रतिशब्द l English 1 to 100 numbers in Marathi
मेंडेलीव चा आवर्त सिद्धांत l Mendeleev Periodic Principle
मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणू वस्तुमानाच्या पुनरावृत्ती वर अवलंबून असतात.
आपल्या दीर्घ निरीक्षणांतून मेंडेलीव ने हा सिद्धांत मांडला. काही ठराविक अणुवस्तुमानानंतर येणारे मूलद्रव्य पुन्हा तेच गुणधर्म दाखवते याचा शोध मेंडेलीव यांना लागला आणि त्यानुसार त्यांनी अशा मूलद्रव्यांची एकाखाली एक मांडणी केली म्हणूनच एकाच गणातील मूलद्रव्यांचे गुणधर्म साधारणपणे समान आढळून येतात.
एकाच गणातील म्हणजेच ग्रुपमधील मूलद्रव्यांची संरचना अशा प्रकारे असते की त्यांच्या बाहेरच्या कक्षेत सारख्या संखेने इलेक्ट्रॉन्स फिरत असतात त्यामुळे त्यांचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म सारखे असतात. उदाहरणार्थ आवर्तसारणीच्या आठव्या गणात म्हणजेच ग्रुपमध्ये इनर्ट गॅसेस (Inert Gases ) म्हणजेच निष्क्रिय वायू असतात जसे की हेलियम, निऑन, ऑर्गन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन इत्यादी. या सर्व वायूंच्या अणुसंरचनेमध्ये बाहेरच्या कक्षेत एकही मुक्त इलेक्ट्रॉन नसतो त्यामुळे ते कोणाशीही संयोग करू शकत नाहीत म्हणूनच त्यांना निष्क्रिय वायू असे म्हटले जाते.
एका आडव्या ओळीतील मूलद्रव्यांचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म हळूहळू बदलतात कारण त्यांचे अणुवस्तुमानांक हळूहळू वाढत जातात. उदाहरणार्थ तिसर्या आडव्या रांगेत सोडियम आणि त्यानंतर मॅग्नेशियम आहे पण या दोन मूलद्रव्यांमध्ये थोडासा फरक आहे कारण त्यांची अणू वस्तुमाने भिन्न आहेत.
जेव्हा मेंडेलीव्हने आधुनिक आवर्त सारणी तयार केली तेव्हा एकूण ६३ मूलद्रव्य माहीत होती पण मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचा विचार करून त्याने आवर्त सारणी मध्ये काही मोकळ्या जागा ठेवल्या होत्या आणि ती मूलद्रव्ये सापडण्याविषयी भाकीत केले होते. नंतर जेव्हा ती मूलद्रव्य सापडली तेव्हा मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीवर सर्वांचाच विश्वास बसला आणि ही आवर्तसारणी सर्वमान्य झाली. सध्या आवर्त सारणी मध्ये एकूण ११८ मूलद्रव्य आहेत. आवर्त सारणी मधील मूलद्रव्यांचे रचना ही त्यांच्या वाढत्या अणुवस्तुमान अंकांनुसार केल्यामुळे दोन मूलद्रव्यांच्या मध्ये नेमकी किती मूलद्रव्य असतील हे सांगणे आताही कठीण आहे. तुमच्या माहितीसाठी मेंडेलीव्हची आधुनिक आवर्तसारणी अर्थातच मॉडर्न पिरियॉडिक टेबल पुढे दिले आहे.
मूलद्रव्यांची आधुनिक आवर्त सारणी l Modern Periodic Table
मित्रांनो या लेखामध्ये आपण मूलद्रव्ये आणि आधुनिक आवर्त सारणी l Elements and Modern Periodic Table in Marathi बद्दल जाणून घेतले. तुम्हाला हा लेख कसा वाटला, तुमचे काही प्रश्न असतील, काही सूचना असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा.
मूलद्रव्ये आणि आधुनिक आवर्त सारणी l Elements and Modern Periodic Table in Marathi