भारतीय रेल्वे माहिती l Indian Railway Information in Marathi

भारतीय रेल्वे माहिती l Indian Railway Information in Marathi
नमस्कार मित्रांनो! yugmarathi.com वर आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. मित्रांनो प्रवास म्हटला की आपल्यासमोर सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दुचाकी, कार, बस, रेल्वे ते अगदी विमान असे अनेक पर्याय आपल्याकडे आहेत. यातला रेल्वे आणि विमानाचा प्रवास हा बस प्रवासापेक्षा कितीतरी आरामदायी असतो परंतु विमानाची तिकिटे पाहता रेल्वे प्रवास हाच त्यातल्या त्यात स्वस्त आणि आरामदायी म्हणून आपल्यासमोर उरतो. त्यामुळेच भारतात दिवसाला लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात जे इतर कुठल्याही प्रवासी संख्येपेक्षा जास्त आहे. या लेखामध्ये आपण भारतीय रेल्वे, तिचा इतिहास आणि रेल्वे संदर्भात काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय रेल्वे माहिती l Indian Railway Information in Marathi
 भारतीय रेल्वेचा इतिहास
भारतात दळणवळण सोयीचे व्हावे म्हणून ब्रिटिशांनी रेल्वेची मुहूर्तमेढ रोवली पहिला रेल्वेमार्ग हा तेव्हाचे बोरीबंदर म्हणजे त्यानंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे असा होता आणि भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे असा 34 किलोमीटरचा प्रवास करत 16 एप्रिल 853 रोजी धावली आणि एक इतिहास रचला गेला एकदा भारतात रेल्वे सुरू झाली आणि मग रेल्वेच्या विस्तारीकरणाने मागे वळून पाहिलेच नाही. रेल्वेचा 170 वर्षांच्या इतिहासात रेल्वेने घेतलेली भरारी आपणा सर्व भारतीयांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.
भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर)
रेल्वेचे काम कार्यक्षम पद्धतीने होण्यासाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधा चांगल्या असणे गरजेचे आहे जसे की स्टेशन, रूळ, बोगदा, पूल, आरक्षण प्रणाली, रेल्वेचे वेळापत्रक इत्यादी. एका माहितीनुसार भारतातील सर्वात जास्त जागेवर भारतीय रेल्वेची मालकी आहे. भारतात रेल्वेच्या रुळांचे त्यांच्या रुंदिनुसार खालील प्रकार आहेत.
ब्रॉडगेज १.६७६ मीटर
मीटर गेज १ मीटर
नॅरोगेज ०.७६२ मीटर
त्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसार यातला कोणता तरी एक रुळाचा प्रकार वापरला जातो. त्यातही ब्रॉडगेज चा वापर प्रामुख्याने केला जातो.  मुंबईतील बोरीबंदर म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचे इमारत दहा वर्षांच्या कामानंतर १८८७ साली पूर्ण झाले. आज देखील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून लोक या स्थानकाला भेट देत असतात. भारतात धावलेली पहिली गाडी ही वाफेच्या इंजिनावर होती तर आता वेगाने झालेले विद्युतीकरण आपण पाहतोय. वाफेचे इंजिन ते विजेवर चालणारी रेल्वे असा मोठा प्रवास भारतीय रेल्वेने बघितला आहे. सुरुवातीला रेल्वेमध्ये टॉयलेटची सोय नव्हती कालांतराने ती फर्स्ट क्लास डब्यामध्ये आणि नंतर सर्वच ट्रेनमध्ये होत गेली रेल्वेच्या वेगवान प्रवासासाठी आवश्यक ही एक मुख्य गोष्ट ठरली आणि आता तर सर्वच ट्रेन बायो टॉयलेट ने सुसज्ज आहेत. भारताच्या विविध भौगोलिक परिस्थितीचा सामना करत रेल्वेने मोठ्या प्रमाणावर रेल्वेमार्ग बांधलेत आणि त्यापैकी खालील काही वैशिष्ट्यपूर्ण रचना आहेत.
भारतीय रेल्वेचा सर्वात लांब पूल- वेबनाड केरळमध्ये आहे ज्याची लांबी ४६२० मीटर आहे
रेल्वेचे सर्वात मोठे स्टेशन हावडा जंक्शन हे आहे पश्चिम बंगाल मध्ये 1854 साली ते बांधलं गेलं सुमारे २३ प्लॅटफॉर्म्स इथे असून भारतातलं सगळ्यात जास्त व्यस्त असणारे देखील ते एक स्टेशन आहे.
सर्वात लांब बोगदा महाराष्ट्रात रत्नागिरीतील करबुडे ६.४५ किलोमीटर
आशियातील सर्वात उंच पूल कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जवळ पानवल येथे १६५ मीटर उंच आहे
रेल्वेचा वेग, आरामदायी आसन व्यवस्था, वेळापत्रक,  असणे रेल्वे रुळांचं स्टेशनचं आधुनिकीकरण, ऑनलाइन आरक्षण सुविधा अशा नानाविध प्रकारच्या सोयीसुविधा रेल्वे टप्प्याटप्प्याने देत गेली आणि विकसित होत गेली.
indian-railway-information-in-marathi
भारतीय रेल्वेचे कार्य
रेल्वे वाहतुकीचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे व्हावे म्हणून भारतात रेल्वेचे एकूण 18 प्रमुख विभाग केलेले आहेत आणि 70 डिव्हिजन्स आहेत.  साधारणपणे 25000 रेल्वे ज्यात साधारण दहा हजार मालगाड्या आणि 15000 प्रवासी गाड्या सध्या भारतीय रेल्वेच्या दिमतीला आहेत.
एखादी रेल्वे सुरळीतपणे चालण्यासाठी रेल्वेचे चालक म्हणजेच मोटरमन, स्टेशन मास्तर, सिग्नल देणारे ऑपरेटर्स, रेल्वेची देखभाल करणारे कर्मचारी या सर्वांवर अवलंबून असते या सर्वांमध्ये योग्य ताळमेळ असेल तरच गाड्या वेळेवर आणि सुरक्षित प्रवास करू शकतात. आता बदलत्या काळात रेल्वेने काही गोष्टी ऑटोमॅटिक करण्यावर भर दिलाय. ऑटोमॅटिक ट्रेन कंट्रोल, एकाच रुळावर दोन ट्रेन आल्या तर कार्यान्वित होणारी ब्रेकिंग यंत्रणा तसेच अपघात रोखण्यासाठी योग्य सिग्नल्स आणि सर्वांशी योग्य ताळमेळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य  झाले आहे.
ऑनलाइन तिकीट प्रणाली
इंटरनेट आणि कम्प्युटरचा वापर रेल्वेसाठी अगदीच अविभाज्य भाग बनला आहे. रेल्वे म्हणजेच आयआरसीटीसी(IRCTC) ने याच माध्यमातून सुरु केलेली ऑनलाइन तिकीट प्रणाली लोकांना खूपच सोयीची पडते आहे. ज्याच्यामुळे तिकिटासाठी स्टेशन बाहेर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आता खूप कमी झाल्यात. आपल्याला आता बसल्या जागी मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या सहाय्याने भारतात कुठल्याही प्रवासाचे रेल्वेचे तिकीट काढता येते तसेच प्रवासासाठी लागणाऱ्या इतरही सुविधा जसे की जेवण आपण ऑनलाईन प्रकारे मागवू शकतो यामुळे प्रवाशांना नक्कीच चांगल्या सुविधा मिळून त्यांचा प्रवास आनंददायी होतो आहे.

हेही वाचा: पहिला विमान प्रवास! या आहेत महत्त्वाच्या गोष्टी! First time travel from flight, important tips in Marathi

रेल्वेचे प्रकार
भारतात समाजाच्या विविध थरांतील लाखो लोक दररोज रेल्वेने  प्रवास करत असतात.  या सर्वांसाठीच रेल्वेने वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या उपलब्ध करून दिल्या.  काही प्रमुख गाड्यांचे प्रकार पुढे दिले आहेत.
दुरांतो एक्सप्रेस
या लांब पल्ल्याच्या आणि फास्ट ट्रेन म्हणून ओळखल्या जातात.
शताब्दी एक्सप्रेस
या कमी अंतरासाठी आणि सुपरफास्ट स्पीड साठी ओळखल्या जातात
राजधानी एक्सप्रेस
या आपल्या राजधानीला म्हणजेच दिल्लीला देशातील प्रमुख शहरांशी जोडतात. उत्तम प्रवासी सुविधा आणि वेग या ट्रेनची वैशिष्ट्ये आहेत. भारतीय रेल्वेच्या सर्वोत्तम गाड्यांमध्ये यांची गणना होते.
गरीब रथ
कमी तिकिटात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ही ट्रेन सुरू करण्यात आली.
वंदे भारत एक्सप्रेस
पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचे यश म्हणजे वंदे भारत ट्रेन. भारतातील पहिलीच इंजिन विरहित ट्रेन म्हणून वंदे भारत ओळखली जाते. प्रत्येक डब्याला दिलेल्या ड्राईव्ह मुळे ही ट्रेन कमी वेळात मोठा वेग पकडते. तसेच यातल्या उत्तम सोयीसुविधांमुळे ही ट्रेन खूप लोकप्रिय झाली आहे.
याशिवाय तेजस एक्सप्रेस, संपर्क क्रांती एक्सप्रेस तसेच नियमित प्रवाशांसाठी पॅसेंजर्स, मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन, नव्याने सुरु झालेल्या मोनो ट्रेन्स, मेट्रो ट्रेन्स यादेखील भारतीय रेल्वेच्या प्रमुख गाड्या आहेत.
रेल्वेचे क्लास
फर्स्ट क्लास
याच्यामध्ये एक वेगळे कंपार्टमेंट असते ज्यात दोन व्यक्तींची बसण्याची तसेच झोपण्याची व्यवस्था केलेली असते.
सेकंड क्लास किंवा सेकंड एसी
ही देखील वातानुकूलित झोपण्यासाठी केलेली आसन व्यवस्था असते ज्याच्यात एकावर एक अशा दोन सीट्स ची रचना केलेली
असते
थ्री टियर एसी
यामध्ये एकावर एक तीन आसनांवरती झोपण्याची व्यवस्था केलेली असते. हा देखील वातानुकूलित क्लास आहे.
indian-railway-information-in-marathi
स्लीपर
भारतातील सर्वात लोकप्रिय क्लास. यामध्ये एकावर एक तीन व्यक्तींची झोपण्याची व्यवस्था असते परंतु डबा वातानुकूलित नसतो. परंतु स्वस्त तिकिटामुळे मोठ्या प्रवासासाठी हा पर्याय बरेच जण निवडतात.
एसी चेअर कार
बसण्याची व्यवस्था असलेली वातानुकूलित व्यवस्था या क्लास मध्ये असते.
सेकंड एसी
बसण्याची व्यवस्था असलेला हा क्लास आहे.
वरील सर्व क्लासचे अगोदर आरक्षण (रिझर्वेशन) करावे लागते.  त्याशिवाय यातून प्रवास करता येत नाही.
जनरल क्लास
जनरल क्लास हा अनारक्षित क्लास आहे ज्यात तुम्ही प्रवास करण्याआधी तिकीट काढून जाऊ शकता. सर्वात स्वस्त परंतु गर्दी असलेला हा क्लास आहे.
मित्रांनो या लेखामध्ये आपण भारतीय रेल्वे माहिती l Indian Railway Information in Marathi बद्दल जाणून घेतले. तुम्हाला हा लेख कसा वाटला, तुमचे काही प्रश्न असतील, काही सूचना असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा.
भारतीय रेल्वे माहिती l Indian Railway Information in Marathi

Leave a comment