मराठीतील प्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तके l Best Marathi Historical Books in Marathi

मराठीतील प्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तके l Best Marathi Historical Books in Marathi

नमस्कार मित्रहो, आपणा सर्वांचं yugmarathi.com वर खूप मनापासून स्वागत. या लेखात आपण मराठीतील प्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तके श्रीमान योगी, युगंधर, पानिपत, मृत्युंजय, छावा, स्वामी, ययाती l Best Marathi Historical Books in Marathi Shriman Yogi, Yugandhar, Panipat, Mrutyunjay, Chhava, Swami, Yayati बद्दल वाचणार आहोत.

best-marathi-historical-books-in-Marathi

मराठीतील प्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तके l Best Marathi Historical Books in Marathi

श्रीमान योगी 

लेखक: रणजीत देसाई

Shriman Yogi- Ranjit Desai

best-marathi-historical-books-in-Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून दाखवणारी अप्रतिम कादंबरी. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान, अलौकिक कर्तृत्वाचा लेखाजोखा म्हणजे श्रीमान योगी. महाराजांच्या आयुष्यातील प्रमुख प्रसंग तर आपल्याला माहित आहेतच पण त्यासोबतच त्या प्रसंगांच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर सर्व घटनांचे बारकावे आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळतात. छत्रपती शिवरायांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम, शौर्य, निष्ठा, त्याग आणि स्वराज्याप्रती असलेली सर्वसमर्पणाची भावना आपल्याला अनुभवायची संधी ही कादंबरी देते. त्या काळातल्या परिसराचं, निसर्गाचं, प्रसंगांचं एवढं जिवंत चित्र लेखक रणजीत देसाई उभं करतात की आपण त्या काळात जगू लागतो. वाचकांना शिवछत्रपतींच्या सुवर्णयुगाचा अनुभव देणारी ही कादंबरी प्रत्येकाने वाचायलाच हवी.

मराठीतील प्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तके l Best Marathi Historical Books in Marathi

हेही वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांनंतरची मराठेशाही l Maratheshahi After Chhatrapati Shivaji Maharaj in Marathi

युगंधर 

लेखक: शिवाजी सावंत

Yugandhar- Shivaji Sawant

best-marathi-historical-books-in-Marathi

आपल्या बाललीलांनी, पराक्रमांनी आणि राजकिय चातुर्याने अवघ्या भारतीय संस्कृतीचा कणा बनलेल्या श्रीकृष्णाच्या आयुष्याची कहाणी म्हणजे युगंधर. ज्याने अधर्मापासून धर्माचे रक्षण करण्यासाठी महाभारत घडवून आणले, आपल्या ‘गीते’ तून आयुष्य जगण्याचे तत्त्वज्ञान सांगितले अशा भारतीय महानायकाची जीवनकथा म्हणजे युगंधर. ‘देव’पण प्राप्त झालेल्या कृष्णाच्या जीवनाभोवतीच्या अनेक खऱ्या खोट्या घटनांच्या धुक्याला बाजूला सारत त्याच्या मानवी असण्याचे आणि कर्तृत्वाचे केलेले सखोल विवेचन म्हणजे युगंधर. श्रीकृष्णाशी संबंधित अनेक स्थळे, प्रसंग, व्यक्ती याचं उत्तम दर्शन या कादंबरीत आपल्याला होतं. लेखक शिवाजी सावंत आपल्या अलंकारिक आणि ओघवत्या भाषेने संस्कृतीने देवपण बहाल केलेल्या श्रीकृष्णचरित्राशी एकरूप व्हायला आपल्याला भाग पाडतात.

मराठीतील प्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तके l Best Marathi Historical Books in Marathi

पानिपत 

लेखक: विश्वास पाटील

Panipat- Vishwas Patil

best-marathi-historical-books-in-Marathi

मराठेशाहीच्या इतिहासातील ठसठसती जखम म्हणजे पानिपत! १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत या ठिकाणी झालेल्या मराठे आणि महमंदशहा अब्दाली यांच्यातल्या भयाण रणसंग्रामाची कहाणी म्हणजे पानिपत! सदाशिवराव म्हणजेच भाऊसाहेब पेशवे, विश्वासराव पेशवे असे मराठ्यांचे सेनाप्रमुख आणि असंख्य मराठी वीर ज्या युद्धात एका दिवसात धारातीर्थी पडले त्या युद्धाची सखोल अभ्यासांती केलेली तपशीलवार मांडणी म्हणजे पानिपत! युद्धाच्या मूळ कारणांपासून ते प्रत्यक्ष युध्द घडतानाच्या इतिहासाचा ओघवता थरार म्हणजे पानिपत. लेखक विश्वास पाटील यांच्या अभ्यासपूर्ण आणि ऐतिहासिक लिखाणाने आपण पुस्तकात गुंतून पडतो. ‘पानिपत म्हणजे मराठ्यांचा संपूर्ण पराभव’ हा गैरसमज खोडून काढत ‘पानिपत म्हणजे भारतभूमीच्या रक्षणासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मराठ्यांनी दिलेली कडवी झुंज आणि बलिदान आहे’ हा गौरवपूर्ण इतिहास आपल्याला हे पुस्तक सांगून जाते.

मराठीतील प्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तके l Best Marathi Historical Books in Marathi

मृत्युंजय 

लेखक: शिवाजी सावंत

Mrutyunjay- Shivaji Sawant

best-marathi-historical-books-in-Marathi

लेखक शिवाजी सावंत यांना मृत्युंजयकार अशी ओळख मिळवून देणारी महारथी कर्णाचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारी कादंबरी म्हणजे मृत्युंजय. भारतीय संस्कृतीचा आत्मा असलेल्या ‘महाभारतातील’ पराक्रमी, लढवय्या, दानशूर परंतु नियतीच्या खेळाने सतत उपेक्षिला गेलेल्या कुंतीपुत्राची कथा म्हणजे मृत्युंजय! थोरला पांडव, कुंतीचा मोठा मुलगा, पराक्रमी योद्धा असूनही सतत सूतपुत्र म्हणून केली जाणारी अवहेलना, अनेक गोष्टींचा मुख्य हकदार असतानाही सतत डावलला जाणारा कर्ण आणि त्याच्या मनात उठणाऱ्या असंख्य भावनांचे हिंदोळे या सगळ्याचं यथार्थ दर्शन ही कादंबरी आपल्याला घडवते. युद्धात चुकीची बाजू असूनही केवळ मैत्री आणि शब्दाखातर दुर्योधनाला साथ देणारा मित्र, आपली सर्व शक्ती पणाला लावून मागितलेलं दान पूर्ण करणारा कर्ण आपल्याला भावून जातो. या कादंबरीच्या निमित्ताने शिवाजी सावंतांची भाषाशैली आपल्या मराठी भाषेची श्रीमंती दाखवून देते. कादंबरी वाचता वाचता नकळतपणे आपणही आपल्या आयुष्यातील उपेक्षेचे क्षण आठवून महारथी कर्णाच्या आयुष्याशी जोडले जातो. प्रत्येकाने एकदातरी वाचलीच पाहिजे अशी कादंबरी.

मराठीतील प्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तके l Best Marathi Historical Books in Marathi

हेही वाचा: शिवरायांची आरती l Shivarayanchi aarati l Aarati of Shivaji Maharaj in Marathi

छावा  

लेखक: शिवाजी सावंत

Chhava- Shivaji Sawant

best-marathi-historical-books-in-Marathi

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महापराक्रमी छाव्याची अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनप्रवासाची कथा म्हणजेच छावा! छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाविषयी आजही अनेक दावे प्रतिदावे केले जातात. त्यांच्या जीवनाविषयी आजही अनेक काल्पनिक कथा प्रचलित आहेत. या सगळ्याला छेद देत शंभूराजांचा खरा गौरवशाली इतिहास आपणासमोर ही कादंबरी उलगडते. जन्मतःच मातृप्रेमाला पारखे होणारे बाळराजे, पोरक्या वयात स्वराज्यासाठी ओलीस राहणारे शंभूराजे, शिवछत्रपतींच्या निधनानंतर स्वराज्याची धुरा आपल्या पराक्रमाने  सांभाळणारे महाराज आपल्याला या कादंबरीत भेटतात. संस्कृत कवी, ग्रंथकार, रणधुरंधर शंभूराजांचा इतिहास वाचताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. कादंबरीच्या शेवटी, महाराज शत्रूच्या हाती सापडल्यानंतर त्यांची मुघलांकडून झालेली अवहेलना, प्रचंड यातनामय हत्या, आणि या सगळ्याला अत्यंत धीरोदत्तपणे, आपला धर्माभिमान जपत ताठ मानेने सामोरे जाणारे शंभूराजे वाचून आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. शिवाजी सावंतांची आपल्या शंभूराजांचा इतिहास सांगणारी ही अजोड कलाकृती वाचायलाच हवी.

मराठीतील प्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तके l Best Marathi Historical Books in Marathi

हेही वाचा: पोमोडोरो टेक्निक: वेळ व्यवस्थापनाची परिणामकारक पद्धत l POMODORO Technique Effective method of time management in Marathi

स्वामी  

लेखक: रणजित देसाई

Swami- Ranjit Desai

best-marathi-historical-books-in-Marathi
पेशवाईतील एक प्रमुख पेशवा होऊन गेलेले श्रीमंत माधवराव पेशवे यांचा आयुष्यपट उलगडणारी कादंबरी. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सर्वात उत्तम आणि नितीमान प्रशासन आणि सुराज्य स्थापन करणारा पेशवा अशी माधवरावांची ओळख आहे. महापराक्रमी बाजीराव पेशव्यांनी मराठा साम्राज्य अटकेपार नेले पण त्यानंतर झालेल्या पानिपत च्या लढाईने मराठी साम्राज्याची मोठी हानी झाली. ही हानी भरून काढत मराठा साम्राज्याची घडी माधवरावांनी पुन्हा प्रस्थापित केली. पानिपत च्या पराभवाचा पुरता वचपा काढत पुन्हा मराठ्यांची दहशत वाढवली. हा वैभवशाली इतिहास आपल्याला ओघवत्या शैलीत ‘स्वामी’ मध्ये वाचायला मिळतो. श्रीमंत माधवरावांच्या आयुष्यातील हळवा कोपरा म्हणजे त्यांच्या पत्नी रमाबाई. माधवराव आणि रमाबाईंची प्रेमकहाणी देखिल आपल्याला या कादंबरीत खिळवून ठेवते. आणि सरतेशेवटी मराठी साम्राज्याच्या या कर्तृत्ववान पेशव्यांचे वयाच्या केवळ २६ व्या वर्षी होणारं अकाली निधन आणि त्यांच्या चितेवर सती जाणाऱ्या रमाबाईंची माधवरावांना उद्देशून मारलेली ‘ स्वामी!!’  अशी आर्त हाक आपल्या काळजाचा ठाव घेते!

मराठीतील प्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तके l Best Marathi Historical Books in Marathi

ययाती 

लेखक: वि. स. खांडेकर

Yayati- V. S. Khandekar

best-marathi-historical-books-in-Marathi
भारतातील साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने ज्या कादंबरीला १९७४ साली सन्मानित करण्यात आले ती म्हणजे ययाती!
देव दानव युद्धात राजा नहुषाच्या मदतीने देवगण युद्ध जिंकतात आणि त्यामुळे नुहुष इंद्रपद प्राप्त करतो आणि याच गोष्टीच्या गर्वाने तो ऋषींचा अपमान करतो. त्यावर चिडून त्यातीलच एक ऋषी त्याला शाप देतात की तुझी मुले कधीही सुखी होणार नाहीत.” नहुषाचे दोन पुत्र, यति आणि ययाति. यति लहानपणीच राजविलासापासून दूर संन्यासी जीवन व्यतीत करतो. तर ययाती नहूश महाराजांनंतर हस्तिनापूरचा राजा बनतो. त्याच्या आयुष्यात दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांची कन्या देवयानी आणि राजा वृषपर्वा ची कन्या शर्मिष्ठा येते आणि मग त्याभोवती फिरणारी कथा पूर्ण कादंबरीत वाचायला मिळते.  ययातीच्या रूपाने मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीच्या लालसेवर ही कादंबरी प्रकाश टाकते. आणि हे सर्व भ्रामक आहे याचा आयुष्याच्या अंती ययातीला होणार बोध आपल्यालाही अंतर्मुख करतो. लेखक वि. स. खांडेकरांच्या या साहित्यकृतीला वाचायलाच हवे.

तर मित्रहो, मराठीतील प्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तके श्रीमान योगी, युगंधर, पानिपत, मृत्युंजय, छावा, स्वामी, ययाती l Best Marathi Historical Books in Marathi Shriman Yogi, Yugandhar, Panipat, Mrutyunjay, Chhava, Swami, Yayati आणि अशी इतरही अनेक मराठी पुस्तके आपण वाचायलाच हवी.

चला तर मग आणखी वाचन करूया, आपल्या ज्ञानाकक्षा वाढवूया आणि जाणिवा समृद्ध करूया!!

मराठीतील प्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तके l Best Marathi Historical Books in Marathi

Leave a comment